Breaking News

अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:30:16 am
  • 5 comments

अटलबिहारी वाजपेयी यांचा अल्पपरिचय

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभारत शोककळा पसरली असून देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक नजर त्यांच्या अल्पपरिचयावर...

 

• २५ डिसेंबर, १९२४ रोजी ग्वाल्हेर येथे अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला.

 

• श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे ते शिष्य होते.

 

• भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यापैकी ते एक होते.

 

• १९६८ ते १९७३ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले.

 

• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यसह विविध माध्यमात त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिताही केली.

 

• राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक राहिले. तसेच ते आजन्म अविवाहित होते.

 

• पहिल्या गैरकाँग्रेसी सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

 

• तब्बल चार दशके विरोधी बाकावर बसल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात दोनवेळा पंतप्रधानपद भूषविले. रालोआ स्थापन होण्याआधी ते १३ दिवस देशाचे पंतप्रधान होते.

 

• सुवर्ण चतुष्कोन या रस्ते विकास प्रकल्पाचे ते प्रणेते होते.

 

• दिल्ली-लाहोर बस यात्रा सुरू करून भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

 

• उत्कृष्ट वक्ता आणि कवी मनाचा नेता अशी त्यांची ओळख होती.

 

प्रमुख पुरस्कार

 

१९९२ - पद्मविभूषण

१९९३ - कानपूर विश्वनविद्यालयाची डी.लिट

१९९४ - लोकमान्य टिळक पुरस्कार

१९९४ - उत्कृष्ट संसदपटू : भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार

२०१४ - भारतरत्न

 

साहित्यिक प्रवास

 

राष्ट्रधर्म मासिकाचे काम, पांचजन्य साप्ताहिकाचे संपादन, दैनिक स्वदेश, दैनिक अर्जुन या नियतकालिकांचे संपादक म्हणून काम

 

प्रकाशित पुस्तके

मेरी संसदीय यात्रा (चार खंड), मेरी इक्यावन कविताए (कवितासंग्रह), संकल्प काल, शक्ती से शक्ती, फोर डिकेड्स ऑफ पार्लियामेंट (३ खंड), लोकसभा मे अटलजी (भाषणांचा संग्रह), मृत्यू या हत्या, अमर बलिदान, कैदी कविराज की कुंडलिया (आणिबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता), न्यू डायमेंशन्स ऑफ इंडियाज् फॉरेन पॉलिसी (१९७७ ते ७९ या काळात परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून दिलेल्या भाषणांचा संग्रह), जनसंघ और मुसलमान, संसद मे तीन दशक (१९५७ ते १९९२ या काळात संसदेत दिलेली भाषणे - तीन खंड), अमर आग है (कविता संग्रह), न दैन्य न पलायनम् (कविता संग्रह)

Best Reader's Review