Breaking News

बीड जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 300 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 31-01-2020 | 12:00:35 am
  • 5 comments

बीड जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या

300 कोटी रुपयांच्या  आराखड्यास मान्यता

औरंगाबाददिनांक 30  :- बीड जिल्ह्याचा सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 300  कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणराज्सस्तरीय आराखडा बैठक घेण्यात आलीयावेळी आमदार सर्वश्री विक्रम काळेप्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागरबाळासाहेब आजबेसंजय दौंडजिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाटअप्पर मुख्य सचिव (नियोजनदेबाशीष चक्रवर्तीविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवणक आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिलीजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)सन 2020-21 या वर्षासाठी  शासनाकडून  242 कोटी रकमेची वित्तीय मर्यादा कळविण्यात आली होतीत्यानुसार यंत्रणांकडून आलेल्या मागणीचा विचार करुन शासनाकडे 99 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी वित्तमंत्री यांच्याकडे करण्यात आलीवित्तमंत्री श्री.पवार यांनी त्यामध्ये 58 कोटी रुपयांची वाढ करुन 2020-21 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणसाठी 300 कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेस मान्यता दिली.

उपमुख्यमंत्री तथा वित्त्‍ व नियोजन मंत्री श्री.पवार म्हणाले कीमागच्या वर्षी सर्व राज्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होतात्यामध्ये यावर्षी पाचशे कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहेतसेच महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी यावर्षी शासनाने मोठी तरतूद केली आहे.  त्यानुसार जिल्ह्याची लोकसंख्याक्षेत्रफळ व मानव विकास निर्देशांक यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा नियतव्यय ठरविण्यात आला आहे  त्यानुसारच प्रत्येक जिल्ह्याची वित्तीय मर्यादा ठरविण्यात आली आहेबीड जिल्ह्यातील शाळाअंगणवाडींचे बांधकाम याबाबत मनरेगा अंतर्गत जो ‍निधी प्राप्त होतो त्यामधुन उर्वरित कामे करावीतयाच बरोबर माजलगाव येथील नाट्यगृहासाठी कोटी रुपये मंजूर करण्यात आला असून आवश्यकतेनुसार कोटीपर्यंत त्यास मान्यता देण्यात येईलअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त्‍ व नियोजन मंत्री श्री.पवार यांनी दिले.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.मुंडे यावेळी म्हणालेबीड हा ऊसतोड मजूरांचा जिल्हा असून शेतकऱ्यांसाठी आणि विकासाच्या गतीसाठी शासनाच्या मदतीची आवश्यकता आहेयाचा विचार करुन जिल्ह्यांने प्रारुप आराखडा व वाढीव मागणी केली आहेत्यास मान्यता द्यावीअसे ते म्हणाले.

 

Best Reader's Review