Breaking News

औरंगाबाद पालिका निवडणूक आरक्षणात दिग्गजांना धक्का 

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 04-02-2020 | 12:31:28 am
  • 5 comments

औरंगाबाद पालिका निवडणूक

आरक्षणात दिग्गजांना धक्का 

औरंगाबाद -
महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत.    विद्यमान ४४ नगरसेवकांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना नवा वॉर्ड शोधावा लागणार असून, त्यात महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, सभागृहनेता विकास जैन, माजी महापौर भगवान घडमोडे, माजी उपमहापौर विजय औताडे, माजी सभागृहनेता रेणुकादास (राजू) वैद्य, आमदार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिंरजीव ऋषिकेश खैरे आदींचा त्यात समावेश आहे.औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होईल.फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागू शकेल, असे मानले जात आहे.

महापौर नंदकुमार घोडेले यांचा ईटखेडा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना शेजारच्या कांचनवाडी – नक्षत्रवाडी वॉर्डात जावे लागणार आहे. कांचनवाडी – नक्षत्रवाडी वॉर्ड ‘ओबीसी’साठी आरक्षित झाल्यामुळे या वॉर्डच्या नगरसेविका विमल कांबळे यांना अन्य वॉर्ड शोधावा लागेल. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा शिवाजीनगर वॉर्ड अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. सभागृहनेते विकास जैन यांचा वेदांतनगर वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. राजगौरव वानखेडे यांचा वानखेडेनगर वॉर्ड सर्वसमान्य प्रवर्गतील महिलेसाठी, माजी उपमहापौर विजय औताडे यांचा मयूर पार्क वॉर्ड अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी, सीताराम सुरे यांचा सुरेवाडी वॉर्ड अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. मोहन मेघावाले यांचा रोजेबाग – भारतनगर वॉर्ड अनुसुचित जमातीसाठी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे यांचा समर्थनगर वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे, तर खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा पहाडसिंगपुरा – बेगमपुरा वॉर्ड देखील ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. अफसरखान यासीनखान यांचा जयसिंगपुरा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी, नासेर सिद्दिकी यांचा गणेश कॉलनी वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी, जमीर कादरी यांचा आरेफ कॉलनी – प्रगती कॉलनी वॉर्ड अनुसुचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. नितीन चित्ते यांचा पवननगर वॉर्ड महिला प्रवर्गासाठी, मकरंद कुलकर्णी यांचा गणेशनगर वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी, यशश्री बाखरिया यांचा राजाबाजार वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी, शिवाजी दांडगे यांचा गुलमोहर कॉलनी वॉर्ड महिला प्रवर्गासाठी, गजानन बारवाल यांचा वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी, त्र्यंबक तुपे यांचा बौद्धनगर – उत्तमनगर वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी, स्थायी समितीच्या सभापती जयश्री कुलकर्णी यांचा जवाहर कॉलनी वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी, राजू वैद्य यांचा विद्यानगर वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी, माधुरी देशमुख यांचा सिडको एन ३, एन ४, पारिजातनगर वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी, भाऊसाहेब जगताप यांचा अंबिकानगर – मुकुंदवाडी हा वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. माजी महापौर भगवान घडमोडे यांचा रामनगर वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी, मनीषा मुंढे यांचा जयभवानीनगर वॉर्ड अनुसुचित जातीसाठी, प्रमोद राठोड यांचा विश्रांतीनगर वॉर्ड महिलांसाठी, दिलीप थोरात यांचा उल्कानगरी वॉर्ड महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

हे दिग्गज वॉर्डाच्या शोधात
नंदकुमार घोडेले
विकास जैन
गजानन बारवाल
राजेंद्र जंजाळ
जयश्री कुलकर्णी
भगवान घडमोडे
शिवाजी दांडगे
त्र्यंबक तुपे
सरिता बोर्डे
भाऊसाहेब जगताप
प्रमोद राठोड
दिलीप थोरात
राजगौरव वानखेडे
विजय औताडे
सीताराम सुरे
मोहन मेघावाले
सचिन खैरे
ऋषिकेश खैरे
अफसर खान
नासेर सिद्दिकी
गंगाधर ढगे

----------------------------

वॉर्ड क्रमांक    वॉर्डाचे नाव     आरक्षण
१) हर्सूल: सर्वसाधारण (महिला)
२) भगतसिंगनगर म्हसोबानगर: सर्वसाधारण (महिला)
३) एकतानगर: अनुसूचित जमाती (महिला)
४) चेतनानगर-राजनगर: ओबीसी (महिला)
५) पहाडसिंगपुरा-बेगमपुरा: ओबीसी (महिला)
६) भीमनगर-उत्तर: (खुला)
७) पडेगाव: ओबीसी
८) मिटमिटा: अनुसूचित जाती
९) भावसिंगपुरा, भीमनगर- दक्षिण: खुला
१०) नंदनवन कॉलनी-शांतीपुरा: ओबीसी
११) जयसिंगपुरा: सर्वसाधारण (महिला)
१२) आरेफ कॉलनी-प्रगती कॉलनी: अनुसूचित जाती (महिला)
१३) रोजेबाग-भारतमातानगर: अनुसूचित जमाती
१४) वानखेडेनगर-होनाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
१५) यादवनगर एन-११: खुला
१६) मयूरपार्क-हरसिद्धीनगर: अनुसूचित जाती (महिला)
१७) सुरेवाडी: अनुसूचित जाती (महिला)
१८) मिसारवाडी: खुला
१९) आरतीनगर मिसारवाडी: खुला
२०) नारेगाव पश्चिम: सर्वसाधारण (महिला)
२१) सावित्रीनगर चिकलठाणा नारेगाव पूर्व: सर्वसाधारण (महिला)
२२) चौधरी कॉलनी चिकलठाणा: ओबीसी
२३) एन-१ एमआयडीसी चिकलठाणा: अनुसूचित जाती
२४) आंबेडकरनगर: खुला
२५) पवननगर: सर्वसाधारण (महिला)
२६) मयूरनगर-सुदर्शननगर: खुला
२७) स्वामी विवेकानंदनगर: ओबीसी
२८) गणेश कॉलनी: सर्वसाधारण (महिला)
२९) विश्वासनगर-चेलीपुरा: अनुसूचित जाती (महिला)
३०) लोटाकारंजा: ओबीसी
३१) जयभीमनगर-आसेफिया कॉलनी: ओबीसी (महिला)
३२) भडकलगेट-बुढीलेन: सर्वसाधारण महिला
३३) कोतवालपुरा-गरमपाणी: खुला
३४) खडकेश्वर: ओबीसी (महिला)
३५) गुलमंडी: ओबीसी (महिला)
३६) राजाबाजार-शहागंज: खुला
३७) शहाबाजार-मकसूद कॉलनी: सर्वसाधारण (महिला)
३८) औरंगाबाद टाइम्स कॉलनी-युनूस कॉलनी: खुला
३९) शताब्दीनगर: सर्वसाधारण महिला
४०) श्रीकृष्णनगर: अनुसूचित जाती
४१) शिवनेरी कॉलनी: ओबीसी  
४२) अयोध्यानगर: खुला
४३) गणेशनगर: ओबीसी (महिला)
४४) रहेमानिया कॉलनी: ओबीसी (महिला)
४५) नेहरूनगर: खुला
४६) किराडपुरा: खुला
४७) रोशनगेट-शरीफ कॉलनी: सर्वसाधारण (महिला)
४८) कैसर कॉलनी- खुला
४९) नवाबपुरा- ओबीसी (महिला)
५०) मोतीकारंजा-भवानीनगर- अनुसूचित जाती (महिला)
५१) औरंगपुरा- ओबीसी
५२) नागेश्वरवाडी- अनुसूचित जमाती (महिला)
५३) समर्थनगर- ओबीसी (महिला)
५४) सिल्लेखाना- ओबीसी
५५) गांधीनगर-खोकडपुरा- ओबीसी (महिला)
५६) भवानीनगर- सर्वसाधारण (महिला)
५७) संजयनगर- खुला
५८) इंदिरानगर-बायजीपुरा पश्चिम- अनुसूचित जाती
५९) बारी कॉलनी- सर्वसाधारण (महिला)
६०) इंदिरानगर बायजीपुरा पूर्व- सर्वसाधारण (महिला)
६१) अल्तमश कॉलनी- सर्वसाधारण (महिला)
६२) एन-६ सिडको- खुला
६३) आविष्कार कॉलनी- सर्वसाधारण (महिला)
६४) गुलमोहर कॉलनी-सत्यमनगर- सर्वसाधारण (महिला)
६५) सुराणानगर- खुला
६६) अजबनगर, कैलासनगर- ओबीसी
६७) कोटला कॉलनी-खुला
६८) पद्ममपुरा-कोकणवाडी- ओबीसी (महिला)
६९) क्रांतीनगर-उस्मानपुरा- खुला
७०) क्रांती चौक- अनुसूचित जाती
७१) रमानगर- खुला
७२) विष्णुनगर- सर्वसाधारण (महिला)
७३) बौद्धनगर, उत्तमनगर- खुला
७४) जवाहर कॉलनी- ओबीसी
७५) विद्यानगर- ओबीसी (महिला)
७६) एन-३, एन-४, पारिजातनगर- ओबीसी
७७) ठाकरेनगर- अनुसूचित जाती
७८) ज्ञानेश्वर कॉलनी- मुकुंदवाडी- ओबीसी (महिला)
७९) अंबिकानगर- सर्वसाधारण (महिला)
८०) मुकुंदवाडी- खुला
८१) संजयनगर-मुकुंदवाडी-खुला
८२) रामनगर- सर्वसाधारण (महिला)
८३) विठ्ठलनगर- सर्वसाधारण (महिला)
८४) कामगार कॉलनी-अनुसूचित जाती (महिला)
८५) चिकलठाणा- ओबीसी
८६) राजनगर-मुकुंदनगर- खुला
८७) जय भवानीनगर सिडको १३ वी योजना- अनुसूचित जाती
८८) विश्रांतीनगर- सर्वसाधारण महिला
८९) गजानन नगर- सर्वसाधारण (महिला)
९०) पुंडलिकनगर-खुला
९१) न्यायनगर- ओबीसी (महिला)
९२) बाळकृष्णनगर-शिवनेरी कॉलनी- खुला
९३) गारखेडा, महेरनगर-खुला
९४) उल्कानगरी- सर्वसाधारण (महिला)
९५) जय विश्वभारती कॉलनी- ओबीसी
९६) ज्योतीनगर- अनुसूचित जाती
९७) एकनाथनगर- खुला
९८) कबीर नगर- सर्वसाधारण (महिला)
९९) वेदांतनगर - सर्वसाधारण (महिला)
१००) बन्सीलालनगर-सर्वसाधारण (महिला)
१०१) हमालवाडा-रेल्वेस्टेशन- अनुसूचित जाती
१०२) राहुलनगर, सादातनगर- ओबीसी (महिला)
१०३) ईटखेडा- सर्वसाधारण (महिला)
१०४) कांचनवाडी-नक्षत्रवाडी- ओबीसी
१०५) अथर्व क्लासिक-सुधारकरनगर- अनुसूचित जाती (महिला)
१०६) देवानगरी, प्रतापनगर- सर्वसाधारण (महिला)
१०७) मयुरबन कॉलनी- खुला
१०८) प्रियदर्शिनी इंदिरानगर - खुला
१०९) रामकृष्णनगर, काबरानगर - ओबीसी
११०) शिवाजीनगर- अनुसूचित जाती
१११) भारतनगर, शिवाजीनगर- ओबीसी (महिला)
११२) कासलीवाल भाग्योदय- वसंत विहार देवळाई- अनुसूचित जाती (महिला)
११३) गोपीनाथपुरम- हरिओमनगर- अनुसूचित जाती (महिला)
११४) सातारा गाव, संग्रामनगर- अनुसूचित जाती (महिला)
११५) देवळाई गांव, सातारा तांडा- अनुसूचित जाती

---------

 

Best Reader's Review