Breaking News

अटलजींचा राजकीय प्रवास

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:35:13 am
  • 5 comments

अटलजींचा राजकीय प्रवास

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभारत शोककळा पसरली असून देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक नजर त्यांच्या राजकीय प्रवासावर...

 

• आर्य कुमार सभेच्या माध्यमातून ग्वाल्हेरमधून १९३९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश.

 

• १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीत सहभाग, अटक.

 

• श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत भारतीय जनसंघाचे काम.

 

• १९५७ मध्ये बलरामपूर मतदारसंघातून संसदेत प्रवेश.

 

• विरोधी पक्षात अभ्यासपूर्ण आणि उल्लेखनीय कारकीर्द.

 

• आणिबाणीनंतर जनता पक्षाच्या तिकिटावर दिल्ली मतदारसंघातून संसदेत दाखल.

 

• बहुमतातील जनता पार्टीच्या सरकारमध्ये मार्च, १९७७ ते जुलै. १९७९ या काळात परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम.

 

• १९८० मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंह शेखावत यांच्यासोबत वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. भाजपाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना मिळाला.

 

• १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार.

 

• मे, १९९६ ते जून, १९९६ या केवळ १३ दिवसांसाठी पंतप्रधानपदी विराजमान. बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

 

• मार्च, १९९८ ते मे, २००४ दरम्यान पुन्हा पंतप्रधानपद भूषविले.

 

अतिमहत्त्वाचे प्रमुख निर्णय

 

• मे, १९९८ मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे जमिनीखाली अणुचाचणी घेतली.

 

• १९९८ साली पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली-लाहोर बसने पाकला गेले.

 

• १९९९ मध्ये कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची कामगिरी.

 

• काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाचे अपहरण झाल्यानंतर तीन दहशतवाद्यांच्या बदल्यात सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका.

Best Reader's Review