Breaking News

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाचा ना.धो. महानोरांना इशारा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 10-01-2020 | 12:37:51 am
  • 5 comments

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ

नका; ब्राह्मण संघाचा महानोरांना इशारा

उस्मानाबाद: उस्मानाबादमध्ये शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरून धार्मिक वाद पेटला आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू नये, असा इशारा दिला आहे. ब्राह्मण महासंघाने ना.धो. महानोर यांना तसे पत्र पाठवले आहे.

या पत्रात ब्राह्ण महासंघाने म्हटले आहे की, उद्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी १५० ख्रिस्त धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत. या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही आधीपासून सांगत आहोत की, फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्यिक नसून धर्मप्रसारक आहेत. ते आता सिद्ध झाले. मराठा साहित्य संमेलनाला इतर कोणत्या धर्माच्या धर्मगुरूंना बोलावले आहे? यापूर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केवळ एका आश्रमाच्या जागेवर संमेलन होत आहे म्हणून बुलढाणा साहित्य संमेलनाची जागा बदलायला भाग पाडले. मग आता 'अंनिस'ला साहित्य संमेलनात १५० ख्रिस्त धर्मगुरू आलेले, कसे चालतात असा सवाल ब्राह्ण महासंघाकडून करण्यात आला आहे. 

त्यामुळे सरकारने या साहित्य संमेलनाला देण्यात आलेली मदत रोखावी, असेही ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, ना.धो. महानोर यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत साहित्य संमेलनाला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  मी साहित्य संमेलनात येणार, असा शब्द दिला आहे. अध्यक्ष निवडीचा निर्णय एकमताने झाला आहे. माझ्या प्रदेशात साहित्यिकांचा इतका मोठा मेळावा होत आहे. त्यामुळे मी साहित्य संमेलनाला जाणारच, असे ना.धो. महानोर यांनी सांगितले. 

Best Reader's Review