Breaking News

विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?-फादर फ्रान्सिस दिब्रिटो

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 11-01-2020 | 04:09:05 pm
  • 5 comments

विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?   

विचारवंतांची निष्क्रियता हा कलंक

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : विद्यापीठात शिकणाऱ्या आमच्या मुलांच्या डोक्यावर दंडुके पडत असताना गप्प कसे बसायचे? विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ? आम्ही त्याचा विरोध करू. प्रखर विरोध करू, तुम्हाला आमचे जे करायचे आहे ते करा, पण आम्ही ते बोलत राहू, अशा प्रखर शब्दांत ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी वर्तमानातील दडपशाहीच्या राजकारणावर टीका केली.

उस्मानाबाद येथे सुरू झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून फादर दिब्रिटो बोलत होते. प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष दिब्रिटो म्हणाले, कुणाच्या ताटात काय आहे, यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आज सर्रास गाईच्या नावाने माणसांचे गळे चिरले जात आहेत; परंतु स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी गाईविषयी केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. त्यामुळे आज गाईंच्या नावाने होणाऱ्या हत्या हा सावरकरांचा वैचारिक पराभव आहे. राजकारण ही समाजातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून साहित्यिक या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. 

या वेळी मंचावर माजी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, माजी संमेलनाध्यक्ष सर्वश्री नागनाथ कोतापल्ले, डॉ. अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या माजी प्रभारी अध्यक्ष माधवी भट, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन उपस्थित होते. या संमेलनाच्या स्वागत सत्रातील विशेष बाब म्हणजे संमेलनाला ऐन वेळी आलेले राज्याचे सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख स्वत:हून प्रेक्षकांमध्ये बसले.

 

अध्यक्षीय भाषण

संमेलनाध्यक्ष : फादर फ्रान्सिस दिब्रिटो

नमस्कार!

९३व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ___ मा. श्री. नितीन तावडे, उद्घाटक ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर,

९२व्यासाहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठालेपाटील, साहित्य महामंडळाचे कार्यवाह श्री. दादासाहेब गोरे, अन्य मान्यवर आणि माझ्या प्रिय रसिक मित्रांनो,

साहित्यमहामंडळ गेल्या वर्षापासून अनेक धाडसी आणि स्वागतार्ह निर्णय घेत आहे. उदा. अध्यक्षांची निवड महामंडळ सर्व घटक साहित्य संस्थाच्या अनुमतीने करत आहे. त्याच्या पहिल्या मानकरी होत्या श्रीमती अरुणा ढेरे. नव्या पद्धतीने झालेल्या निवडीचे सर्वत्र स्वागत झाले. माझ्या ध्यानीमनी आणि स्वप्नीदेखील नसताना ह्यावर्षी तो मान माझ्यासारख्याएका शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेला आहे. त्याचा प्रथमत: आनंद झाला, परंतु जबाबदारीचे भान येताच मनावर दडपण आले. अ. भा. म. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे पवित्र आहे. ह्या व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे का? असा प्रश्न मी स्वत:लाविचारीत राहिलो. निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही मला अभिनंदनाचे फोन आले, पत्रे आली आणि अजूनही येत आहेत. 'राकट देशा, दगडांच्या देशा' असे महाराष्ट्राबद्दल बोलले जाते. मला मात्र आता वेगळाच अनुभव आला; 'प्रेमळ देशा, साहित्यप्रेमी देशा, माझ्या महाराष्ट्र देशा.' मी खरोखर भारावूनगेलो आहे. हे माझ्याकरता आयुष्यभरपुरेल इतके पाथेय आहे.

माझीनिवड झालेल्या दिवसापासून तालुक्याच्या सर्व घटकांमधून रसिक आणि सामान्यजन अभिनंदनासाठी धावले. शाली आणि पुष्पगुच्छ ह्यांचा खच पडला.

उस्मानाबादहा दुष्काळी जिल्हा आहे, याची माहिती मला आहे. __पुष्पगुच्छ आणि शाली ह्यांच्याऐवजी उस्मानाबाद येथील पीडित कुटुंबासाठी निधी गोळा केला, तर अधिक उचितहोईल, असे मी सुचवले. वसईतील 'प्रबोधन प्रतिष्ठान'ने ती कल्पनाउचलून धरली. तालुक्यातील अनेक संस्थांनी आणि सामान्य नागरिकांनी 'वेदना जाणवाया, जागवू संवेदना', ह्या भावनेने प्रेरित होऊन आमच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापैकी काहीजण शेतकरी आहेत. त्यांच्यापैकी अनेकजण ह्या संमेलनासाठीही हजर आहेत.

प्रियउस्मानाबादकरांनो, 'उस्मान' ह्या अरेबिक शब्दाचा एक अर्थ आहे - 'लार्क पक्षाचे पिल्लू', दुसरा अर्थ 'खास निवड झालेला'

असाआहे. यावर्षी तुम्हा उस्मानाबादकरांची महामंडळाने खास निवड __ केली आहे. तुमची मने आकाशाएवढी मोठी अन् पक्ष्यासारखी निरागस

आहेत. शासनाचे अनुदान पुरेसे नाही, ह्याची तुम्हाला जाणीव होती; तरी तुम्ही महामंडळाच्या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आणि गावागावांतून निधी गोळा केला. अजूनही आपल्याला काही अपुरे पडत असेल तर, __ तुमची गरज भागवण्यास महाराष्ट्र सरकार पुढे येईल, याची मला खात्री आहे.

गरिबीमुळेकिंवा कर्जाच्या ओझ्यामुळे येथील काही शेतकऱ्यांना दुर्दैवी निर्णय घ्यावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. फडणवीस सरकारने २०१५ साली नेमलेल्या समितीने ह्या जिल्ह्याला ४५० एमएलडी पाणी पुरवण्याची शिफारस केलेली आहे. माझी नव्या सरकारला खास विनंती आहे, आपण अग्रक्रमाने उस्मानाबादची गरज लवकरात लवकर पुरी करावी.

___मराठवाडाही संतांची भूमी. इथल्या मातीचा प्रत्येक कण आणि ___ कणसंतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेला आहे.

उस्मानाबादहा जिल्हा कृष्णा आणि गोदावरी ह्या दोन्ही नद्यांनी सुपीक बनवला आहे. जिल्ह्याचा इतिहास सातव्या शतकापर्यंत मागे जातो. ह्या जिल्ह्याचा भाग असलेले शहर 'लातूर' हे राष्ट्रकूट राजांचीजन्मभूमी! ऐतिहासिक आणि ज्ञात कालखंडाचा विचार करता मौर्य काळात उस्मानाबाद जिल्ह्याचा परिसर सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली होता. सातवाहन राजांनी इ.स.पूर्व२४० ते इ.स.२६० अशी जवळपास साडेचारशे ते पाचशे वर्षयेथे प्रदीर्घ राज्य केले. १९०५ साली लोकमान्य टिळकांनी शहराला भेट देऊन इथे वाचनालयाची स्थापना केली आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन दिले. १९४१ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जिल्ह्याला भेट देऊन शिकण्याचा आणि संघर्ष करण्याचा संदेश दिला. उस्मानाबादच्या पदरी असे कितीतरी पुण्य आहे.

१मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.

महाराष्ट्रही ‘संतांची भूमी.' संत गोरा कुंभार ह्यांच्या वास्तव्याने मराठवाड्याची ही भूमी पावनझाली आहे. समाजातल्या सर्व स्तरांतील संतांनी महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातलेला आहे. जीवनमुक्त होणे । हे त्यांचेजीवितध्येय होते. 'म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणेशहाणे बापा'।। आपणा सर्वांनासाहित्याच्या मार्गाने शहाणे करण्याची प्रतिज्ञा गोरोबांनी केलेली आहे. त्यांच्या कृपाछायेखाली हा तीन दिवसांचाज्ञानसोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातीलसर्व संतांकडून आपण ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आशीर्वाद मागू या.

वसईतीलएका अशिक्षित, परंतु सुसंस्कृत शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मराठी माध्यमाच्या शाळेत माझे शिक्षण झाले. फादर थॉमस स्टीफन्स ह्यांनी 'ख्रिस्तपुराण' ह्या महाकाव्यात म्हटलेले आहे.

"म्हणोनिआमी तुमी सर्व जनीं । बंदुवर्ग ऐसेमानावे मनीं । किंग्री हिंदुआदी करुनि । येकमेकांचे बंदु।'” (भाग १-३ ओवी६४)

अशाप्रकारे सर्वधर्म मैत्रीच्या वातावरणात मी मोठा झालो. पुढे रेव्हरंड नारायण वामन टिळक हे तुका नामकसेतूवरुनी ख्रिस्तचरणी आले आणि महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाला त्यांनी भजने आणि भक्तिगीते शिकवली. त्यांचे एक भजन मलाआठवते.

ख्रिस्तगुरुमाऊली गं माय माझीख्रिस्त गुरु माऊली ।

टिळकांनीआम्हांला परमेश्वराला 'गुरु माऊली' म्हणायला शिकवले. लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांच्या 'स्मृतिचित्रे' या आत्मचरित्राद्वारे प्रभू ख्रिस्ताचेकसे अभ्यासपूर्ण अनुकरण करावे, हे आम्हांला दाखवूनदिले. त्यांचा ख्रिस्ताकडचा प्रवास पाहून माझी श्रद्धा दृढ झाली. कॅथॉलिक परंपरेतील रेव्हरंड फादर जे. एस. मिरांडा, बिशप डॉमनिक डिआब्रियो ह्यांनी

आम्हांलाकॅथॉलिक नियतकालिकांद्वारे मराठी भाषेची गोडी लावली. ख्रिस्ती साहित्याचा हा चार दशकांचावारसा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्या सर्वांचे ऋण शब्दांच्या पलीकडचेआहे. पुढे मला माझ्या अभ्यासात संत साहित्याची ओळख झाली. माझा आध्यात्मिक पिंड घडवण्यात संत साहित्याचे आणि सर्व धर्मग्रंथांचे फार मोठे योगदान आहे. माझे एक बोट प्रभूयेशूच्या हातात असले, तरी दुसरे बोट आपल्या संतांच्या हातात आहे.

***

१. साहित्याचेप्रयोजन

‘सहनेते ते साहित्य', अशीसाहित्याची एक व्याख्या केलीजाते. समाजाला सत्याचे भान देऊन भविष्याचे वेध घेण्याची दृष्टी देणारा एक संस्कार म्हणजेसाहित्य. आज येथे संपूर्णमहाराष्ट्रातून आणि बृहन्महाराष्ट्रातून आपण सर्व हजारोंच्या संख्येने एकत्र जमलो आहोत. साहित्यावरील प्रेमाने आपणा सर्व साहित्यभक्तांना आपल्याला इथे एकत्र आणले आहे. ही साहित्यनिष्ठांची मांदियाळी आहे. या तीन दिवसांत विचारांचे आदान-प्रदान होईल; आपल्या एकमेकांच्या गाठी-भेठी होतील, ग्रंथांचा सहवास व विचारांचे धनलाभेल ही फार मोठीकमाई आहे.

मित्रांनो, मानवी जीवन हे गूढ आणिरहस्यमय आहे. आपल्या जीवनाला अनेक पदर आहेत. त्यांपैकी साहित्य हा एक पदरआहे. मानवी जीवनातील गूढ जाणून घेण्याची माणसाला सतत उत्सुकता लागलेली असते. माणसाच्या मनात विचारांचे आणि भावनांचे सतत कल्लोळ उठत असतात.

आपल्याविचारांना आणि भावनांना एखादा साहित्यिक शब्दरूप कसे देतो?

कवयित्रीसंजीवनी मराठे आपल्या एका कवितेत म्हणतात, 'मी न सांगायचीकुणाला, कविता स्फुरते कशी?'

कवीलाकविता, लेखकाला कथा, कादंबरी, निसर्गलेखन कसे काय साधते? त्याच्या मनात विचारांची घुसळण सतत चालत असते आणि कळीला जसे उमलून यावेसे वाटते, तसे एक दिवस लेखकालालिहावेसे वाटते. कळीला जसे उमलण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही, तसेच लेखकाला व्यक्त होण्यास कुणी प्रतिबंध करू शकत नाही. ही चिंतनशीलता अबोधमनाचा ताबा घेते आणि एक दिवस तीशब्दांच्या रूपाने प्रकट होते. ह्या लेखनप्रक्रियेची तुलना एखाद्या गर्भवती स्त्रीबरोबर करता येईल. जेव्हा तिला जाणवते की, तिच्या उदरात अंकुर फुलतो आहे, तेव्हा तीही फुलते आणि तो आनंद व्यक्तकेल्याशिवाय तिला राहावत नाही. चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला पूर्णबिंब साकारते, त्याचप्रमाणे ती नऊ महिन्यांच्याखडतर प्रवासात अनेक अनुभवांच्या दिव्यातून जाते. तिचे लक्ष 'त्या' दिवसाकडे लागलेले असते. जेव्हा बाळ आतून ढुशा मारू लागते, तेव्हा बाळ सांगते की, 'माझी यायची वेळ जवळ आली आहे' आणि एक दिवस दिव्यघडते, त्यासाठी तिला जीवघेण्या वेणांची किंमत मोजावी लागते. बाळ जन्मल्यावर मात्र सृजनाचा तो चमत्कार पाहूनती प्रसूतीचे दुःख हरवून बसते. ती त्याच्यामध्ये गुंततजाते.

लेखनाचाप्रवासही काहीसा असाच असतो. विचाराचे एखादे बीज कवी-लेखकाच्या अंतर्मनात पडते. कधी ते त्याच्या अबोधमनात जाते. दरम्यान लेखक अनेक प्रकारच्या अनुभवातून जात असतो. ते बीज मात्रआतून काहीतरी सांगत असते. काही प्रकारांचे बी मातीत पेरलेकी, दिवसा-दोन दिवसांत सशाच्या डोळ्यांनी लुकलुक पाहू लागते. पहिल्या पावसामध्ये हा अनुभव येतो. चैत्रामध्ये भाजून निघालेली भूमी पहिल्या पावसानंतर अचानक बिजांकुरित होते. आफ्रिकेमध्ये मात्र काही वृक्ष असे आहेत की, त्यांची बीजे मातीत पडल्यानंतर खूप वर्षांनंतर त्यांना कोंब फुटतात. लेखकाचे असेच असते. कधी त्याची चिंतनशीलता मनाच्या गाभाऱ्यामध्ये काही दिवस, काही महिने, कधीकधी काही वर्षेही दडून बसते आणि मगच ती शब्दरूप घेते.

__साहित्यिकाच्याह्या सृजनशीलतेला आपण 'प्रतिभा' म्हणतो. प्रतिभा, प्रतिभा म्हणजे काय? एका थेंबातून निर्झराचा प्रवास सुरू होऊन पुढे अनेक निर्झर त्याला मिळत जातात, तो विस्तारत जातो. झाडाझुडपांतून, खाचखळग्यांतून, कधी उंचावरून, कधी सपाटीवरून तो बहरतच जातोआणि मग एक दिवसहा महाप्रपात एखाद्या कड्यावरून उसळतो, कोसळतो आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याला आपण धबधबा म्हणतो. प्रतिभेचा खडतर प्रवास असाच काहीसा असतो.

लेखकजेव्हा लिहायला बसतो, तेव्हा त्याची अंतर्दृष्टी जागृत होते आणि मनाच्या कोषात साठवलेले सगळे अनुभव कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित लेख ह्यांच्या रूपाने कागदावर उतरतात. साहित्यिकाचे अनुभवविश्व जितके व्यापक, त्याची चिंतनशीलता जितकी सखोल, त्याची कल्पनाशक्ती जितकी प्रत्ययकारी आणि त्याची अंतर्दृष्टी जितकी जागृत, त्या प्रमाणात त्याच्या साहित्याची गुणवत्ता ठरत असते आणि ते अभिजात पदालापोहोचते. उदा. जॉन स्टाइनबर्ग ह्यांची 'द ग्रेप्स् ऑफरॉथ' ही कादंबरी. तीसच्यादशकातील मंदीच्या काळामध्ये अमेरिकेत अनेकांची अन्नान्न दशा झाली. काम मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होऊ लागली. ओक्लोहोमा ह्या विभागातून बेकारांचे तांडेच्या तांडे कॅलिफोर्नियाच्या दिशेने निघाले. अनेकांनी हे तांडे जातानापाहिले, मात्र जॉन स्टाइनबर्ग ह्यांना त्यांची होणारी होरपळ, त्यांना होत असलेल्या यातना, ते उपसत असलेलेकष्ट, त्यांची चाललेली धडपड आणि जगण्याची जिद्दही जाणवली. त्यांच्यातला संवेदनशील लेखक जागृत झाला आणि 'द ग्रेप्स् ऑफरॉथ' ह्या अजरामर ग्रंथाची निर्मिती झाली.

हेअंतर्दृष्टीचे किंवा प्रतिभेचे वरदान वैज्ञानिकाला किंवा आध्यात्मिक व्यक्तीला देखील लाभलेले असते. वैज्ञानिक त्यामुळे शोध लावतात. उदा. गॅलिलिओला लागलेला सूर्य स्थिर असल्याचा शोध आणि आध्यात्मिक क्षेत्रात मदर तेरेजा ह्यांना लाभलेली अंतर्दृष्टी. त्यामुळे जे रंजले-गांजलेआहेत, त्यांच्यात त्यांना देव दिसू लागला. थोडक्यात आपण पाहतो, पण आपल्याला दिसतनाही. प्रतिभावंतांना मात्र ते दिसते. हाचत्यांच्यामधील व आपल्यामधील फरकआहे.

उत्तमसाहित्याच्या वाचनामुळे आपल्याला पराकोटीचा विविधांगी अनुभव येतो. कधी आपण आनंदाच्या लाटेवर लहरतो, तर कधी दु:खाने गहिरवतो. कधी आपल्याला जीवनाच्या अर्थाच्या प्रश्नांविषयी उत्तरे मिळतात, तर कधी व्यसनांच्याकिंवा वासनांच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होते. कधी आपल्याला विश्वाच्या अनंततेचे भान येते, कधी विश्वाचे आर्त हृदयाला भिडते; तर कधी मानवीआत्म्याच्या महत्ततेचे दर्शन घडते. अशा प्रकारे आपले जीवन सुंदर व संपन्न होऊनआपल्या जीवनाला दिशा मिळू शकते.

___ मराठीसाहित्य - मुमुर्दा ?

अलीकडेमराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते. ती मुमुर्दा, म्हणजेमरणपंथाला लागली आहे, असे सांगितले जाते. जे जे जिवंतअसते. त्यांच्यापढे जगण्याची आव्हाने असतात. त्यावर मात करून ते टिकाव धरते. त्याचप्रमाणे मराठी भाषेपुढे आव्हाने आहेत. उदा. आजची सर्वव्यापी डिजिटल साधने, लोकव्यवहारातील हिंदीचे वाढते प्रस्थ, परदेशी भाषांचे वाढते महत्त्व आणि विशेष म्हणजे मराठी माणसाचा जन्मजात न्यूनगंड, इ... परंतु तसे जर असेल, तरआजघडीला शेकडो दिवाळीअंक प्रसिद्ध होतात, लक्षवेधी मराठी साहित्य निर्माण होते, मराठी वृत्तपत्रांत दोन-दोन पानांच्या मराठी नाटकांच्या जाहिराती येतात, गाजलेल्या मराठी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होतात. या सर्वांचा आस्वादमराठी माणूसच घेतो आहे ना? तसेच आज ह्या संमेलनस्थळीलागलेले पुस्तकांचे असंख्य स्टॉल्स व त्यात गर्दीकरीत असलेले दर्दी वाचक हे सुचिन्ह आहे. एका मराठी वृत्तपत्राची दिल्ली आवृत्ती प्रसिद्ध होते. म्हणूनच मराठी माणसाला विचारावेसे वाटते, 'भ्रांत तुम्हां का पडे? मायबोलीचेदूध प्याला आहात ना?' आता गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मराठी बाळे इंग्रजी माध्यमात शिकून वाघिणीचे दूध पिऊ लागली आहेत, हे खरे; परंतुआजही महाराष्ट्रातील ऐंशी टक्के शाळा मराठी माध्यमांच्याच आहेत ना?

'पूर्वदिव्य ज्यांचे, त्याना रम्य भावी काळ' असे कवी विनायक सांगून गेले. आपले पूर्वदिव्य काय, ते संतसाहित्याने सिद्धकेलेले आहे. आज चार मराठीलेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. (अर्थात हिंदीला अकरा व कन्नडला आठपुरस्कार मिळालेले आहेत. आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे.) काही मोजक्या मराठी पुस्तकांची अन्य भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत. हे सर्व आश्वासकआहे.

___ कितीभारतीय भाषांमध्ये नेमाने अखिल भारतीय साहित्य संमेलने __ साजरी होतात? पहिले मराठी साहित्य संमेलन ११ मे १८७८रोजी

न्यायमूर्तीमाधवराव गोविंद रानडे आणि गोपाळराव हरि देशमुख (लोकहितवादी) ह्यांच्या प्रेरणेने पुणे येथे भरले होते. त्यांनी लावलेला साहित्य संमेलनाचा वेलू आता गगनावरी जातो आहे. त्या संमेलनामधून साहित्याची, साहित्यविषयक प्रश्नांची आणि विशेष म्हणजे तत्कालीन परिस्थितीची नोंद घेतलेली आढळते.

१९०५सालच्या तिसऱ्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष पांडुरंग तथा दादासाहेब करंदीकर ह्यांनी साहित्य आणि सामाजिक सुखदुःखे ह्यांचे नाते जुळले पाहिजे, देशाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवरही चर्चा-चिंतन झाले पाहिजे, असे आग्रहाने म्हटले होते. आज स्वातंत्र्योत्तर काळातही जेव्हाजेव्हा लोकशाहीचा गळा घोटला जातो, मानवी हक्क किंवा मानवी प्रतिष्ठा ह्यांना धोका पोहोचतो, तेव्हा तेव्हा साहित्य संमेलनाने भूमिका घेतलीच पाहिजे, याबाबत दुमत होण्याचा प्रश्नच नाही.

चौथेसाहित्य संमेलन १९०६ रोजी पुणे येथे वासुदेव गोविंद कानिटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या अभ्यासक्रमात मराठीचा विषय ऐच्छिक न ठेवता अनिवार्यठेवला याबद्दल विद्यापीठा

रमानले होते. सुमारे ११४ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारला स्थानिक भाषेचे महत्त्व कळून आले व त्यांनी त्याप्रमाणेपावले उचलली ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांनी दूरदृष्टी ठेवून मराठीच्या अध्ययनाला चालना द्यावी हे विशेष.

१९०७ साली विष्णु मोरेश्वर महाजनी ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाचव्या साहित्य संमेलनात मराठीप्रमाणेच इंग्रजी साहित्याचे

अध्ययनकरणे हे कसे आवश्यकआहे, ह्याचे प्रतिपादन केले. किती द्रष्टे होते आपले पूर्वाध्यक्ष! व्यक्तीच्या जीवनाबरोबर साहित्याच्या जीवनातही चढउतार असतात. रविकिरण मंडळाच्या अस्तानंतर मराठी कविता जवळजवळ अज्ञातवासात गेली असे वि. स. खांडेकर ह्यांनी२५व्या साहित्यसंमेलनात म्हटले आहे. असे साठोत्तरी कवितेबद्दल म्हणता येणार नाही. मराठीचा प्रवाह वेगवेगळ्या वाटा-वळणाने पसरत आहे

___ साहित्यहे जीवनावर केलेले भाष्य आहे. कवी, लेखक हे समाजाचे अविभाज्यघटक आहेत. त्यामुळे समाजाची सुखदु:खे, आशा-आकांक्षा, वेदना-व्यथा आणि जे-जे मानवीआहे, मानवाच्या इतिहासाशी आणि वर्तमानाशी निगडित आहे, त्या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यिकाच्या हृदयात उमटते व ते त्याच्यालेखनातून व्यक्त होते.

 

वेदना-साहित्याची जननी

__ वेदनाहा एक मूलभूत मानवीअनुभव आहे. वेदनेतून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिकांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली आहे. साहित्यिकाच्या, अस्तित्वाच्या अंतरात्म्यापर्यंत ती पोहोचलेली असतेम्हणून वेदना ही साहित्याची जननीठरलेली आहे. वेदना ह्या मनुष्यमात्रांच्या असोत, पशु-पक्ष्यांच्या असोत किंवा वृक्षवेलींच्या असोत, त्या माणसाला, त्याच्या आत्म्याला गदगदून हलवतातच.

वाल्मिकीऋषींनी स्नान करून परतत असताना शिकाऱ्याने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेली क्रौंच पक्ष्याची मादी पाहिली, तिच्याभोवती आक्रोश करणारा व्यथित नर पाहिला आणिते विव्हळ झाले. त्या पक्ष्याच्या वेदनेशी ते ऋषी तादात्म्यपावले व उत्स्फूर्तपणे त्यांच्यामुखातून निघालेला महानिषाद श्र्लोक अजरामर झाला.

मा निषादप्रतिष्ठांत्वमगम: शाश्वतीःसमाःयत्क्रौंचमिथुनादेकमवधी

काममोहित्म॥ ज्यांची शंभरावी पुण्यतिथी यावर्षी साजरी होत आहे, त्या रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांनी लिहिलेली 'केवढे हे क्रौर्य' हीकविता आपण पाठ्यपुस्तकात शिकलो. जखमी झालेली पक्षिणी आपल्या चोचीत घास घेऊन कशीबशी घरट्याकडे परतत असताना, तिची धडपड कवीने पाहिली आणि 'क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे,' ही कविता जन्मालाआली. तिचे वाचन करताना पाषाणहृदयी माणसालाही पाझर फुटतो.

एकोणिसाव्याशतकात विकसित झालेल्या 'ब्लॅक लिटरेचर'मध्ये तत्कालीन गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांच्या नरकयातनांचे दर्शन घडते. साहित्याला दिलेले ते वेगळे वळणहोते आणि जगाचे त्या साहित्याकडे लक्ष वेधले गेले; कारण वेदनेबरोबर त्या साहित्यात अभिजातताही होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्याच्या वृक्षाला दलित साहित्याच्या रूपाने रसरशीत धुमारे फुटले आणि कवितांच्या व आत्मचरित्रांच्या रूपात तेव्यक्त होऊ लागले. वंचित व शोषितांची दखलघेण्यात आणि

त्यांच्यासाहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यात प्रस्थापित समीक्षक कमी पडले. वेदना ही सर्वव्यापी आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पॅलेस्टिनी लोक कसे इस्रायलपुरस्कृत अत्याचाराला अलिकडे (१९४८नंतर) तोंड देत आहेत, हे मी पॅलेस्टिनमधल्यामाझ्या वास्तव्यात डोळ्यांनी पाहिले आणि तेथल्या अभ्याससत्रावेळी त्याविषयी ऐकलेसुद्धा. मनुष्य जेव्हा वेदनेत असतो आणि त्याचे तोंड बंद केले जाते, तेव्हा त्याचे हृदय बोलू लागते. काही पॅलेस्टिनी कवितांचा अनुवाद माझ्या वाचनात आला. रक्तात बुडवलेल्या लेखणीने केलेले ते काव्यलेखन आहे. तेथील कवी गसान झक्तान म्हणतात,

__ सामूहिकमृत्यू अंधाराशिवाय एकही गोष्ट मिळाली नाही, झोपलो आम्ही छपराशिवाय, पण घेऊन पांघरूणअंगावर आणि वाचलेला जीव. कुणीही आला नाही त्या रात्री सांगायला आम्हांला इतरांच्या मृत्यूबद्दल. रस्ते वाजवत राहिले शिट्ट्या आणि रस्ते खून झालेल्यांनी खच्चून भरलेले, आले होते ते शेजारच्या प्रदेशातूनज्यांच्या किंकाळ्या सुटून आल्यागत आमच्याकडे, आम्ही पाहिलंय आणि ऐकलंयही मेलेला माणूस हवेतून चालताना, त्यांच्या बसलेल्या धडकीच्या दोरीनं बांधलेला खळखळाट खेचून घेतोय चमकणाऱ्या गवताच्या पात्यांतून धगधगत्या गवताच्या चटयांवरून पडत राहिलंय सारं रस्त्यांवर, स्त्रियांनी दिलाय जन्म

 

फक्तया जगाचा निरोप घेतलेल्यांना

आणि त्यानंतरआतास्त्रियादेणारनाहीतजन्म.

('पॅलेस्टिनीकाविता', अनुवाद रमेशचंद्र पाटकर.

लोकवाङ्मयगृहप्रकाशन २०१८) जे काळजातून निघते, ते काळजाला भिडतेच आणि वाचकाला अंतर्मुख करते. साहित्य हा सत्याचा आविष्कारआहे. लेखक आपल्या साहित्यकृतीतून माणसाचा शोध घेत असतो आणि विशेषतः स्खलनशील माणसामध्ये असा शोध लवकर लागतो. कारण माणसाचे हृदय हे कुरूक्षेत्र आहे. तिथे बऱ्यावाईटांचा संघर्ष होत असतो. त्या संघर्षाला भिडता भिडता माणूस थकून जातो. परंतु संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नजरेसमोर मोठमोठे आदर्श ठेवून एक अतिशय देखणातरणाबांड तरुण ‘फादर' ही उपाधी मिळवतो. तो अतिशय बुद्धिमान असतो. त्याचे भवितव्यही उज्ज्वल असते. तो स्वत:लाखूप सांभाळतो. आपल्या ब्रह्मचर्य व्रताची त्याला जाणीव होती. त्यामुळे लोकांमध्ये मिसळताना तो स्त्रिया आणिमुली ह्यांच्यामध्ये अंतर ठेवत असे. एक वयस्क स्त्रीत्याला नादी लावण्याचा प्रयत्न करते. परंतु तो ताकास तूरलावत नाही. त्याचे फार मोठे नाव होते. त्याच्या प्रवचनाला लोक मोठ्या संख्येने गर्दी करीत. सर्व धार्मिक विधी तो चित्त लावूनसाजरे करीत असे.

काहीवर्षे जातात. कार्य करीत असताना त्याची नजर एका निळ्या डोळ्यांच्या आणि परीसारखी दिसणाऱ्या एका मुलीकडे जाते आणि मुलीचीही त्याच्याकडे. दोन्ही गोष्टी नकळत घडतात. कुठेतरी एक सुप्त भावनाजन्माला येते आणि दोघांनाही सर्व जाणवते. कुणाच्याही ध्यानात येणार नाही अशाप्रकारे त्यांचे प्रेमसंबंध रंगत जातात, परंतु ते लपून राहतनाहीत आणि त्याचा बभ्रा होतो. त्या दोघांना प्रचंड यातनेमधून जावे लागते. त्याचे भवितव्य धोक्यात येते. त्या दोघांच्या मनांची झालेली होरपळ, उलाघाल अतिशय धारदारपणे ऑस्ट्रेलियन लेखिका मेरी मॅक्लो ह्यांनी आपल्या 'द थॉर्नबर्ड्स' ह्याकादंबरीत वर्णिलेली आहे. कंटकपक्षी (थॉर्नबर्ड) नावाचा एक जगावेगळा पक्षीअसतो. तो आयुष्यात फक्तएकदाच गातो. त्याची सूर आळवायची वेळ जवळ आली की तो काटेरीवृक्षाचा माग काढतो. अतिशय तीक्ष्ण आणि अणुकुचीदार अशा काट्यावर तो स्वत:लाझोकून देतो. काटा त्याच्या हृदयातून आरपार गेला म्हणजे त्याच्या कंठातून एक सुरेल गीतबाहेर पडते. ते ऐकून सारंजग स्तिमित होते आणि जीवाचे कान करून त्या गाण्याचा आस्वाद घेते त्यावेळी स्वर्गातून देव मंद स्मित करतो...

ज्याच्याकाळजातून काटा आरपार जातो आणि त्या काट्याची लेखणी करून जो लिहितो, अशीसाहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते. कलात्मकरितीने वर्णन केलेली वेदना रसिकाला एक प्रकारचा इंद्रियातीतआनंद देत असते. ह्यालाच समीक्षक ब्रह्मानंदाच्या जातीचा आनंद समजतात.

साहित्याचे व्यासपीठ

प्रत्येकक्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. त्यांचे व्यासपीठ त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असले पाहिजे. आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बसवत असतो. उस्मानाबादच्या संमेलनाचे व्यासपीठावर स्थानापन्न न होण्याचा निर्णयराजकारणी मंडळीने मोठ्या मनाने घेतलेला आहे. एक नवीन पायंडाउस्मानाबादच्या संमेलनातून सुरू होत आहे. त्याबद्दल पुढाऱ्यांचे आणि उस्मानाबादकरांचे अभिनंदन! साहित्य संमेलने हे साहित्यिकांचे व्यासपीठआहे आणि तिथे अग्रपूजेचा मान साहित्यिकांचाच असतो. एक साहित्यप्रेमी म्हणूनराजकीय व्यक्तींनी अवश्य संमेलनाला हजर राहावे. सरकारने आपल्या सांस्कृतिक धोरणाचा एक महत्त्वाचा भागम्हणून पुतळे उभारण्याऐवजी साहित्य संमेलनाला पुरेसे अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागात आणि श्रीमंत भागात जेव्हा संमेलने होतात, तेव्हा शासनाने अनुदान देताना त्याचा विचार करावा.

राजकारणही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्या-बुऱ्या राजकारणावर अवलंबून असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करीत असतो. म्हणून साहित्यिक ह्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे. समर्थ रामदास ह्यांनी आपल्या 'दासबोध' ह्या ग्रंथात म्हटले आहे,

मुख्यते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरेते सावधपण

सर्वविषयी। राजकारण का करावे आणिकसे करावे, ह्याचा वस्तुपाठ समर्थांनी घालून दिलेला आहे. पोप अकरावे पायस (१८५७-१९३९) ह्यांनी आपल्या एका लेखात म्हटले होते, 'ज्यांना राजकारणात रस आहे, जेराजकारणात सक्रिय भाग घेतात, त्यांनी अतिशय अवघड परंतु अतिशय सन्माननीय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झाले पाहिजे.' पोप पायस ह्यांच्या ह्या विधानाला हिटलर आणि मुसोलिनी ह्यांची पार्श्वभूमी होती. ज्यूंचा संहार __होत असताना पोप पायस बारावे ह्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संदिग्धता व्यक्त केली जाते. सध्याचे पोप फ्रान्सिस ह्यांनी त्याकाळचे सगळे दस्तऐवज आता खुले केले आहेत. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच. जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकूमशहा आणि लष्करशहा ह्यांचा उदय होतो, जेव्हा मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडवले जाते, तेव्हा साहित्यिक, विचारवंत, धर्माचार्य ह्या सर्वांनी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.

आपल्याकडचेउदाहरण म्हणजे स्वामी अग्निवेश. ते एका धर्मसंघटनेचेअध्यक्ष आहेत. तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताच त्यांनी लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शविला. त्यांच्यावर तथाकथित धर्मवाद्यांनी हल्ले केले. पोलंडमध्ये जेव्हा एकाधिकारशाहीचा कहर झाला तेव्हा पोप दुसरे जॉन पॉल ह्यांनी: जेव्हा फिलिपाइन्समध्ये मार्कोस आणि त्याची पत्नी इमेल्डा ह्यांनी आपली हुकूमशाहीची वाघनखे बाहेर काढली तेव्हा कार्डिनल सिन ह्यांनी आणि एल-साल्वादोरमध्ये हुकूमशाहीनेउग्र रूप धारण केले, तेव्हा आर्चबिशप रोमेरो ह्यांनी ठाम भूमिका घेतली आणि लोकशाहीचा पुरस्कार केला. १९८१मध्ये पोप दुसरे जॉन पॉल ह्यांच्यावर प्राणांतिक हल्ला झाला आणि आर्चबिशप रोमेरो ह्यांची निघृण हत्या झाली; कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती.

ज्ञानपीठविजेत्या महाश्वेतादेवी ह्या बंगाली लेखिका होत्या. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडूनन घेता, त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल ह्या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलिकडे अनेक प्रकार घडत आहेत, ज्यांमुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केले जाते त्याबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे अनेकांना त्यांना कार्यक्रमांना बोलावण्याची भीती वाटते. ज्यांच्या लेखणीत नैतिकता ठासून भरलेली असते आणि वृत्तीमध्ये एकप्रकारचा बेडरपणा असतो, त्यांचा समाजमनाला धाक वाटतो. ज्यांच्याविषयी धाक वाटावा असे किती साहित्यिक आपल्या आजुबाजूला आहेत? आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबाईंची आठवण काढतो. दुर्गा भागवत ह्यांना साहित्यातील 'रणरागिणी' असे म्हटले जाते. कारण त्या भूमिका घेत आल्या अन् भूमिका लढवत आल्या.

जेव्हानागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, तेव्हा समाजामध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वांशिक शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचे स्वरूप येते, जेव्हा दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजिविकेचे साधन हिरावून घेतले जाते तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे. 'राजा कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आली आहे.'

***

२. अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मानवाचाइतिहास हा अन्यायाचा, गुलामगिरीचा, विषमतेचा आणि भेदभावाचा आहे. लिंग, वंश, जात, धर्म आणि जन्मस्थान या कारणांवरून माणसानेमाणसावर, सबलांनी दुर्बळांवर, उच्च वर्णीयांनी कनिष्ठांवर, पुरुषांनी स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले आहेत आणि अन्यायाची ही मालिका अजूनहीखंडित झालेली नाही. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपले सुरूच आहे. मात्र शत्रू खूप प्रबळ आहे. त्याला सात जीव आहेत. प्रतिगामी शक्तींचा सहज पराभव होत नाही. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रितीने हा अन्याय सुरूअसतो. त्याची कारणमीमांसा बदलत जाते, परिस्थिती बदलत जाते, परंतु अन्याय बदलत नाही. उदा. आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स साधनांद्वारे होणारे शोषण.

__१४ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री आपण नियतीबरोबर ऐतिहासिक करार केला. त्यावेळी अवघे जग झोपी गेलेअसता, भारत देश मात्र जागा होता. - आपल्या स्वातंत्र्याच्या जन्मघटिकेची प्रतीक्षा करीत होता. तो क्षण आलाआणि स्वातंत्र्याचा आनंद आपण उपभोगला.

भारतीयघटना

जेस्वातंत्र्य आपण अनुभवले, ते आपल्या भावीपिढ्यांनाही __ उपभोगता यावे, त्यासाठी आपल्या घटनाकारांनी अथक कष्ट करून २६

नोव्हेंबर१९४९ ला संविधानाची निर्मितीपूर्ण केली व २६ जानेवारी१९५० रोजी संविधानाची कार्यवाही सुरू झाली. आपल्या संविधानातील उद्देशिका (प्रीअँबल) म्हणजे एक महाकाव्यच आहे.

भारतीयघटनेने स्वीकारलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व यामूल्यांच्या प्रकाशात आपल्याला नव्या संस्कृतीच्या मंदिराची उभारणी करायची आहे. या चार महानमूल्यांबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाच्या विरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि  घटनात्मकसंरक्षणाचा हक्क असे सहा मूलभूत हक्क बहाल केले आहेत.

वास्तविक, कोणतीही राज्यसंस्था किंवा व्यक्ती, कितीही शक्तिशाली असो, एक मानव म्हणूनआपण आईच्या उदरातून हे हक्क घेऊनजन्माला आलेलो आहोत. या हक्कांमुळे प्रत्येकभारतीयाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. भारत हे बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे. गेली हजारो वर्षे भारताने ही विविधतेतील एकताजपली आहे, जोपासली आहे व भारतीय घटनेनेहीती मान्य केली आहे. विविधतेतील एकता हीच भारताची जगाला ओळख आहे, तीच आपली अस्मिता आहे.

भारतीयसंविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्यायही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत, 'सेक्युलर' ह्या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमध्ये झालेला आहे. तिथे सेक्युलर म्हणजे केवळ इहवाद किंवा धर्मविहीनता असा केला जातो. आपली सेक्युलर ही कल्पना त्याहूनखूप भिन्न आहे. तिचा अर्थ सर्वसमावेशकता म्हणजे सर्वांना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्मनाही, असा आहे. पंडित नेहरूंनी सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पनाजेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता) हा भारतीय घटनेचाआत्मा आहे. तो रथाचा सारथीआहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेला कुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातात आपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असला, तर दुसऱ्या हातातभारतीय संविधानाची प्रत असली पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीपायमल्ली

सर्जनशीलव्यक्ती अनेकदा द्रष्टी असते. जे सर्वसामान्यांना दिसत नाही, ते त्यांना दिसत असते. आपले द्रष्टेपण ते कलात्मकरीत्या व्यक्त ___ करीत असतात. त्यांचा लेखन किंवा कलाविष्कार प्रक्षोभक असू शकतो. हे

सर्वस्वीकारणे आणि पचविणे परंपरावाद्यांना आणि संस्कृती-संरक्षकांना। प्रसंगी अवघड जाते.

___ लोकशाहीएक जिवंत वस्तुस्थिती आहे. जिवंत व्यक्तीला आजार होतात, कधी ते प्राणांतिकही ठरतात, त्याचप्रमाणे लोकशाहीलाही आजार होऊ शकतो. २५ जून १९७५रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि ती १८ महिनेपुरली. उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध राजनारायण हा खटला अलाहाबादउच्च न्यायालयामध्ये चालवला जाऊन १२ जून १९७५रोजी निर्णय दिला गेला. त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांच्यावर मतदानामध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवला गेला आणि सत्ता सोडावी लागण्याची शक्यता दिसू लागताच त्यांनी आणीबाणी जाहीर केली. त्याआधी चालवलेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीमध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण ह्यांनी लष्कराला कायदेभंग करण्याचा सल्ला दिला होता. तोही घातक होता.

मूठभरस्वातंत्र्यप्रिय कार्यकर्त्यांनी 'आणीबाणी' ला निकराने विरोधकेला. त्यांना गजांआड जावे लागले. तरीही तुरुंगांच्या भिंतीच्या उंचीपेक्षा त्यांची लोकशाही मूल्यांवरील निष्ठा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाआग्रह अधिक उंच होता. त्या अठरा महिन्यांच्या कालावधीत अनेक लोकशाहीप्रेमी नागरिकही गजांआड केले गेले होते. त्या कालावधीत त्यांनी लिहिलेले साहित्य नंतर प्रकाशित झाले आणि ते लोकप्रियही झाले.

__ आणीबाणीच्याकालावधीत माझे वास्तव्य पुण्याला 'स्नेहसदन' येथे होते आणि मी ‘साप्ताहिक साधना'मध्ये माझ्या नावानिशी आणीबाणीविरोधी उपरोधिक पत्रे लिहीत होतो. 'इंदिराजी, सिंपली ग्रेट!' ह्या नावाने मी 'साप्ताहिक साधना'कडे एक पत्र पाठवले. २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. तरी अजूनही पोलिसराज सुरूच होते. 'साधना'ने २७ मार्चच्याअंकात माझे पत्र प्रसिद्ध केले. त्यानंतर माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागला. (ते पत्र मीमाझ्या 'नाही मी एकला...' ह्याआत्मचरित्रात (पृष्ठ क्र.११०) प्रसिद्ध केले आहे.)

तेव्हामाझे नाव पुण्यात झाले नव्हते. आणीबाणी उठवण्याच्या जवळपास शेवटच्या काळात पोलिसांना माझा थांग लागला व 'साधना'मध्येलिहिणारी ती व्यक्ती मीचआहे का, असे त्यांनी मला विचारले. मी त्यांना सांगितले, “मी कुठल्याही एका पक्षाचा सदस्य नाही. मी नैतिक मूल्येमानणारा एक भारतीय आहे. त्या भूमिकेतून मी ते लिहिलेआहे. त्याची जी काही शिक्षाअसेल, ती भोगण्यास मीतयार आहे...'' ते मुकाट्याने परतगेले आणि पुन्हा फिरकले नाहीत.

लोकशाहीच्याबुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचागळा घोटता येतो, हादेखील लोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी व विशेषत: साहित्यिकांनीव विचारवंतांनी सजग राहून स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते.

२६नोव्हेंबर १९४९ ला संविधानसभेचे अध्यक्षडॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी आपले संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधीम्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ला भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचासार्थ गौरव होतो, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानसभेत शेवटचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी देशाला सावध केले होते. ते संपूर्ण भाषणअभ्यासनीय आहे. त्याची एक प्रत प्रत्येकस्वातंत्र्यप्रेमीने आपल्या घरी फ्रेम करून लावावी, असे मला वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांच्या त्या भाषणातले विचार मी येथे उघृतकरीत आहे.

“लोकशाहीच्यासंवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य, कितीही मोठा माणूस असला, तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्थाउद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील... विभूतिपूजा ही जगातील इतरकोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतनआणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरते.”

___भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपणनेहमीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण भारतीय स्वभावाने भाबडे आणि भावनाशील_ आहोत. राजकीय नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा आपण डोळे बंद करून स्वीकार करतो. त्यांचे स्तोम माजवतो. 'उक्ती आणि कृती' ह्याच्यात मेळ आहे की नाही, हेआपण तपासून पाहिले पाहिजे. म्हणून तर संतांनी आपल्यालासांगितले आहे 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.'

प्रसार-साधनांचा लोकांच्या मनांवर व मतांवर खूपप्रभाव पडत असतो. प्रसिद्ध झालेली प्रत्येक बातमी ही काही लोकांनाधर्मवचनाप्रमाणे वाटते, परंतु आज 'पेड न्यूज' आणि 'फेक न्यूज' असे प्रकार चालू झाले आहेत. कधी-कधी राजकीय पक्षांची भूमिका बातम्यांच्या स्वरूपात अगदी पहिल्या पानावर झळकत असते. हादेखील लोकशाहीवर केलेला एक छुपा हल्लाआहे. तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.

उलटी गंगा

आपल्याकडेसंविधानासारखे धन आहे. त्यानुसारआपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुभवत आहोत. 'जगातील सर्वांत मोठी लोकशाही' अशा शब्दांत आपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे सगळे खरेआहे, परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते. आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे, विशालतेकडून संकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. काहींच्या भावना अतिशय हळव्या असतात. त्या पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याविषयी चिकित्सक भाष्य केले की, संबंधित गट उसळून उठतात. कायदा हाती घेतात, प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात. अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या अशा प्रवासाची अलीकडची उदाहरणे म्हणजे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गीआणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या.

कुणाच्याताटात काय आहे? कुणाच्या वाटीत काय आहे? ह्यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे ही अतिशय दु:खद बाब आहे. काही ठिकाणी जमावाकडून गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ह्यांनी गायीविषयीची केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या

हत्याहा सावरकरांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देशभरात झालेल्या इतर २०८ पत्रकारांच्या हत्यासुद्धा तशा निषेधार्ह आहेत. तसेच विभूतिपूजा, कर्मठपणा, पोथिनिष्ठा वाढत आहे. त्यामुळे हाडाच्या संशोधकांची कुचंबणा होते. विचारवंतांचा कोंडमारा होतो. विविध प्रकारच्या दडपणांमुळे शास्रशुद्ध संशोधन आणि धर्मचिकित्सा करणे अवघड होते. ही देशाची सांस्कृतिकहानी आहे. निखळ व शास्रशुद्ध संशोधनकरण्यासाठी निर्मळ वातावरणाची गरज असते. आपल्याकडे मुळात संशोधक वृत्तीचा हवा तितका विकास झालेला नाही. संशोधनामुळे नवी आणि निराळी माहिती उपलब्ध होते. त्यामुळे धर्मग्रंथांचे, ऐतिहासिक गोष्टींचे, व्यक्तींचे वस्तुनिष्ठ पुनर्मूल्यांकन ___ करता येते. याचे उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ते ज्यू धर्मातवाढले. 'जुना करार' हा त्याकाळच्या ज्यूलोकांचा धर्मग्रंथ. त्यात अनेक परमसत्ये आहेत. त्याचबरोबर काही आक्षेपार्ह विधानेसुद्धा आहेत. प्रभू येशुंनी त्या विधानांची चिकित्सा केली अन् तिथे जे जे मानवताविरोधीहोते, त्यात बदल केला आणि तसे शिकवले.

जुन्याकरारात मोझेसने ‘डोळ्यासाठी डोळा' अशी शिकवण दिली होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती, प्राचीनकाळी एखाद्याच्या अपराधाबद्दल संपूर्ण गावाला सामुदायिक शिक्षा केली जात असे. मोझेसने त्यात बदल केला व ‘एकासाठी एक' हा नियम केला. प्रभू येशुंनी आणखी एक पाऊल पुढेटाकून शत्रूला क्षमा करून त्याच्यावर प्रेम करण्याचा आदेश दिला. मोझेसने सांगितले होती की, 'व्यभिचार करू नये,' परंतु माणूस हा केवळ शरीरानेनव्हे तर मनानेदेखील इजाकरू शकतो. म्हणून प्रभू येशू म्हणाले, 'जो कोणी एखाद्यास्त्रीकडे कामूक नजरेने पाहतो, त्याने तिच्याशी आपल्या मनात व्यभिचार केला आहे.' प्रभू येशूनी धर्मग्रंथांची प्रतिष्ठापना माणसाच्या अंत:करणात केली. मासिक धर्मासंबंधी ज्यू समाजात प्रचंड सोवळेओवळे होते. त्याकाळात स्त्रीला अशुद्ध समजले जात होते. तिला घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. मासिक धर्माने पीडित एक स्त्री येशृंकडेआली. प्रभू येशूनी तिला स्पर्श केला आणि सोवळ्या-ओवळ्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांचा रोष झाला. प्रभू येशूना सुळावर चढवण्यामागे तेही एक कारण होते. थोडक्यात धर्मचिकित्सा करणाऱ्यांना प्रसंगी आपल्या प्राणांचेही मोल मोजावे लागते.

आपलादेश बहुधार्मिक आहे. प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मग्रंथांना काळाचा आणि तत्कालीन संस्कृतीचा संदर्भ आहे. धर्मग्रंथांतील काही वचने कालबाह्य होऊ शकतात. त्या वचनामुळे मानवी स्वातंत्र्याचे, प्रतिष्ठेचे आणि हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. धर्मग्रंथातील अशा वचनांची शास्रशुद्ध चिकित्सा झाली पाहिजे आणि ती चिकित्सा त्यात्या धर्मातील धर्मपंडितानी केलेली उत्तम.

दुसऱ्याचेमत विरोधी असले, तरी ते मांडण्याचा त्याचाहक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही. या संदर्भात फ्रेंचविचारवंत व्हॉल्टेअरचे एक वचन उद्बोधकआहे. ते वचन असेआहे की, 'तू जे बोलतोस, ते मला मान्य नाही, तथापि तुला तुझी भूमिका मांडता यावी म्हणून मी माझ्या रक्ताचाशेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढत राहीन.' (I do not agree with what you say, Sir. But I shall guard your right to express your opinion till the last drop of my blood.) स्वत:ची भूमिका पक्कीव ठाम असली की, आपल्याला निराळ्या विरोधी मताची भीती वाटत नाही. उलट निराळ्या विचारांचे स्वागत केले जाते. अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचे लक्षणअसते. अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होत असते.

मूलतत्त्ववाद आणिदेशाचेखरेप्रश्न

____ भारतीयघटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य बहाल केले आहे. 'तुम्हांला सत्य कळेल आणि सत्य तुम्हांला बंधमुक्त करील,' याऐवजी 'सत्य तुम्हांला कळणार नाही, सत्य तुम्हांला अंधारात ठेवील,' अशी काही उद्योगपतींची भूमिका आहे. त्या भूमिकेमुळे प्रसारमाध्यमे आपल्या कह्यात ठेवता येतात. सत्य सांगण्याचा, गैरकृत्ये उघड करणाऱ्या वाहिन्यांच्या पत्रकारांचा आवाज दडपला जातो. त्या वाहिन्या त्यांना सोडाव्या लागतात किंवा अशा निर्भिड पत्रकारांना साम, दाम, दंड, भेद वापरून बोलायला बंद केले जाते. कधी आपल्याला प्रश्न पडतो, आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार, पत्रकार व साहित्यिक मुक्तआहेत का? एक प्रकारच्या अदृश्यदडपणाखाली तर आपण वावरतनाही ना? त्यावेळेस जर्मन कवी मार्टिन न्यूमायर ह्यांनी लिहिलेली कविता तत्कालीन परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकते.

जर्मनीमध्येनाझी पहिल्यांदा कम्युनिस्टांवर येऊन थडकले, धडकले मी कम्युनिस्ट नव्हतोम्हणून गप्प बसलो. त्यानंतर ते ज्यू लोकांवरयेऊन घसरले साहजिकच, ज्यू नव्हतो ना मी मगगप्पच बसलो. नंतर कर्मचारी संघटनांवर ते अगदी तुटूनपडले आपण म्हणजे, मी 'ब्र'सुद्धा काढला नाही. आपला कर्मचारी संघटनाशी काय संबंध? ते मग कॅथोलिकांच्यापाठीस हात धुवून लागले अगदी... तरीपण मी काहीच म्हटलंनाही मी प्रोटेस्टंट होतोअखेरीस... म्हणजे आता ते माझ्या मागेलागले आहेत आणि काय ह्यावेळेस अवाज उठविण्यासाठी हाळी देण्यासाठी माझ्यासाठी काय पण अगदी कुणासाठीकुणीच उरलं नाही...?

मूलतत्त्ववादानेजगभर आपले विद्रूप डोके वर काढले आहेआणि आपल्या ऑक्टोपसी पंजात सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. समाजात पद्धतशीरपणे उन्माद निर्माण केला जातो. भावना भडकावल्या जातात. हिंसाचाराची प्रकरणे घडतात आणि ‘क्रिया-प्रतिक्रिया' हा न्याय लावूनहिंसेचे समर्थन केले जाते. हे सर्व आपणप्रत्यक्ष पाहात आहोत. 'अहिंसा परमो धर्मः' ही आपल्या देशाचीशिकवण आहे. संत तुकाराम म्हणतात, 'कुणाही जिवाचा न घडो मत्सर.' नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. 'वाऱ्याची पेरणी करा आणि झंझावाताची कापणी करा' (Sow the wind & reap the whirlwind) अशी 'बायबल'मध्ये एक म्हण आहे. म्हणून प्रभू येशूने क्षमाधर्माचा पुरस्कार केला. हिटलरने द्वेषाच्या विखाराची पेरणी केली आणि त्याने हिंसेचे उदंड पीक घेतले. 'आर्य वंश सर्वश्रेष्ठ' हा विचार त्यानेमांडला. तो विचार तत्कालीनजर्मन तरुणांना भावला. हिटलरने जर्मनी आणि युरोपच्या इतर देशांमध्ये मिळूनमध्ये सुमारे साठ लाख ज्यूंचा संहार केला. एली वायझेल आणि व्हिक्टर फँकेल यांच्यासारख्या काही विचारवंतांनी त्या नरकवासातून बाहेर पडल्यावर छळछावण्यांतील क्रौर्याची वर्णने आपापल्या ग्रंथात केली आहेत. ती वाचून आपल्याअंगावर शहारे येतात. हिटलरच्या काळी बहुसंख्य जर्मन विचारवंत गप्प बसले, परंतु डिआट्रिच बॉनहॉफर, जेम्स डेल्प आणि इतर काहीजण मात्र हिटलरच्या विरोधात उभे राहिले. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली... प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कुणीही हिटलरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करू शकत नाही. तो राक्षसीपणा होईल. ज्यांना हिटलरचे तत्वज्ञान मान्य आहे, ते माणुसकीचे मारेकरीअसतात.

विचारवंतांचीनिष्क्रियता हा विसाव्या शतकावरीलएक लाजिरवाणा कलंक आहे.

रोगाचेअचूक निदान झाले की, त्यावर जालीम इलाज करता येतात. आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही तर बेकारी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी ह्यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधता व त्यामुळे होणारेउत्पात इ. आहेत. आर्थिकक्षेत्रातील घसरण, बंद होत चाललेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेले बेकारांचे तांडे व त्यांचे उद्ध्वस्तहोत चाललेले संसार ही चिंतेची बाबआहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे. कवी गिरिजाकुमार माथुर म्हणतात,

सब्रकरने की हद भीएक दिन टूट जाती है जब कुछनहीं होता तब क्रांति होजाती है आपले राज्यकर्तेत्याची वाट पाहात आहेत काय? सैतानाप्रमाणे क्रांती आपल्याच लेकरांचा घास घेत असते, हे आपण लक्षातठेवू या.

सत्यम्हणजे जणू एक तळपती तलवारअसते. ते पवित्र असते. सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा असते. त्यामुळे अनेकांना विशेषत: लोकशाहीच्या विरोधकांना सत्य मानवत नाही आणि पचतही नाही.

साहित्याच्यानिर्मितीसाठी लेखकावर कुठल्याही प्रकारची बंधने नकोत. जेव्हा त्याच्यावर बंधने येतात, तेव्हा त्याचे लेखन पोपटपंची ठरण्याची शक्यता जास्त असते. लेखकाला हुजऱ्याची भूमिका पार पाडायची नसते; तर त्याला द्रष्ट्याच्याभूमिकेत जावे लागते. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे. मातृभाषा हे आपल्यासाठी सहजसोपेअसे अभिव्यक्तीचे साधन आहे.

***

३. मातृभाषेस जिवे मारिले?

आपणआईच्या दुधातून आपल्या बोलीभाषेचे धडे घेतले. त्यानंतर अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मायबोलीतून आपले शालेय शिक्षण झाले आणि मायबोली मराठीशी आपली नाळ जुळली गेली. मातृभाषेबरोबरची नाळ तुटली की संस्कृतीपासून फारकतहोण्यास फारसा वेळ लागत नाही. भाषा ही संस्कृतीकडे उघडणारीखिडकी असते.

आपल्याअस्तित्वाचा अर्थ आपल्या अध्यात्म-जीवनात दडलेला आहे. ख्रिस्ती अध्यात्म आणि धार्मिक जीवनाचा परिचय मला मराठीच्याच माध्यमातून झाला. चर्चमध्ये मराठी भक्तिगीते कानांवर पडली. आत्म्याचे पोषण करणारी येशूची वचने मराठीतून ऐकली. धर्मगुरूंनी मराठीतून केलेल्या बायबल निरूपणाचे धडे काळजाच्या कप्प्यात साठवले. थोडक्यात, आमचा आध्यात्मिक पिंड मराठीवर पोसला गेला. पडक्या किल्ल्याच्या बुरुजावर डौलाने वाढणाऱ्या पिंपळरोपट्याची मुळे ‘जीवनाचा' शोध करीत करीत धरणीमातेच्या गर्भात पोहोचावीत, त्याप्रमाणे मायबोलीच्या संस्काराची पाळेमुळे मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या कंदापर्यंत पोहोचली आहेत. मातृभाषेच्या परिचयामुळे ज्ञानोबांचे काव्यमय गीता-तत्त्वज्ञान, तुकोबांचे रांगडे अध्यात्म, जनाबाईंची भावविव्हळ भक्ती, फादर स्टीफन्सनी केलेला शोकरसाचा हृदय हेलावणारा आविष्कार, शाहिरांच्या लावण्यांतून व्यक्त होणारा खट्याळ शृंगार, दलित साहित्यातून व्यक्त होणारी भळभळती वेदना या साऱ्यांचा आस्वादमला मराठी भाषेतून घेता आला. किती परमभाग्ययोग आहे हा !

इंग्रजी माध्यमाचेआव्हान

१९८०च्यादशकात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची त्सुनामी देशभर आली. १९९१मध्ये आपल्या देशाने मुक्त आर्थिक धोरणाचा अवलंब केला. मुक्त बाजारपेठ आली. सर्व क्षेत्रांत स्पर्धा आली. राष्ट्राराष्ट्रांतील सीमारेषा पुसट झाल्या. 'ग्लोबलाइज्ड' जगामध्ये टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषा सर्वांना आवश्यक आणि अपरिहार्य वाटू लागली; कारण ती धनाची भाषाझाली होती. आपण मराठी माणसे तशी चतुर आहोत. आपण अगोदरच सोयीस्कर म्हणींचा साठा करून ठेवला आहे. 'माय मरो नि मावशी जगो', ही अशीच एक म्हण आहे. 'मराठी माय मरो नि इंग्रजी मावशीजगो', असेच जणू आपण ठरवले आहे. इंग्रजी ही जागतिक संपर्काचीभाषा आहे. तिच्यावर निश्चितच प्रभुत्व मिळवावे. आजच्या परिस्थितीमध्ये फ्रेंच, जर्मन, जपानी आदी इतर परदेशी भाषाही शिकाव्यात, कारण त्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक झाल्या आहेत. न्यूनगंडाच्या किंवा वृथा राष्ट्राभिमानाच्या आहारी जाऊन, इंग्रजी किंवा कुठल्याही भाषेचा दुस्वास करणे अयोग्य आहे. बहुभाषिक असणे ही आधुनिक काळाचीगरज आहे.

जगभरइंग्रजी भाषेचा प्रभाव वाढतो आहे, हे सूत्र फ्रान्स, जर्मन, इटली, पोर्तुगाल, स्पेन इ. युरोपियन राष्ट्रांनीमान्य केले आहे. तथापि इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडलेल्या नाहीत, तर ते आपल्याराष्ट्रीय भाषेतच शिकत आहेत. इंग्रजी शिकण्यासाठी ब्रिटनने सुलभ अभ्यासक्रम तयार केले आहेत. सुट्टीच्या दिवसांत युरोपातील मुले त्या अभ्यासक्रमांचा लाभ घेतात व कामचलाऊ इंग्रजीशिकतात. याच धर्तीवर परदेशी नागरिकांनी फ्रेंच शिकण्यासाठी फ्रान्सने 'अलायन्स फ्रान्से' व जर्मनीने जर्मनभाषा शिकण्यासाठी ‘गटे इन्स्टिट्यूट' सुरू केल्या आहेत व आपली भाषापरकीयांना दोन-तीन महिन्यांत शिकण्याची सोय केली आहे. त्या संस्थांच्या शाखा पुणे-मुंबईत आहेत. आपल्याकडे अन्य भाषकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी डेक्कन कॉलेज निरनिराळे प्रयोग करीत आहे. थोडक्यात शिक्षणाचे माध्यम आमूलाग्र न बदलतासुद्धा एखादीभाषा शिकता येते.

इंग्रजीभाषा शिकताना मायबोलीचा बळी का द्यावा? इंग्रजीभाषा महत्त्वाची असली, तरी ती मातृभाषेची जागाकधीच घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत गेले, तेव्हा देशातील शिक्षणतज्ज्ञ, भाषापंडित आणि शासन ह्यांनी एकत्र येऊन, मायबोलीचे संवर्धन करीत असताना, सुलभपणे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे, यासंबंधी पर्याय शोधून काढायला हवा होता. त्यात ते कमी पडले. काही मोजक्या व्यक्तींनी तशा प्रकारचे प्रयोग सुरू केले. उदा. मायबोलीकडे दुर्लक्ष न करता इंग्रजीकसे अस्खलितपणे शिकता येते, हा प्रयोग मॅक्झिमबर्नसन ह्यांनी फलटणला

आपल्याशाळेत यशस्वीपणे राबवला. हसत-खेळत कसे शिकवावे, हे तंत्रही त्यांनीआपल्या शाळेला लागू केले. मी त्या शाळेलाभेट दिली व तेथील विद्यार्थ्यांशीसंवाद साधला. मी त्यांना विचारले, 'तुम्हाला सुट्टी आवडते की शाळेत यायलाआवडते?' त्यांनी एकसुरात उत्तर दिले, ‘शाळेत, शाळेत, शाळेत !' मॅक्झिमबाईंनी आपल्या मुलांना फक्त विषय शिकवले नाहीत, तर त्यांना शाळेचालळा लावला. तसे प्रयत्न पुण्यालाही झाले; परंतु दुर्दैवाने ते लोण संपूर्णमहाराष्ट्रभर पसरले नाही. उलट इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी पालकांनी सोपा मार्ग स्वीकारला, तो म्हणजे बालवर्गापासूनइंग्रजी माध्यमाच्या शाळांचा स्वीकार केला. प्रश्न माध्यमांचा नसून शिक्षणाच्या दर्जाचा आहे. तो दर्जा आपणमराठी माध्यमांच्या शाळांत सांभाळला आहे का?

पालकांनाइंग्रजी माध्यमाच्या शाळांची मोहिनी पडली आहे. इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केल्यामुळे इंग्रजी भाषेचा पगडा शहरातल्या लोकांवर अजूनही आहे. त्यांच्या भाषेबरोबर त्यांच्या संस्कृतीचाही ! मे. पु. रेगे ह्यांनी आपल्या 'मधली स्थिती' या लेखात म्हटलेआहे की, आपण फक्त भाषा घेत नाही, तर तिच्याबरोबर आलेलेपॅकेजही आपल्याला स्वीकारावे लागते. भाषेबरोबर संस्कृतीचे आदिबंध जोडलेले असतात. विशिष्ट भाषा ज्या संस्कतीमधन विकसित झालेली असते. ती त्या संस्कतीमधीलभल्या-बऱ्या गोष्टी आपल्याबरोबर घेऊन येत असते. इंग्रजी भाषा ही पाश्चात्त्य संस्कृतीचीअग्रदूत आहे. उदा. इंग्रजी माध्यमातल्या मुलांनी 'आई' नि 'बाबा' हे शब्द हद्दपारकेलेले आहेत, त्याऐवजी ते 'मम्मी' आणि 'डॅडी' असे म्हणतात. त्याची काही जरूरी आहे का? अन्य भाषेतून मराठी शिकणारे त्यांच्या मातृभाषेतील संज्ञा बदलत नाहीत. आपणास ती गरज काभासते? कारण आपला न्यूनगंड ! मल्याळी, तमिळ, कोकणी, बंगाली आदी भाषक अवश्य इंग्रजी शिकतात, मात्र एकमेकांशी संवाद साधताना कटाक्षाने आपल्या मातृभाषेचाच वापर करतात.

शिकले, सवरलेले शहरांतले लोक ज्या मार्गाने जातात, त्यांचेच अनुकरण बहुजन समाज करीत असतो. आज खेड्यापाड्यांपर्यंत इंग्रजी माध्यमाच्याशाळांचे लोण पसरत आहे. याचे कारण पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू समाजाने मराठी माध्यमाचा पूर्णपणे त्याग करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा केलेला स्वीकार. त्याअर्थाने ते खरे मराठीभाषेचे मारेकरी आहेत. यांची मुले शिकून परदेशी जाणार आणि आमची मुले मात्र खेड्यांतच राहणार का? या भयगंडाने इतरांनापछाडले आहे. म्हणून खेड्यापाड्यांतील लोकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढला आहे. कारण त्यांच्यापुढे इंग्रजी भाषा सुलभपणे शिकण्याचा दुसरा पर्याय नव्हता.

मायबोलीचा प्रश्न

प्रत्येकलोकसमूहाचे सांस्कृतिक संचित असते. रीतीभाती, सणसोहळे, भावभावना असतात. त्यांचा आविष्कार त्या त्या लोकसमुदायाच्या मातृभाषेतून होत असतो. त्या त्या भाषेच्या शब्दकळेतून, म्हणी-वाक्प्रचारांतून, लोकसंगीतातून संस्कृती व्यक्त होत असते. त्यासाठी मायबोलीचे संवर्धन करणे अत्यावश्यक असते. भाषेच्या माध्यमातून मनाच्या मातीत मूल्ये झिरपत असतात. नातेसंबंधाच्या धाग्यांची घट्ट वीण साधण्यासाठी भाषा मोलाचे योगदान देत असते. आपल्या देशात भाषावार प्रांतरचना हे सूत्र लावण्यातआले. हेतू हा की, त्यात्या राज्यातील मातृभाषेचा सर्व बाजूंनी विकास व्हावा. त्या दृष्टीने सुरुवातीला काही प्रयत्नही झाले. मात्र अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे स्तोम वाढल्यामुळे मायबोलीकडे दुर्लक्ष होत आहे.

__ जागतिकीकरणाच्यामहापुरात अनेक वृक्ष कोसळून पडत आहेत. देशीवादाची पाळेमुळे उखडली जात आहेत. ज्यांच्या अबोध मनात न्यूनगंडाने घर केले आहे, ते सहज परक्या संस्कृतीला बळी पडतात आणि हळूहळू त्यांना आपल्या अस्मितेचा विसर पडतो. आज पाश्चिमात्य संस्कृतीनेजीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. अशा वेळी आपल्या देशीपणाचे, आपल्या मायबोलीचे जतन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. एकेकाळी बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी असलेले मार्क टली हे ब्रिटिश पत्रकारसांगतात, 'तुम्हांला एखादा समाज नष्ट करायचा असेल, तर त्याची मातृभाषानष्ट करा.' (If you want to destroy a people, destroy it's language). मायबोलीचीहेळसांड करून आपण निराळे काय करीत आहोत?

मराठीच्या अस्तित्वाचालढा

निझामशाहीतमराठी भाषेची गळचेपी होत होती, तेव्हा (१९४३ साली) श्री. म. माटे म्हणालेहोते, “आपली मातृभाषा जितक्या ठिकाणांहून हाकून देता येण्यासारखी आहे, तितक्या ठिकाणांहून तिची हकालपट्टी होत आहे. मराठीच्या शाळा बंद होत आहेत. राजदरबारी तिला कसलीही प्रतिष्ठा उरलेली नाही.” ही स्वातंत्र्यपूर्व काळातली व्यथा.

स्वातंत्र्यानंतरदहा वर्षांनी म्हणजे १९५७ साली झालेल्या अ. भा. मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्री. वि. द. घाटे यांनीएक स्वप्न रंगवले होते. ते म्हणाले होते, “माझी मायमराठी भाषा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसली पाहिजे आणि तिने प्रेमाने भरवलेला घास आमच्या सर्वांच्या पोटात गेला पाहिजे.”

१९६०साली महाराष्ट्राला सिंहासन लाभले. मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले, तरी मराठी भाषेला सिंहासन लाभले का? या प्रश्नाचे उत्तर१९८९ साली झालेल्या जागतिक मराठी परिषदेत सापडते. परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी कुसुमाग्रज गहिवरून म्हणाले, "स्वातंत्र्याच्या चाळीस आणि राज्यस्थापनेच्या पंचवीस वर्षांनंतरही, मराठीला आपले हक्काचे सिंहासन अद्याप मिळालेले नाही आणि ते मिळत नाहीयाचे कारण ते रिकामे नाही. या मातीशी कोणतेही नाते नसलेल्या एका परकीय भाषेने, इंग्रजीने, ते बळकावले आहे. आज मराठी भाषा लक्तरांमध्ये मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.'' भाषा केवळ व्यवहाराचे नियमन करणारे निर्जीव साधन नाही, ती भावभावनांच्या प्रकटीकरणाचीजातिवंत वस्तुस्थिती आहे, हे आपण केव्हालक्षात घेणार आहोत?

अव्वलइंग्रजी काळात उच्चभ्र वर्गाने इंग्रजीच्या बळावर सरकारी नोकऱ्या मिळवल्या. इमानेइतबारे त्यांनी परक्या सरकारची सेवा केली.

दुसऱ्याबाजूला परकीय मिशनरी मात्र मराठी भाषेची सेवा करीत होते आणि ___ मराठी भाषेमध्ये लेखन करीत होते. उदा. मोल्सवर्थचा शब्दकोश (१८३१). विल्यम कॅरी ह्यांनी मराठी भाषेचे व्याकरण १८०५मध्ये लिहिले. त्यांनी वैजनाथ पंडित ह्यांच्या सहकार्याने 'मॅथ्यूचे शुभवर्तमान' हे बायबलमधील पुस्तकदेवनागरी लिपीत बंगालमधील सेरामपूर येथून प्रसिद्ध केले. त्यांनी १८१५मध्ये कोकणीतही हेच शुभवर्तमान प्रसिद्ध केले.

विल्यमकॅरीप्रमाणे थॉमस कँडीनेही मराठी भाषेची केलेली सेवा मोलाची आहे. त्याने 'विरामचिन्हांची परिभाषा' हे पुस्तक १८५०साली प्रसिद्ध केले, तसेच त्याने मराठी भाषेमध्ये पाठ्यपुस्तकेही लिहिली.

मिशनऱ्यांच्यामराठी साहित्याचा सविस्तर परिचय डॉ. श्री. म. पिंगे, डॉ. गंगाधर मोरजे ह्यांनी 'मराठी वाङ्मयाचा अभ्यास' ह्या आपल्या ग्रंथात करून दिलेला आहे. बाबा पद्मजींनी (१८३१ ते १९०६) 'शब्दरत्नावली' हा कोश लिहिला, तसेच संस्कृत-मराठी कोश तयार केला. त्यांनी म्हटले आहे, 'सर्वांस इंग्लिश भाषेने वेडावून टाकले आहे. त्यांचा मातृभाषेबाबत अभिमान व प्रेम कमीव ती शुद्ध रीतीनेबोलणे व लिहिणे याबाबतउपेक्षा वृत्ती फार. हायस्कूलांतून सर्वच विषय इंग्रजीतून शिकवितात. त्यामुळे मूल जसे लहानाचे मोठे होते, तसे त्यास इंग्रजी भाषेचा संबंध अधिक जडतो. इंग्रजीचा अधिक प्रभाव राहतो व मराठीची उपेक्षाहोते.'

इंग्रजीबद्दलअहंगंड व मराठीबद्दल न्यूनगंडहा आजार खूप जुना आहे. साहेब गेल्यावरही, साहेबांच्या भाषेविषयी अतिप्रेम आणि स्वत्वाविषयी सुप्त न्यूनगंड उच्चवर्णीयांत कायम आहे. त्याला आपल्या पोटापाण्याची आणि नोकरीधंद्याची फार मोठी काळजी. आज इंग्रजी उपयुक्तआहे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळांपुढे लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात.

__ परभाषेच्यामाध्यमामुळे भाषा आणि संस्कृती यांच्यावर विपरीत परिणाम होतोच. परंतु त्यापेक्षा एक मोठे संकटदेशावर ओढवते आहे, ते म्हणजे देशाच्याअभंगत्वाला सुरुंग लागण्याची भीती निर्माण झाली आहे. 'आहे रे' आणि 'नाही रे' असे दोन वर्ग देशात आहेत. 'आहे रे' हे इंडियाचे (रेसिडेंट) सिटिझन, तर 'नाही रे' हे भारताचे साधेभोळेनागरिक. इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी हे 'इंडिया'तील असतात. इंग्रजी शाळांत प्रवेश मिळवणे हे त्यांच्यापुढील एकमेवध्येय असते. महागडी कॅपिटेशन फी त्यांनाच परवडते. सुटाबुटांतील ती मुले सहलीसाठीपरदेशांतही जातात. याउलट, भारतातील मुलांच्या काही शाळांत, अजून खडूफळा पोहोचलेला नाही. उच्चभ्रू शाळांतील मुले पॉकेटमनी म्हणून जितका खर्च महिन्याला करतात, तितके या गरीब मुलांच्यापालकांचे मासिक उत्पन्नसुद्धा नसते. भारत पाकिस्तान फाळणीपेक्षा इंडिया-भारत ही फाळणी अधिकघातक आहे.

मायबोलीमराठीवर आपले आतड्यापासून प्रेम आहे का? हा खरा प्रश्नआहे. ज्याच्यावर आपले प्रेम असते, त्याच्यासाठी आपण कुठलाही त्याग करण्यास, दिव्य करण्यास, अगदी प्राण द्यायला सुद्धा तयार असतो. सगळा न्यूनगंड दूर सारून, आपल्या ओठांनी नव्हे, तर आत्म्याने मराठीतबोलू या आणि मुला-नातवंडांशी मराठीत संभाषण करू या. त्यामुळेच त्यांना मायबोलीची गोडी लागेल.

मायबोलीवरकसे प्रेम करावे, हे गोव्यातील कोकणीभाषक लोकांकडून आपण शिकू शकतो. गेल्या पन्नास-साठ वर्षांत कोकणी भाषकांनी आपल्या मायबोलीला वैभव प्राप्त करून दिले आहे. शासनाकडे आशाळभूत नजरेने न पाहता, प्रसंगीशासनाची उदासीनता असतानाही, त्यांनी कोकणी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. स्वबळावर पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. व्याकरणाची पुस्तके उपलब्ध नसताना, श्री. सुरेश बोरकार ह्यांनी व्याकरण रचले. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विश्वविद्यालयीन स्तरांवर कोकणी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सारखी वाढ होते आहे. प्राथमिक शाळेत कोकणी माध्यम आणि पुढे इंग्रजी माध्यम असा प्रयोग गोव्यात सुरू आहे.

वयाच्यासातव्या वर्षांपर्यत जे संस्कार होतात, ते धन आयुष्यभर पुरतअसते. ह्याच वयात मातृभाषेचा संस्कार झाला पाहिजे, ह्याची जाणीव जगात सर्वत्र आहे म्हणून मूठभर आशियाई देश सोडले (त्यात भारत आघाडीवर आहे), तर सर्वत्र मायबोलीहेच शिक्षणाचे माध्यम आहे. तिथे दुय्यम भाषा म्हणून अन्य भाषा आवडीने शिकवल्या आणि शिकल्या जातात.

मायबोलीच्यासंवर्धनाचे आणखी एक उदाहरण. इसवीसनाच्या पहिल्या शतकात इस्राएलमध्ये झालेल्या परकीय अत्याचारामुळे मोठ्या प्रमाणात ज्यू लोक जगभर पांगले गेले. ते त्या त्यादेशाच्या संस्कृतीशी ___ एकरूप झाले. त्यांनी स्थानिक भाषा अवगत केल्या. त्यांच्या प्रार्थना मात्र

हिब्रूभाषेत होत असत. १९४८ साली इस्राएलला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर जगभर विखुरलेले ज्यू लोक इस्राएलला परतू लागले. त्या सर्वांना एकत्र ठेवून संस्कृतीऐक्य कसे साधावे, असा प्रश्न तत्कालीन शासनाला पडला. म्हणून त्यांनी प्राचीन हिब्रू भाषेचे आधुनिकीकरण केले. एक माणूस आपल्याजिद्दीच्या बळावर कसे आपल्या प्राचीन भाषेचे पुनरुज्जीवन करू शकतो हे आपल्याला एलिझेरबेन यहुदा यांच्या 'टंग ऑफ द प्रॉफेटस्' या चरित्रावरून जाणवते. हिब्रू भाषा ही इस्राएलची राष्ट्रभाषाअसून ती त्यांची संपर्कभाषाआहे. त्यांचे इंग्रजीवरही प्रभुत्व आहे...

कोकणीआणि हिब्रू ह्या भाषांनी आपले अस्तित्व टिकवले, त्यासाठी त्यांना भगीरथ प्रयत्न करावे लागले. आपल्यालाही मातृभाषेचा बळी न देता इंग्रजीशिकता येईल की नाही? इच्छाअसेल तर अशक्य असंकाहीच नाही. जी मुले मातृभाषेतअस्खलितपणे वाचन करू शकतात, ती नंतर इंग्रजीतहीचांगली प्रगती करतात. झांबिया देशाने केलेल्या प्रयोगाचे उदाहरण घेऊ या. त्या प्रयोगानुसार, काही निवडक मुलांना पहिल्या इयत्तेत इंग्रजी व मातृभाषेचे धडेदेण्यात आले, तर इतर मुलांनापहिल्या इयत्तेत फक्त मायबोलीचे आणि दुसऱ्या इयत्तेपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यात आले. त्यानंतर निरीक्षण केल्यावर आढळून आले की, पहिल्या इयत्तेत ज्यांना दोन भाषा शिकवल्या गेल्या त्या मुलांपेक्षा, ज्यांना पहिल्या इयत्तेत फक्त मायबोली आणि दुसऱ्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवण्यात आले त्यांनी इंग्रजी वाचन आणि लेखन या दोन्ही बाबतींतलक्षणीय प्रगती केली. तसेच त्यांचे मातृभाषेचे ज्ञानही मोठ्या प्रमाणात वाढले. झांबियन शासनाने ही पद्धत नंतरसंपूर्ण देशाला लागू केली.

___ बालवर्गापासूनमायबोली मराठीचे बाळकडू पाजणे हाच मराठी वाचवण्याचा रामबाण उपाय आहे. त्याला पर्याय नाही.

ट्यूशनसंस्कृती

वाचनसंस्कृती मंदावली आहे, अशी सर्वत्र ओरड आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात.

शिक्षणाचेमाध्यम बदलले. वर्गात इंग्रजीत शिकवलेले मुलांना फारसे समजायचे नाही. त्यासाठी ट्यूशनची गरज भासू लागली. कारण घरातील व व्यवहारातील भाषामराठी अन् शाळेतील भाषा इंग्रजी आणि सर्व विषय इंग्रजीत. मुलांची इंग्रजी शब्दसंपत्ती अतिशय मर्यादित, त्यामुळे त्यांना शिकणे अवघड झाले. पालकांना चिंता लागली आणि इंग्रजीवर तितके प्रभुत्व नसल्यामुळे ते इंग्रजी शिकवणीघेऊ शकले नाहीत. आणि ट्यूशन संस्कृती उदयास आली. हळूहळू तो जोडधंदा बनला. त्याचे व्यापारीकरण झाले. त्याला संस्थात्मक रूप प्राप्त झाले व त्यातून ट्यूशनसम्राटनिर्माण झाले. लाखो रुपयांची पॅकेजेस जन्माला आली.

ट्यूशनसंस्कृतीचेअजून एक कारण म्हणजेशाळा-महाविद्यालयांतील शिक्षणाचा घसरलेला दर्जा. ट्यूशन-सम्राटांनी शाळेतील उत्तम शिक्षकांना आपल्याकडे ओढले. ते वर्गात थातुरमातुरशिकवायचे आणि ट्यूशनवर्गात मात्र जीव ओतून शिकवू लागले. शाळा-महाविद्यालय आणि ट्यूशनवर्ग ह्यांतील फरक विद्यार्थ्यांना जाणवला. आता तर 'इंटिग्रेटेड कॉलेज' हा नवा प्रकारचालू झाला आहे. ही पद्धत म्हणजेभ्रष्टाचाराचा कळस आहे. त्यात सामील झालेले सारे शिक्षक व प्राध्यापक ह्यांनाशिक्षकदिनी आणि गुरुपौर्णिमेला 'गुरुः साक्षात परब्रह्म' म्हणून विद्यार्थ्यांकडून स्वत:भोवती आरती ओवाळून __ घेताना काहीच वाटत नसेल का? ट्यूशनसंस्कृतीमुळे बिचाऱ्या पालकांवर

लाखोरुपयांचा भार पडतो आहे. म्हणजे शिक्षण ही फक्त श्रीमंतांचीचमक्तेदारी बनली आहे.

युरोपातकुठेही मुलांसाठी ट्यूशन्स लावल्या जात नाहीत, कारण खाजगी किंवा सरकारी शाळांचा दर्जा सारखाच आहे. पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करतात, कारण खाजगी शाळांची फी अव्वाच्या सव्वाअसते. तसेच तेथे पालकांसाठी ट्यूशन्स असतात, पण त्या सुजाणपालकत्वासाठी!

आताबिगरीपासून डिगरीपर्यंत ट्यूशनशिवाय मुलांचे पान हलत नाही. त्यामुळे मुलांचा सगळा वेळ निरनिराळे छंदवर्ग, शाळा-महाविद्यालय व ट्यूशन वर्गातजातो. पावसात भिजायचे त्यांचे वय निघून जातेआहे. त्यांना ना अवांतर वाचनासाठीवेळ, ना खेळासाठी वेळ. हा मुलांवर केला जाणारा जुलूम आणि अत्याचार आहे. या जुलमाचे वाटेकरीपालक, शासन आणि ट्यूशनसम्राट आहेत. आपल्याला ट्युशनमुक्त भारत कसा करता येईल? निदान ट्यूशनमुक्त रविवार तरी करता येईल का? म्हणजे मुलांना पालकांच्या आणि पालकांना मुलांच्या संगतीत एक दिवस तरीघालवता येईल. पालकांनी मुलांसाठी वेळ काढून ठेवला पाहिजे.

पालकआणि मार्काचा बुडबुडा

मुलांचीस्थिती आज शर्यतीच्या घोड्यासारखीझाली आहे. घोड्यावर ज्यांनी पैसे गुंतवले आहेत, त्यांना आपला घोडा पहिला यावा, असे वाटते; पण घोड्याला तसेवाटते का? आपल्या मुलाने ९८%, ९९% मार्क मिळवावेत, त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा व परदेशात जातायावे, ही पालकांची इच्छाअसते. या संदर्भात डॉ. अमर्त्य सेन ह्यांचे मत लक्षणीय आहे. ते म्हणतात, “भारतात पहिला येणाऱ्याचे फाजील लाड होतात. भारतामध्ये आय. टी., आय. ए. एस., डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. ह्यांनाविशेष भाव आहे. त्यासाठी पालकांचे प्रयत्न चाललेले असतात. त्यामुळे पहिला क्रमांक हे भारतीयांचे सामाजिकवेड झाले आहे" ह्या वेडामुळे पालकांना वाचनसंस्कृतीचे काहीही पडलेले नाही.

डॉ. अमर्त्य सेन ह्यांच्या ह्या मार्मिक चिंतनाकडे आपण कधी लक्ष देणार आहोत? मुलांचा कल जिकडे असतो, त्याविषयात त्यांना रस असतो. एखादाकमी गुण मिळालेला मुलगा आयुष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावही काढू शकतो. ह्या गुणांच्या स्तोमाचा प्रभाव प्रसारमाध्यमांवरही पडत आहे. त्यांची छायाचित्रे पहिल्या पानावर प्रसिद्ध करून बालवयामध्ये त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. कधीकधी दहावी-बारावीत प्रथम आलेल्या मुलांची ही धुंदी पुढच्याप्रवासात उतरते. अशा उच्च गुण मिळालेल्या मुलांचे काही संस्था 'गुणवंतांचे सत्कार' ह्या नावाखाली सत्कार करीत असतात. अशा किती गुणवंतांनी पुढे देशाची, गोरगरिबांची सेवा केलेली आहे? अण्णा हजारे ह्यांनी 'नापासांची शाळा' हा वेगळाच प्रयोगचालू केला आहे. तथाकथित गुणसम्राट विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे, त्यांना इतरांबरोबर वर कसे आणतायेईल, याचा विचार करणे आवश्यक आहे.

***

४. मराठीच्या बोली

बोलीभाषाहे मातृभाषेचे निर्झर आहेत. बोली ही जीवनपद्धतीचा आविष्कारअसते. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा असतात. बोलीला आणि समाजजीवनाला विभक्त करता येत नाही. आपल्या मातीचा गंध घेऊन येणारी बोली मातेच्या गर्भाशयाचे जणू अस्तर असते. शब्दकोश ह्या शब्दाचा अर्थ असा की कोश जसाएखाद्या किटकाच्या गर्भातील तंतूपासून निर्माण होतो आणि त्यातूनच नवा जीव जन्माला येतो. तसेच आईच्या गर्भकोशातून बाळ जन्माला येते. ती ज्या संस्कृतीतवावरते, ज्या भाषेत विचार करते त्याच भाषेत बाळ बोलू लागते आणि परिसराच्या परिणामातून त्याची भाषा जन्माला येते. त्यातून भावनांची अभिव्यक्ती होऊ लागते आणि सांस्कृतिक शब्दकोश विणला जाऊ लागतो. भाषेच्या अंकुराचा शोध घेण्याचा प्रयत्न मोल्सवर्थ (१७९५ - १८७१), जॉर्ज आब्राहाम ग्रिअर्सन (१८५१ - १९३९) आणि अलीकडे गणेश देवी (१९५०) इत्यादींनी आपल्या भाषाशास्त्रीय अभ्यासातून केलेला आहे. शब्दकोश तयार करून आपल्या तळपातळीचा शोध त्यांनी घेतलेला आहे. येथेच आपल्या संस्कृतीच्या खुणा आपणास सापडतात.

महाराष्ट्रामध्येशेकडो बोली भाषा आहेत. ह्या बोली मराठी नामक महानदीचे झरे आणि ओढे आहेत. ह्याचे प्रत्यंतर बोली भाषांमधून आणि बोलींमधून विशेषकरून दिसून येते. आपल्या एका गीतात बहिणाबाई चौधरी म्हणतात,

माय म्हणताम्हणताहोटहोटालागीभिडेआत्याम्हणताम्हणताकेवडंअंतरपडेताताम्हणताम्हणतादातांमधीजीभअडेकाकाम्हणताम्हणताकशीमांदेमांदेदडेजिजीम्हणताम्हणताझालाजिभेलेनिवारासासूम्हणताम्हणतागेलातोंडातूनवाराभारतीयसंस्कृतीकुटुंबवत्सलआहे. नात्यागोत्यांच्याजाळ्यातआपण वावरत असतो. त्याचे प्रत्ययकारी प्रतिबिंब या गीतात पडलेआहे. प्रतिभावंत बहिणीबाईनी नात्यातील जवळीक किंवा दुरावा उच्चारांवरून गमतीदारपणे स्पष्ट करून दाखवला आहे. इंग्रजीने 'कजन' (cousin) या एका शब्दातसर्व नात्यांची एक मोळी बांधलीआहे. मराठीत मात्र प्रत्येक नात्याचे वेगळेपण दाखवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही आमची भाषिकश्रीमंती नाही का? बहिणाबाईच्या या गीताचे इंग्रजीतभाषांतर करता येईल का? प्रत्येक भाषेचे आणि बोली भाषेचे अशा प्रकारचे अंगभूत सौंदर्य आहे. त्यामुळे सांस्कृतिक वारसा अधिक संपन्न होत असतो.

नदीप्रमाणेसंस्कृती गतिशील असते. आपल्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहून, ती नवनवे बदलस्वीकारीत असते आणि असे करून अधिकाधिक संपन्न होत असते. भाषेचेही तसेच आहे. हे सूत्र ब्रिटिशांनीजपले. त्यांनी सर्व भाषांमधून उधारउसनवारी करून त्यांची भाषा संपन्न केली आणि आजमितीसही ते करीत आहेत. मराठीमध्ये प्रमाण भाषेच्या शुद्धीसाठी प्रयत्न झाले. दरवर्षी इंग्रजी भाषेमध्ये परक्या भाषेतून घेतलेल्या शब्दांची यादीच प्रसिद्ध केली जाते व ती त्यांच्याशब्दकोशात समाविष्टही केली जाते. उदा. बंदोबस्त, गुरू, योग, ठग हे भारतीयमराठी शब्द.

भाषाशुद्धी कीभाषावृद्धी?

आपल्यालाभाषाशुद्धी पाहिजे की भाषावृद्धी पाहिजे? भाषेचा कल नेहमी सुलभीकरणाकडेअसतो. 'स्टेशन' ह्या शब्दासाठी अग्निरथविश्रांति स्थळ असा शब्द भाषा शुद्ध करणाऱ्यांनी सुचवला होता, त्याचे काय झाले? ग्रामीण भाषेमध्ये त्याऐवजी 'ठेसन' असे म्हटले जाते, तर उत्तरेकडे 'इस्टेशन' असे बोलले जाते. डेक्कनक्वीन जेव्हा धावू लागली, तेव्हा रेल्वेकामगार म्हणायचे, 'डाकीण' आली. 'डाकीण' हा शब्द कितीसार्थ शब्द होता ! राक्षसिणीसारखी ती धाडधाड धावतजायची. आपल्याकडे परकी शब्दांना पर्यायी शब्द काढण्याऐवजी त्याचे आपण सरसकट भाषांतर

केलेव त्याला आपण भाषाशुद्धी हे नाव दिले. अभिजनांवर संस्कृत भाषेचा __ पगडा होता. पंडिता रमाबाई ह्यांनी हिब्रू आणि ग्रीक भाषांमधून बायलबचे

मराठीभाषांतर केले. ते संस्कृतप्रचुर झालेलेआहे. त्यामुळे ते दुर्बोध वाटते. संस्कृतला देववाणी म्हटल्यामुळे प्राकृत भाषांकडे तुच्छतेने पाहिले गेले.

संस्कृतवाणीदेवे केली

प्राकृतकाय चोरापासूनी आली? असा सवाल एकनाथांना विचारावा लागला.

संस्कृतही एक प्राचीन भाषाआहे आणि इतर प्राचीन भाषांप्रमाणे तिचेही अंगभूत सौंदर्य आहे. भारतात ती उच्चवर्णीयांची भाषाहोती. एक प्राचीन भाषाम्हणून तिचे जतन अवश्य व्हावे, परंतु ती कुणावरही लादण्याचाप्रयत्न केला जाऊ नये. जेव्हा भाषा लादली जाते तेव्हा प्रतिकार होतो. संस्कृतच्या दबदब्यामुळे पाली आणि अर्धमागधी ह्या भाषा विकसित झाल्या.

बोलीभाषांचे भांडार

मराठीभाषा संपन्न करण्यासाठी बोली भाषांचे खूप मोठे भांडार आपल्या पदरी आहे. शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा असा भेदभाव केल्यामुळे आपल्या बोली अंधारात राहिल्या. परंतु आपल्या पूर्वजांनी, विशेषत: स्त्रियांनी, बोली भाषेतील लोकगीतांद्वारे तिचे जतन केले आहे. खरे म्हणजे भाषेला मातृभाषा असे म्हटले जाते, कारण आपल्या पोटच्या पोराप्रमाणे स्त्रिया आपल्या भाषेचे संगोपन व संवर्धन करीतअसतात. प्रमाण भाषेचा आग्रह आणि त्यानंतर इंग्रजीचे आगमन ह्या प्रकारामुळे बोली भाषेत संभाषण करणे हे अनेकांना कमीपणाचेवाटते. वास्तविक प्रमाण भाषा ही कधी एकेकाळीबोली भाषाच होती ना? बोली भाषांमध्ये शब्दांचे फार मोठे भांडार दडलेले आहे. त्या शब्दसंपत्तीच्या खाणी आहेत.

मराठीभाषेने आता आपल्या बोली भाषांतून शब्दसंपत्ती स्वीकारण्याची वेळ आलेली आहे आणि अशा बोली भाषांच्या शब्दांचे व म्हणींचे कोशतयार झालेले आहेत. उदा. सामवेदी (कुपारी) ही माझी बोलीभाषा. सामवेदी बोलीमध्ये म्हणींचे संपन्न भांडार आहे आणि ते लिखित स्वरूपातउपलब्ध आहे. उदा. 'सक्की आय अन वडापिपळाईहाय, हवतार आय आन ताडामाडायीहाय' (सख्खी आई म्हणजे वडापिंपळाचीसावली, सावत्र आई म्हणजे ताडामाडाचीसावली.) तसेच 'पुढच्याच ठेच मागचा शहाणा' या म्हणीसाठी सामवेदीभाषेत म्हटले आहे. 'पुडश्याओ तुटल्यो वानो, मागसो जालो शानो.' (पुढच्याच्या तुटल्या वहाणा, मागचा झाला शहाणा.) मराठी भाषेनेदेखील सोवळ्याओवळ्यातून बाहेर पडून, अन्य भाषाभगिनींकडून आणि विशेषत: बोली भाषांकडून चपखल प्रतिशब्दांचा स्वीकार करायला हवा. आमच्या वसई तालुक्यात दर दहा मैलांवरबोली भाषा बदलते. उदा. 'कुठे चाललास' ह्या प्रमाण भाषेतील शब्दांसाठी वाडवळी भाषेत 'कटे सालला?', सामवेदी भाषेत 'कडे साललो?' वलकर भाषेत 'कंयला चालला?' आणि कोळी भाषेत 'तू कंय चालला?' अशी विविधता सापडते.

__ भाषा-अभ्यासकांच्या अंदाजानुसार जवळजवळ सहा हजार भाषा व असंख्य बोलीअस्तित्वात आहेत. जर योग्य उपाययोजनाकेली नाही तर येत्या शतकभरातचार हजार भाषा व त्याहून अधिकबोली संपून जातील. मराठीलाही तोच धोका आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बोली भाषांचाअभ्यास

महाराष्ट्रातगणेश देवी ह्यांनी भारतीय भाषांचे सर्वेक्षण करून बोलींच्या अभ्यासाचा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० बोलींचा स्वतंत्रखंड आहे. त्या अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संपादन श्री. अरुण जाखडे ह्यांनी केले आहे. डॉ. अशोक केळकर, डॉ. ना. गो. कालेलकर ह्या भाषाशास्त्रज्ञांनी मराठीला आधुनिक भाषाविज्ञानाची ओळख करून दिली. डॉ. हरिश्चंद्र बोरकर ह्यांनी 'बोली' विषयीचा अभ्यास मांडलेला आहे. बोलींचे महत्त्व ओळखून आज पाठ्यपुस्तकातही त्यांचा समावेशहोत आहे. मराठी साहित्यात अनेक कथा, कादंबरीकारांनी वहाडी, वाडवळी, सामवेदी, मालवणी आणि बोली भाषांचा आपल्या साहित्यात यशस्वीपणे वापर केला आहे.

आंतरराष्ट्रीयपातळीवरही बोली भाषा जिवंत राहाव्यात म्हणून प्रयत्न केले जातात. उदा. लॅटिन अमेरिकेमध्ये सुमारे ८० लाखांपेक्षा जास्त 'केचुआ' ह्या बोली भाषेतून व्यवहार करतात. ह्या भाषेला स्वतंत्र लिपी नव्हती. पण १९७५ पासूनपेरू देशामधील सरकारने प्रयत्न करून रोमन लिपीतून ह्या भाषेचे लिखित स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रोक्साना क्युसो कोलान्तेस हिने 'केचुआ' भाषेचा अभ्यास करून त्या भाषेमध्ये पीएच.डी.चा प्रबंधसादर केला आहे.

भाषेचीमुळं निवडुंगासारखी असतात. ती खूप खोलपोहोचलेली असतात. त्याप्रमाणे मायबोलीची मुळे आपल्या अबोध मनाच्या कोशामध्ये गेलेली असतात. ती उपटून काढतायेत नाहीत. परिस्थितीमुळे व्यवहाराच्या भाषेमध्ये बदल झाला तरी भाषा बोलीच्या रूपाने आपल्या काळजाच्या कोशात ती जाऊन बसलेलीअसते. उदा. वसई-मुंबईतील वळकर किंवा ईस्ट इंडियन बोली. हा समाज मोठ्याप्रमाणात ब्रिटिशांच्या सेवेत होता. काहींनी वसई-उत्तनमधून मुंबईला स्थलांतर केले. मात्र त्यांना आपल्या वळकर बोलीचा मुळीच विसर पडला नाही. वळकर भाषेतील लोकगीतांच्या दरवर्षी स्पर्धाही होतात. यावरून काय दिसून येते? बोलीला मरण नाही.

___आपणहीजर प्रयत्न केले, बोली भाषेशी एकनिष्ठ राहिलो, तर कुठलीही भाषानष्ट होत नाही. त्यासाठी अथक प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत आणि ते तसे होतआहेत, ही आशादायक बाबआहे.

 

५. लेखन, अनुवाद आणि प्रकाशन

आजमहाराष्ट्रातील तळागाळातील घटक साक्षर होऊ लागले आहेत. __ ज्ञान ही शक्ती आहे, ह्याचा अनुभव ते घेत आहेत. ते शब्दांद्वारे व्यक्त होऊ

लागलेआहेत, डोंगरदऱ्यांतून, शेताशिवारांतून, गिरण्याकारखान्यांतून मराठी साहित्याला नवनवे अंकुर फुटू लागले आहेत. मराठीच्या भवितव्याच्या दृष्टीने हे शुभचिन्ह आहे. अलीकडे काही नवोदित लेखकांना साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार मिळत आहेत. राज्य पुरस्कार व साहित्य अकादमीचेयुवा पुरस्कार मिळालेले काही नवे लेखक, कवी हे पेशाने शेतकरीआहेत. त्यांना त्यांच्या साहित्याचे विषय, त्यांच्या कसत्या जमिनीतून आणि उन्हात गाळलेल्या घामातून स्फुरतात.

सध्यामराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते आणि शहराकडे पाहिले तर ते खरेवाटू लागते. परंतु महाराष्ट्र खूप मोठा आहे, व्यापक आहे. तिथे मराठी साहित्याच्या निर्मितीसंबंधी नवनवे प्रयोग चालू आहेत. ही अतिशय स्वागताचीबाब आहे. अशा प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे. लेखक, कवी हे काही प्रयोगशाळेततयार केले जात नाहीत. तरीदेखील नवोदित लेखकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. याबाबत काही प्रकाशनसंस्था तीन-तीन दिवसांच्या लेखन कार्यशाळा आयोजित करतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. नामवंत लेखक आणि प्रकाशक त्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांना लिहिण्यासाठी दिशा सापडू शकते.

अनेकसंस्था निबंध, कथा, व कवितांच्या स्पर्धाघेतात. होतकरू लेखकांकडून लेखन करवून घेतात. ह्या लेखनस्पर्धांमध्ये इंग्रजी माध्यमातील मराठी भाषक विद्यार्थीदेखील सहभाग घेऊन उत्कृष्ट लेखन करतात. काही दिवाळी अंकांमध्ये कादंबऱ्या प्रसिद्ध होतात. नंतर त्या पुस्तकरूपाने बाहेर येतात. लेखनसंस्कृती वाढविण्यासाठी हे सर्व स्तुत्यउपक्रम आहेत.

अनुवाद संस्कृती

जागतिकीकरणामुळेजगाला एका खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपले अनेक मराठी तरुण-तरुणी परदेशात नोकऱ्या करीत आहेत आणि तिथे वास्तव्य करून राहत आहेत. इंग्रजी, अन्य युरोपियन भाषांतून इंग्रजीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांची भांडारे त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. त्यात वाचलेले आणि भावलेले उत्कृष्ट साहित्य हे लेखक, कवीमराठीमध्ये अनुवादित करीत आहेत. 'केल्याने भाषांतर' हे अनुवादाला वाहिलेलेमासिक, आंतरराष्ट्रीय साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देते. काही मराठी प्रकाशक उत्कृष्ट अनुवादकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्याची पुस्तके मराठीत प्रकाशित करीत आहेत. दिलीप चित्रे, चंद्रकांत बांदिवडेकर, शांता गोखले आदींचे अनुवादाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. गेल्या वर्षी (२०१९) मूळ स्पॅनिश लेखक रोबेर्तो आट ह्यांच्या 'Los Siete Locos' ह्या स्पॅनिश पुस्तकाचा अक्षय काळे ह्यांनी तर ‘सात विक्षिप्त माणसे' ह्या नावाने सरळ मराठीमध्ये अनुवाद केला आहे (प्रकाशक - लोकवाङ्मय प्रकाशन).

मराठीलेखक विश्वाची मुलुखगिरी करताना विविध भाषांत आढळलेल्या उत्कृष्ट साहित्याचा मराठी वाचकांना लाभ होणार आहे. तसेच काही मराठी पुस्तके, विशेषत: दलित आत्मचरित्रे इंग्रजीत अनुवादित झाली आहेत आणि इंग्रजीतून ती अन्य युरोपियनभाषांमध्ये अनुवादित होत आहेत. त्यांचे चांगले स्वागत होत आहे.

ह्याग्रंथव्यवहारामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळत आहे.

प्रकाशन व्यवसाय

प्रकाशनहा इतर व्यवसायाप्रमाणे एक व्यवसाय आहे. व्यवसायाची काही गणिते असतात. जिथून चार पैसे मिळतील तिथेच गुंतवणूक केली जाते. प्रकाशन व्यवसायाचे तसेच आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडतात. साहित्य विश्वात ज्यांचा दबदबा आहे, त्या लेखक/कवींची पुस्तके प्रसिद्ध करण्यात प्रकाशक रस घेतात. दुसरीगोष्ट म्हणजे ‘मागणी तसा पुरवठा,' हे अर्थशास्त्रातील सूत्र. कधीकधी मोठे नाव झालेल्या लेखकांचे सुमार लेखनही प्रकाशित होते व वाचकांची फसवणूकहोते.

काहीप्रकाशक उत्तमोत्तम पुस्तकांची निर्मिती करीत आहेत. त्यासाठी खूप मोठे भांडवल गुंतवण्याची जोखीम ते घेतात. कधीत्यांना तोटाही सहन करावा लागलेला आहे. आपली पुस्तके सकस कशी होतील यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठाकरतात. अशा किती तरी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. हे कशाचे द्योतकआहे? वाचक चोखंदळ झााला आहे. ‘मिळमिळीत अवघे टाकून द्यावे आणि उत्कट, भव्य तेचि घ्यावे' या नियमानुसार वाचकउत्तम साहित्याची निवड करीत आहेत आणि उत्तम वितरण व्यवस्थेमुळे त्या प्रकाशकांच्या पुस्तकांचा चांगला प्रसार होत आहे. या प्रकाशकांना आपल्यालेखकांविषयी आत्मियता वाटते आणि लेखकांना त्यांच्याविषयी.

प्रकाशनव्यवसायाच्या काही अडचणी आहेत. ट्रेनमध्ये आजकाल पूर्वीसारखी कुणाच्या हातामध्ये वर्तमानपत्रे/पुस्तके दिसत नाहीत. नेटवरून बातम्या पाहून सोडून दिले जाते. मार्मिक अग्रलेखावर मंथन होत नाही. तसेच समाज मोबाईल, सोशल मीडिया, चॅनेलच्या अति मनोरंजनाकडे

ओढलाजातोय. सवंग किंवा हलक्याफुलक्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो. वाचनसंस्कृतीला हा मोठा धोकाआहे. पुस्तके ही विक्रीची वस्तूठरवून शासनाने जीएसटीचा नियम त्यांना लागू केला आहे. 'पुस्तक निर्मितीसाठी एकूण सुमारे ४७ टक्के जीएसटीभरावा लागत आहे', असे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. (सकाळ १२/१२/२०१८) यामुळे प्रकाशन व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. सांस्कृतिक हासाला दिलेले हे आमंत्रण नाहीका?

प्रकाशनाप्रमाणेवाचनालयांच्याही अडचणी वाढत आहेत. आपल्या वाचकांना चांगली पुस्तके उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो व अनेक वाचनालयांनाचांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पुस्तकांचे डिजिटलायझेनकरीत आहेत. उत्तम पुस्तके खरेदी करीत आहेत. त्यासाठी शासनाकडून मिळालेले अनुदान त्यांना पुरेसे पडत नाही व त्यामुळे तेत्यांच्याकडील सेवकांना योग्य वेतनही देऊ शकत नाही. वाचनालयांच्या अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत.

पुस्तकांच्याकिंमती परवडत नाहीत, अशी काहींची तक्रार असते. __ परंतु त्याचबरोबर सोन्याचाही भाव सारखा वाढत आहे ना? मग सोन्याच्या

खरेदीमध्येखंड पडला आहे का? सणासुदीला कपड्यालत्त्यांवर किती खर्च केला जातो! अलीकडे मध्यमवर्गाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांच्या वार्षिक बजेटमध्ये उत्तम पुस्तकांसाठी किती टक्के रक्कम बाजूला काढली जाते? समाजाचा पुस्तकांबाबत प्राधान्यक्रम बदलला आहे, ही दु:खदबाब आहे.

नवोदित लेखक

नवोदितलेखक, कवींच्या काही तक्रारी आहेत. त्यांच्यापैकी काही होतकरू आहेत. ते बऱ्यापैकी लेखनकरू शकतात. परंतु त्यांची मोठ्या प्रकाशकांपर्यंत जायची हिंमत होत नाही. म्हणून ते परिचयाच्या प्रकाशकाकडेजातात. आपल्या लेखक, कवीचे नाव झाल्याशिवाय प्रकाशक सहसा त्यांचे लेखन प्रकाशित करू इच्छित नाहीत, तर काही लेखक-कवी उधारउसनवारी करून, प्रकाशकांना पैसे देऊन आपले पुस्तक प्रकाशित करतात. पुस्तक प्रकाशित झाल्याचा आनंद त्यांना वाटतो पण पुस्तकांची विक्रीकिती झाली ह्याची माहिती बिचाऱ्या लेखकाला नसते. अशा व्यवहारामुळे __ अनेक संशयास्पद गोष्टी घडतात. ह्या खेळात लेखकांचा बळी जातो. लेखन हा फावल्या वेळातलाछंद नाही. ती एक अखंडसाधना आहे. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ही गोष्ट नवोदितकवी-लेखकांनीही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

चांगलेलेखक हुडकून, त्यांचे उत्तमोत्तम साहित्य आवर्जून प्रकाशित ___ करणारे, लेखक घडवणारे चोखंदळ प्रकाशक लाभणे हे लेखकाचे भाग्य

असते.

*

६. पर्यावरण : श्वासाचीलढाई

लेखन, ग्रंथप्रसार आणि पर्यावरणाचा समतोल ह्यांचे घनिष्ट नाते आहे. कागद करण्यासाठी लगदा लागतो आणि लगद्यासाठी वृक्षतोड करावी लागते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण हे आपले प्राथमिककर्तव्य ठरते.

जागतिकपर्यावरणाने जे उग्ररूप धारणकेले आहे, त्याची माहिती आपणा सर्वांना आहे. ओझोन खिंडार विस्तारत आहे, नद्यांना पूर येत आहेत. अतिवृष्टी, महापूर, वणवे आणि उन्हाच्या झळा यांचे प्रमाण वाढले आहे. जैवविविधतेची अपरिमित हानी होत आहे.

यावर्षीजगभरातील १५३ देशांतील ११५८ शास्त्रज्ञांनी पर्यावरणाबाबत निर्वाणीचा इशारा देत म्हटले आहे की, 'आपण समजत होतो, त्यापेक्षा लवकर ही अत्यवस्थ स्थितीयेऊन ठेपली आहे. आपल्या भवितव्याच्या भल्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल करावे लागणार आहेत.'

गेल्यावर्षीग्रेटा थुनबर्ग ह्या सोळा वर्षाच्या मुलीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून जगाच्या विवेकबुद्धीला आवाहन करणारे, हृदय हेलावणारे भाषण केले. तिने हात जोडून विनंती केली की आमच्या भवितव्यालाधोका निर्माण करू नका.

आजजगाने विविध क्षेत्रात प्रचंड घोडदौड केली आहे. ज्ञान ही शक्ती आहे, हे माणसाने ओळखले. परंतु ह्या शक्तीवर विवेकबुद्धीचा अंकुश नसेल तर ज्ञान धोकादायकठरू शकते. आपले पूर्वज तीरकामठ्यांचा वापर करून युद्धे खेळत असत. आजचा मानव क्षेपणास्त्रांचा वापर करतो. ही प्रगती झालीका?

अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य

___ज्ञानाच्याविकासाबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही विकास झाला __ आहे. मला जे पटते, माझ्याजे सोयीचे आहे, मला जे उपयुक्त आहेते करण्यास मी पूर्णपणे मोकळाआहे. त्या माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कुणीही निर्बंध आणू शकत नाही. म्हणून जे जे शक्यआहे, ते अनुज्ञ आहे. ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. उदा. जीवनसंहारक अण्वस्त्र बनवायचे ज्ञान माझ्याकडे आहे आणि मी ती बनवूशकतो. समुद्रामध्ये भराव टाकून जमीन वाढवण्याचे तंत्रज्ञान मला अवगत आहे, साधनसामुग्री माझ्याकडे आहे आणि मी ते करणार. माझ्याकडे ज्ञान आहे, धन आहे आणिमला स्वातंत्र्यही आहे म्हणून मी गरीब राष्ट्रांतीलसाधनसामुग्रीची राजरोसपणे लूट करू शकतो. ह्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विकास म्हणता येईल का? ज्ञान आणि स्वातंत्र्य अंतिम मानले गेले आहे. आगीवर तेल पडावे त्याप्रमाणे त्याला सापेक्षवादाची आणि उपयुक्ततावादाची जोड मिळाल्यामुळे मानवी जीवनासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्ञानाच्या विस्फोटाने आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावावर सर्वकाही करता येते अशी भूमिका घेतल्यामुळे आज जगात पर्यावरणाच्याविध्वंसाने कळस गाठला आहे.

ज्ञानआणि वैयक्तिक स्वातंत्र्य ह्यांचा जसा विकास झाला, तसा नैतिकतेचा विकास झाला नाही. विवेकबुद्धीची धार तीक्ष्ण झाली नाही कारण मानवाला ते प्रश्न महत्वाचेवाटेनासे झाले आहेत.

आपणपर्यावरणाच्या विनाशावर विचार करीत आहोत. कारण पर्यावरणाचा प्रश्न केवळ वातावरणाशी निगडित नाही, तो नैतिकतेशी जोडलेलाआहे. जगाने जी विकासनीती स्वीकारलीआहे, त्या विकासनीतीचाही नैतिकतेच्या निकषावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाचे चक्र बदलले आहे असे आपण मानतो. परंतु ते का बदललेआहे? कारण माणसाचे आणि राष्ट्रांचे विचारचक्र बदलले आहे.

नैतिकतेच्याहासाची कारणे :

नैतिकतेचाहास हा अचानक घडलेलानाही. त्यालाही इतिहास आहे. तो म्हणजे माणसांचातुटलेला संवाद किंवा निर्माण झालेला दुरावा. __ ह्या संदर्भात बिशप रॉबर्ट मॅक एल्रॉय ह्यांनी अमेरिकेतील क्रेगटन येथे

झालेल्या 'क्लायमेट कॉन्फरन्स' ह्या परिषदेवेळी केलेल्या चिंतनातील काही मुद्दे :

१. परमेश्वराबरोबरतुटलेलासंवाद

पर्यावरणाच्याविनाशाच्या कारणांवर विचार करताना आपण निर्माणकर्त्या परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचतो. आपला भारतीय समाज प्रामुख्याने

देवावरविश्वास ठेवणारा आहे. जगात कुठे होत नसेल त्यापेक्षा जास्त ___ देवाची उपासना आपल्या देशात होत असते. प्रार्थनास्थळे बांधण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. या सर्वांचे प्रतिबिंबआपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनात उमटते का? 'तो' म्हणजे सर्व ‘परम' (absolute) मूल्यांचा संचय आहे. माझ्यासाठी तो 'येशू पिता' आहे. सर्व मूल्यांची मुळे त्याच्यात आहेत. तो सर्व सृष्टीचानिर्माणकर्ता आहे. त्यामुळे सृष्टीचा वापर व पर्यावरणाचा केलेलाविनाश ही खरी नास्तिकताआहे. 'बायबल'च्या पहिल्या पुस्तकात पर्यावरणाच्या हानीची मीमांसा केलेली आहे. अर्थात ती विज्ञानपूर्व भाषेतआहे. आपण तिचा मथितार्थ समजणे आवश्यक आहे. परमेश्वराने आदिमातापित्याची निर्मिती केली आणि त्यांना निसर्गसंपन्न अशा नंदनवनात ठेवले. त्या सुखाचा हेवा करणारी दुष्ट शक्ती होती. त्या दुष्ट शक्तीने त्या आदिमाता-पित्यांना वश केले. तेत्या दुष्टशक्तीच्या मोहाला बळी पडले. त्यामुळे निसर्गसंपन्न नंदनवनातून त्यांची हकालपट्टी झाली. ती दुष्ट शक्तीम्हणजे आजचे पर्यावरणाचे विरोधक होत. आपल्या ‘परेडाइज लॉस्ट' या महाकाव्यात कवीमिल्टनने ह्या प्रसंगाचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. ख्रिस्ती मठामध्ये प्रार्थनेसाठी जितका वेळ दिला जातो तितकाच वेळ पर्यावरणाच्या संवर्धनालाही दिला जातो. उदा. ग्रेगोर जोऑन मेंडेल (१८२२१८८४) हा मठवासी असूनशास्त्रज्ञ होता. तो जनुकशास्त्राचा (जेनेटिक सायन्स) पितामह मानला जातो. त्याने वनस्पतींवर अनेक प्रयोग करून मठामध्ये शोध लावले. मठवासी गोपालन करीत असत. दुग्धजन्य पदार्थांचा उदा. चीजचा त्यांनी प्रथम शोध लावला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स शोधून काढल्या. मधमाशीपालन करून शुद्ध मध तयार केला. मानवाची सेवा आणि निसर्गाची सेवा म्हणजे देवाची सेवा असे सर्व मठवासी मानतात.

२१व्याशतकात आपले धरतीबरोबरचे नाते बिघडले आहे, कारण आपण ह्या वसुंधरेचे विश्वस्त नाहीत मालक आहोत, असे आपण समजू लागलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला पृथ्वीवरच्या साधनसामुग्रीचा मनमानी विध्वंस करण्याचा जण हक्कच प्राप्तझाला आहे. 'सबका मालिक एक आहे' अशापरमेश्वराबरोबरचा संवाद तुटण्याचे एक कारण आहे. वसुंधरेला मन मानेल तसेलुटण्याचा जणू काही आपल्याला हक्क मिळालेला आहे. कारण आपण आपल्याला विश्वाचे राजे समजतो. २. निसर्गाबरोबरचा तुटलेलासंवाद

आजजगाने निरनिराळ्या क्षेत्रांत वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे परंतु आपण निसर्गाचे अध्यात्म नाकारले आहे. आपल्याकडे तुकोबांनी म्हटले आहे 'वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरे.' तेराव्या शतकात युरोपमध्ये होऊन गेलेले संत फ्रान्सिस चंद्रसूर्याला, ताऱ्याग्रहांना, वृक्षवेलींना, हिंस्र प्राण्यांना आपले बंधू आणि भगिनी समजत असत. मात्र आज आपण तेनाते विसरलेले आहोत आणि तुकोबांनी वर्णन केलेल्या सोयऱ्यांचा आणि संत फ्रान्सिसने सांगितलेल्या नात्यांचा आपण विध्वंस करीत चाललो आहोत.

वास्तविकआपल्या देशात तरी तसे व्हायला नको होते. आपले आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत. जगातील प्रत्येक आदिम जमातीमध्ये निसर्गाचा आदर केला जातो. हिंदू धर्मात सूर्यनमस्काराची पद्धत आहे. अग्निपूजेचे अनेक मंत्र आहेत. नदी किंवा समुद्रातल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य देतात. सरोवराच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरताना प्रथम पाय स्वच्छ करून, नमस्कार करून, प्रार्थना करून मगच प्रवेश केला जात असे. आपले पारसी बांधव अग्निपूजक आहेत. ते अग्नीला पवित्रमानतात. ख्रिस्ती धर्मामध्ये अग्नीचा वापर प्रार्थनेमध्ये केला जातो. आज आपण उपयुक्ततावादहे एकमेव मूल्य मानलेले आहे. त्यामुळे आपण सरोवरांची, तलावांची डबकी करत आहोत. समुद्रकिनाऱ्यांची आपण काय अवस्था केली आहे, हे आपणांस माहीतआहेच. अगदी मध्यरात्रीसुद्धा हजारो वृक्षांची तोड करीत आहोत, जंगलांना वणवे लावीत आहोत. ह्याचे कारण निसर्गाबरोबरचा आपला तुटलेला संवाद हेच आहे. जे अस्तित्वात आहे, ते सर्व केवळ मानवासाठीच आहे, हे सूत्र मानल्यामळेनिसर्गाची फार मोठी हानी झाली आहे. त्याच्यामधन ‘वापरा आणि फेका' ही नीती जन्मालाआलेली आहे आणि ती माणसाठीदेखील वापरलीजात आहे.

३. सत्याबरोबरचातुटलेलासंवाद

कर्बवायूमुळे होणारे प्रदूषण, निसर्गाचे बदललेले चक्र, पाण्याची बिघडलेली गुणवत्ता, जैवविविधतेचा होणारा हास, मानवी जीवनाची होणारी हानी अशा अनेक कारणांमुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आर्थिक विकास आणि फसवे विज्ञान ह्यांच्या नावाखाली हवा, पाणी आणि मानवी जीवन धोक्यात आलेले आहे..

__ शाश्वतसत्य असा काही प्रकार नाही. त्यामुळे सापेक्षतावाद हा जगण्याचा अंतिमनिकष ठरलेला आहे. परिणामत: अंतिम सत्याबरोबरचा आपला संवाद तुटला आहे. नैतिकतेचे हरवलेले भान हे आपल्या सर्वहासाचे, मग तो पर्यावरणाचाअसू द्या, राजकारणाचा असू द्या किंवा आणखी कशाचा असू द्या, एक मुख्य कारणआहे. म्हणून अंतिम सत्याकडे वळण्याशिवाय अन्य पर्याय नाही. ४. आपला एकमेकांबरोबरचातुटलेला संवाद

उपयुक्ततावादआणि सापेक्षतावाद ह्यांचा अवलंब केल्यामुळे निसर्गाची कशी हानी होते हे आपण पाहिले. हेच तत्त्वज्ञान मानवी संबंधानाही लागू केले जात आहे. जन्म आणि मृत्यू ही जीवनातील परमसत्येआहेत. आज ह्या दोन्हीपातळ्यांवर धोके निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उदरातील बालकाला जगण्याची शाश्वती नाही आणि वृद्धावस्थेची उपेक्षा केली जात आहे. संवेदना, करुणा, दया, सहवेदना या भावना बोथटहोत आहेत. वेश्याव्यवसाय आणि गरीब राष्ट्रांतील मुलींची व स्त्रियांची होणारीनिर्यात ह्यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आपले 'वसुधैव कुटुंबकम्' ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे.

पर्यावरणाच्याहानीमागे वरील चार प्रकारचा तुटलेला संवाद कारणीभूत आहे.

संवादतुटल्यामुळे काय अनर्थ होतात ह्याचे मार्मिक वर्णन हिंदी कवी गिरिजाकुमार माथुर ह्यांच्या 'क्रांति की भूमिका' याकवितेत केले आहे.

सिर्फअपनेही लिए जब जीने लगतेहै आदमी तब उनकी हरचीज बिकाऊ हो जाती है !

जबजोखिम उठाने की आदत मिटजाती है

हरकौम मर जाती है .... जेव्हा मानवी संबंध धोक्यात येतात आणि मनुष्य स्वार्थाच्या आहारी जातो आणि जेव्हा त्याला आजूबाजूचे भान उरत नाही, तेव्हा समाजदेखील मृतावस्थेला पोहोचतो.

आपणपर्यावरणाच्या रक्षणाविषयी खूप बोलत आहोत, नामशेष होणाऱ्या प्रजातीबद्दल चिंता व्यक्त करीत आहोत, पण त्याचबरोबर जेव्हामाणुसकीला ग्रहण लागते, गरिबांना समाजात स्थान राहत नाही, आपला सारा विकास धनधार्जिणा होतो, जेव्हा आपल्याला अडचण असलेल्या व्यक्तीला नष्ट केले जाते, तेव्हा मानवतेपुढे मोठे आव्हान उभे राहते. ह्याउलट, जेव्हा सारी मानवजात आपल्या प्रेमाचा विषय होते, त्यांची सुखदु:खे ही आपलीसुखदु:खे बनतात, तेव्हाजगण्याला आणि जीवनाला खरा अर्थ प्राप्त होत असतो.

जेव्हाविश्वाच्या भल्याचा विचार मागे पडतो आणि केवळ राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळते, जेव्हा माणसांमाणसांमध्ये जातिधर्मावरून विभागणी केली जाते, तेव्हा मानवतेची मोठी हानी होते. माणसाचे जग कुटुंबापुरते मर्यादितहोते तेव्हा भोगवादाला आणि चंगळवादाला आमंत्रण मिळते. जेव्हा माणसाचे हृदय पोकळ होते, तेव्हा तो आपले घरउंची फर्निचरने सजवत असतो. मग आपले घरगुतीकार्यक्रम श्रीमंतीचे देखावे बनतात.

पूज्यविनोबा भावे नेहमी मानवतेच्या भल्याचा विचार करीत असत. 'यत्र विश्वं भवति एक नीडम' हेसारे विश्व पक्ष्याच्या एका घरट्यासारखे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न साकारव्हावे, ह्यासाठी ते प्रयत्नशील होते. अतिरिक्त राष्ट्रवाद स्वार्थाला, दहशतवादाला, राष्ट्रांच्या द्वेषाला जन्म देत असतो. 'ते' आणि 'आपण' अशी राष्ट्राची विभागणी किंबहुना फाळणी केली जाते. विनोबा भावेंची घोषणा असे 'जय जगत!' ही ___ 'सब भूमि गोपालकी' म्हणजे ही भूमी अन्त्याच्यावर जे जे निर्मितआहे, ___ ती परमेश्वराने मानवालादिलेली देणगी आहे. त्या धनावर भावी पिढ्यांचाही __ हक्क आहे. तो नाकारून फक्तवर्तमानकाळाचा विचार करणे हा आत्मघात

आहे. त्यामुळे केवळ आपल्याच नाही, तर विश्वाच्या भल्यासाठीएखाद्या

द्रष्ट्याप्रमाणेविचार करणारी ग्रेटा थुनबर्ग ही जगाच्या व्यासपीठावरूनभरल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणानेआपल्या आणि आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला जावा असा संदेश देऊन मानवतेच्या विवेकाला आवाहन करते. तो संदेश सर्वदूरपसरवण्यासाठी आपल्या शाळेला रामराम ठोकून ती बालिका वणवणहिंडते आहे.

ह्यासगळ्यांवर विचारमंथन करणे हेदेखील आपल्या साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. जर माणूसच टिकलानाही, तर साहित्याची निर्मितीकोण करणार आणि वाचणार तरी कोण? आज देशाला आणिसगळ्या जगाला गांधीजींसारख्या प्रेषितांची नितांत गरज आहे. त्यांनी केवळ भारताचा नाही, तर विश्वाच्या भल्याचाविचार केला. त्यामुळे लघुदृष्टीच्या राजकारण्यांना गांधीजी नकोसे झाले आहेत. ज्या देशात, ज्या भारतीय संस्कृतीत निसर्गाची पूजा केली जाते, त्या देशाने, निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जगात आघाडीवर असले पाहिजे.

***

समारोप

सुसंवादसदा घडो सध्या हे डिजिटल क्रांतीचेदिवस आहेत. माहितीचा विस्फोट होत आहे. माहिती मिळाली म्हणजे ज्ञान मिळाले, असे नाही. ज्ञानाची भाषा निराळी असते. माहिती आणि ज्ञानविज्ञान ह्याच्यावर जेव्हा मननचिंतन होते, मंथन होते, तेव्हा माहितीचे रूपांतर हळूहळू ज्ञानात (wisdom) होत असते. हे ज्ञान आपल्यालाआयुष्यभर साथसंगत करते. ते कुठल्या भाषेच्यामाध्यमातून दिले जाते, ह्यापेक्षा ते आपल्याला कायदेते, हे महत्त्वाचे असते; कारण आपला पिंड उत्तम ग्रंथांच्या सहवासात घडवला जातो.

मानवीजीवनातील ताणेबाणे, हर्ष-विमर्ष, दुःख-वेदना, आशानिराशा हे सारे एखाद्याशोभादर्शक यंत्राप्रमाणे (कॅलिडोस्कोप) असतात. अशी पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटतात, प्रत्येक वेळी आपल्याला जीवनाचे आगळे-वेगळे दर्शन घडते. उदा. कालिदासांचे 'शांकुतल', भवभूतींचे 'मालतीमाधव', ग्रीक लेखकांच्या शोकांतिका, शेक्सपिअरच्या मानवी जीवनावर भाष्य करणाऱ्या नाट्यकृती, लिओ टॉलस्टॉय ह्यांच्या प्रत्ययकारी कथा, गटेचे ‘फाऊस्ट' आणि महाराष्ट्राकडे वळलो तर कुसुमाग्रज, दुर्गाभागवत, विंदा करंदीकर, जी. ए. कुलकर्णी, दयापवार अशा कितीतरी प्रतिभावंतांच्या साहित्यकृतींनी आपल्या अबोध मनाचा ठाव घेतला आहे. ही ग्रंथसंपदा आपलेवैचारिक धन आहे. जगायचेका आणि कशासाठी? ह्याचे उत्तर इथे आहे.

संतनामदेवांनी म्हटले आहे, 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी'।. त्याचप्रमाणे ह्यासंमेलनातून साहित्यसोनियांच्या खाणी अनुभवल्यानंतर एकतरी वाचनीय ग्रंथ आपापल्या घरी घेऊन जावे. धर्मसंवाद

माझ्याबोलण्यात आणि लेखनात बायबलप्रमाणे संत-साहित्यातील संदर्भ सहजपणे येत असतात. त्याचे कारण मला संतांच्या साहित्यामध्ये सापडते. संत तुकारामांचे अभंग अभ्यासत असताना मी तुकारामांच्या प्रेमातपडलो.

बायबलमधीलस्तोत्रकारांना भेटलेली तृषित हरिणी तुकोबांच्या 'कन्या सासुरासी जाय' ह्या अभंगात प्रतिबिंबित होते. त्यांची रंजल्यागांजल्यासंबंधीची कणव मला आकर्षित करते.

जनाबाईंची भावविव्हळ भक्ती पाहून मला फ्रान्समधल्या संत तेरेजाची आठवण होते. चोखामेळ्याच्या वेड्यावाकड्या उसाच्या कांडांतून निघणारा भक्तिरस मला मोहित करतो.

केशवाचेभेटी लागले पिसें । विसरलें कैसेंदेहभान । झाली झडपणीझाली झडपणी ।

संचरलेंमनीं आधी रूप । असे म्हणतसंत गोरोबा हे कर्म, धर्म, पाप पुण्य ह्यांच्या पलीकडे गेले होते आणि त्यांना निर्गुण निराकाराचा ध्यास लागला होता. १२ व्या __ शतकातीलदक्षिण भारतातील संत बसवेश्वर हे रूढीपरंपरा भंजकहोते. त्यांनी अनेक जुन्या प्रथा मोडीत काढल्या. त्यामुळे त्यांना विद्रोही संत असेही म्हटले जाते.

संतथॉमस-ए-केम्पीस, संतबर्नर्ड, संत बेनेडिक्ट, संत फ्रान्सिस असिसी ह्यांचे लेखन म्हणजे अध्यात्मपाठ आहेत. अजूनही ते आमचे पोषणकरतात.

सूफीसंत रूमी, सलिम चिश्ती, गाझी पीर हे भक्ती परंपरेतलेहोते. शीख संप्रदायाचे गुरू हे त्यांच्या भजनाद्वारेआपल्या भक्तिरसाने भक्तांचे पोषण करायचे.

__ ह्यासर्व संतांनी आपल्या आकाशाचे अंगण सुशोभित आणि संपन्न केले आहे. तुका नामक सेतूवरूनी रेव्ह. टिळक ख्रिस्तचरणी लीन झाले. आपण भारतात जन्माला आलो म्हणून हे भाग्य आपल्यालालाभले आहे.

चर्चमध्येआज मोकळेपणाचे वातावरण आहे. बिशप डॉ. थॉमस डाबरे, आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो, फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके इत्यादींनी भागवत संतांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला आहे. २१ व्या शतकातटिकून राहायचे असेल तर सर्व धर्ममैत्री साधणे गरजेचे आहे. 'भूतां परस्परें पडो, मैत्र जिवांचे' ही आपल्या सर्वांचीभूमिका आहे.

साहित्यसंमेलनाच्या आयोजकांनी माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीचे अत्यंत उदार अंत:करणाने स्वागत केले आणि गेल्या तीन - चार महिन्यांपासून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. म्हणून आज ह्या व्यासपीठावरउभे राहत असताना कविवर्य तांब्यांच्या ओळी माझ्या ओठांवर खेळतात.

नद्यावा जिथे पाय तेथे दिला ।

बहुलाजलो भान येता मला ।। जय जगत ! जय भारत ! जय महाराष्ट्र !

 

Best Reader's Review