Breaking News

औरंगाबाद जिल्ह्याला ३२५.५० कोटींचा निधी मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 31-01-2020 | 12:19:46 am
  • 5 comments

औरंगाबाद जिल्ह्याला ३२५.५० कोटींचा

निधी मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 310 कोटी रुपयांच्या वाढीवनिधीसह औरंगाबाद शहरातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी, रस्ते, अंगणवाडी, शाळा बांधकाम व दुरूस्ती, क्रीडा विद्यापीठ, पाणंद रस्ते, विद्युत ट्रान्सफॉर्मर, जिल्हा रुग्णालय व पोलीस विभागाला आवश्यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी एकूण 325.50 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नियोजन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्व साधारण) राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक  उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेत असलेल्या आढाव्यात श्री.पवार बोलत होते. बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, उदयसिंह राजपूत, प्रशांत बंब, अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
श्री.पवार म्हणाले, मराठवाड्याची राजधानी  असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद शहरातील रस्त्यातील विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयासाठी (घाटी)निधीची भरीव तरतूद करणे, करोडीतील क्रीडा विद्यापीठ, शहरातील तीन ऐतिहासिक दरवाजांचे पूल यांच्यासाठीची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. घाटीसाठी ‍विशेष निधी देण्याची आवश्यकता आहे. अकोल्याच्या धर्तीवर पाणंद रस्त्यांबाबतचा ‍विचार व्हावा. तसेच अंगणवाडी बांधकाम व दुरूस्ती, वर्गशाळा खोल्या बांधकाम व दुरूस्तीकरीता सीएसआर आणि मनरेगा अंतर्गत ‍निधी उपलब्ध करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी दिल्या.
शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी मोठ्याप्रमाणात तरतूद करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला शासनाचे प्राधान्य असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या बाबींसाठी जिल्ह्याच्या 265 कोटीच्या नियतव्ययामध्ये 310 कोटीच्या वाढीव मागणीमध्ये अतिरिक्त 15.50 कोटी रुपयांची वाढ करून एकूण 325.50 कोटी रुपयांच्या मंजूर नियतव्ययास प्रारुप आराखड्यात मंजुरी देण्यात येत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेने वसुलीवर भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.
पालकमंत्री श्री.देसाई यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधींबाबत मागणी केली. तसेच खासदार, आमदार आदींसह लोकप्रतिनिधींनीही औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात यावा याबाबत मागणी केली.   
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 च्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण केले. शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी 265.58 कोटीच्या दिलेल्या मर्यादेपेक्षा जिल्ह्यातील यंत्रणांनी केलेली मागणी व जिल्ह्यातील  ‍विविध गरजा यांचा विचार करून अतिरिक्त निधीची मागणी असल्याची विनंती केली. आराखड्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण योजनांमध्ये चॉकी कीटक संगोपन, डेन्स फॉरेस्ट, स्वयंचलित दरवाजे असलेले कोल्हापूर बंधारे, शासकीय अभियोक्ता कार्यालयात मोबाईल स्टोरेज सिस्टीम, कबड्डी, कुस्तीसाठी मॅटचा वापर आदीबाबतही माहिती श्री. पवार यांना दिली. 
हुतात्म्यांना आदरांजलीआकाशचे कौतुक
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्मांना सकाळी 11 वाजता मान्यवरांनी दोन मिनिटे मौनपाळून आदरांजली वाहण्यात आली.  औरंगाबाद तालुक्यातील हातमाळीच्या सतरा वर्षीय असलेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार आकाश मच्छींद्र खिल्लारे याचे कौतुक श्री.पवार यांनी केले.

Best Reader's Review