Breaking News

आरएसएसचे स्वयंसेवक मदतीसाठी तयार – मोहन भागवत

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 25-03-2020 | 11:59:30 pm
  • 5 comments

आरएसएसचे स्वयंसेवक मदतीसाठी तयार – मोहन भागवत

सध्या देशातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५५० च्या जवळ पोहोचली आहे. तर ११ जणांना करोनामुळे मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित केलं. तसंच पुढील २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .

प्रतिपदेच्या भाषणादरम्यान मोहन भागवत म्हणाले होते की,’ “शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक आवश्यक त्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं स्वयंसेवकांनी सुरू केलं आहे. आपण सर्वांनी यावेळी नियमांचं कठोरपणे पालन केलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले,’संपूर्ण समाजाद्वारे अनुशासनाचं पालन केलं पाहिजे. औषधं आणि अन्य आवश्यक सेवा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. करोनाविरोधातील या युद्धातील प्रमुख बाब म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे. ही आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. यावरूनच आपण करोनावर विजय मिळवू. हे युद्ध आपल्याला एकत्रित लढायचं आहे.’

Best Reader's Review