Breaking News

इम्रान खान 14 आॅगस्ट रोजी घेऊ शकतात पाकिस्तानच्या प्रधानमंत्री पदाची शपथ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 04-08-2018 | 11:49:26 pm
  • 5 comments

इम्रान खान 14 आॅगस्ट रोजी घेऊ शकतात

पाकिस्तानच्या प्रधानमंत्री पदाची शपथ

इस्लामाबाद – इम्रान खान पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 14 आॅगस्ट रोजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात, एका बातमीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

इम्रान यांची पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष त्यांच्या देशात 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या पक्षाने 270 पैकी 116 जागा जिकंल्या आहेत.

यापूर्वी 30 जुलैला इम्रान यांनी 11 आॅगस्ट रोजी शपथ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रभारी कानून मंत्री अली जफर यांनी डाॅन या वृत्तवाहिनीला सांगितले होते की, माझी आणि सेवानिवृत्त न्यायाधिश नसीरूल मुल्क यांची इच्छा आहे की, नव्या प्रधानमंत्री यांचा शपथग्रहण सोहळा 14 आॅगस्ट रोजी व्हावा.

पुढे बोलताना जाफर म्हणाले की, 11 आॅगस्ट किंवा 12 आॅगस्टला विधानसभेचे नवीन सत्र बोलावले जाऊ शकते. त्यांनी म्हटले की, जर हे सत्र 11 आॅगस्टला झाले तर प्रधानमंत्री 14 आॅगस्टला शपथ घेऊ शकतात आणि त्याचदिवशी राष्ट्रपती ममनून हुसैन नवीन प्रधानमंत्री यांना शपथ देऊ शकतात.

Best Reader's Review