Breaking News

अजित पवारांना अर्थ ,अनिल देशमुख यांना गृह आदित्य ठाकरेंना पर्यावरण, दादा भुसेंकडे कृषी खाते

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-01-2020 | 03:51:27 pm
  • 5 comments
अजित पवारांना अर्थ ,अनिल देशमुख यांना गृह
आदित्य ठाकरेंना पर्यावरण, दादा भुसेंकडे कृषी खाते

अखेर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर!

मुंबई :अखेर सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे महत्त्वाची खाती गेली आहेत. खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे केवळ सामान्य प्रशासन खाते ठेवले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण ही खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. 

संपूर्ण मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. कारण बहुतांश महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत. अर्थ, गृह, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, सहकार व पणन, आरोग्य, ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, अन्न व औषध प्रशासन, गृहनिर्माण यासारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे ठेवली आहेत. यावरुन शरद पवार यांनी सत्तेची सूत्रे आपल्याकडेच ठेवल्याचे दिसून येते.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ मंत्र्यांना वेगवेगळी खाती वाटण्यात आली आहेत. या संपूर्ण मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अत्यंत महत्त्वाची खाती आल्याचं सध्या दिसून येत आहे. त्यामुळे या खातेवाटपात राष्ट्रवादीचाच वरचष्मा असल्याचं दिसतं आहे.  यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागासोबतच शहरी भागाशी निगडीत असलेली खाती स्वत:कडे घेतली आहे. ज्या माध्यमातून ग्रामीण भागासोबतच शहरी भागात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार त्यांना करता येणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अशा प्रकारची खाती आपल्या पक्षाला मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावेळी कृषी खात्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं हे शिवसेनेने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. 

या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पदासह एकूण १५ मंत्रिपदं शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. यावेळी मुख्यमंत्रीपदी स्वत: उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. तर  शिवसेनेने आपल्या एकूण ११ आमदारांना मंत्रिपदं दिली आहेत. तर ज्या ३ अपक्ष आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. ज्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे. ठाकरे घराण्याचे वारसदार आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन अशी दोन खाती देण्यात आली आहेत. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर अनुक्रमे नगरविकास आणि उद्योग खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कृषी खात्याची धुरा दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात काँग्रेसला सर्वात कमी मंत्रिपदं मिळाली आहेत. कारण की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा कमी निवडून आल्या आहेत. त्यामुळे सत्तावाटपात १२ मंत्रिपदंच काँग्रेसला देण्यात आली. पण यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, शालेय शिक्षण आणि गृहराज्यमंत्री अशी महत्त्वाची पदं त्यांना मिळाली आहेत.   

बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.  

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. मात्र त्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यपालांनी खातेवाटपावर सही करण्यास विलंब केल्याचा आरोप करत नाराजीचा सूर आवळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच खातेवाटपावरून सही करण्यास राज्यपालांनी विलंब केल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.

'जे राज्यपाल पहाटे उठून राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देतात व त्यासाठी राजभवन उघडे ठेवतात तेच राज्यपाल मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही न करता झोपायला जातात हे घटनात्मक आश्चर्यच म्हणायला हवे,' असं शरद पवार यांनी म्हटल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' या दैनिकात प्रकाशित करण्यात आलं आहे.

शिवसेनेनंही व्यक्त केली नाराजी

'महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर मंत्र्यांना बंगला आणि दालनाचे वाटपही झाले. मात्र खातेवाटप अंतिम होत नव्हते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकाही झाल्या. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर खातेवाटप पूर्ण केले आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आली. खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते उद्या सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील असे सांगण्यात आले. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले,' असं शिवसेनेचं म्हणणं आहे

 
मुंबई, दि. 5 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.
 
मंत्र्यांची खातेनिहाय यादी
 
मंत्री
 
 
1.   
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती
 
 
2.  
श्री.अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री
 
वित्त, नियोजन
 
 
3.  
श्री.सुभाष राजाराम देसाई
उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
 
 
4.                        
श्री.अशोक शंकरराव चव्हाण
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
 
 
5.                         
श्री.छगन चंद्रकांत भुजबळ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
 
 
6.  
श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील
कामगार, राज्य उत्पादन शुल्क
 
 
 
7.                        
श्री. जयंत राजाराम पाटील
 
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
 
8. 
श्री. नवाब  मोहम्मद इस्लाम मलिक
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
 
 
9.  
श्री. अनिल वसंतराव देशमुख
 
गृह
 
10.                    
श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल
 
11.                     
श्री. राजेंद्र भास्करराव शिंगणे
 
अन्न व औषध प्रशासन
 
12.                    
श्री. राजेश अंकुशराव टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
 
 
13.                    
श्री. हसन मियालाल मुश्रीफ
 
ग्राम विकास
 
14.                  
डॉ. नितीन काशिनाथ राऊत
 
ऊर्जा
 
15.                   
श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
 
शालेय शिक्षण
 
16.                    
डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड
गृहनिर्माण
 
 
17.                  
श्री. एकनाथ संभाजी शिंदे
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
 
 
18.                   
श्री. सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
 
 
19.                    
श्री. विजय वडेट्टीवार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
 
20.                   
श्री. अमित विलासराव देशमुख
 
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
 
21.                    
श्री. उदय रविंद्र सामंत
उच्च व तंत्र शिक्षण
 
 
22.                   
श्री. दादाजी दगडू भुसे
कृषि, माजी सैनिक कल्याण
 
 
23.                   
श्री. संजय दुलिचंद राठोड
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
 
 
24.                
श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
 
पाणी पुरवठा व स्वच्छता
 
25.                  
ॲड. के. सी. पाडवी
आदिवासी विकास
 
 
26.                  
श्री. संदिपानराव आसाराम भुमरे
 
रोजगार हमी, फलोत्पादन
 
27.                 
श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील
 
सहकार, पणन
 
28.                  
ॲड. अनिल दत्तात्रय परब
परिवहन, संसदीय कार्य
 
 
29.                   
श्री. अस्लम रमजान अली शेख
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
 
 
30.                   
ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)
 
महिला व बालविकास
 
31.                    
श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
 
 
मृद व जलसंधारण
 
32.                   
श्री. धनंजन पंडितराव मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
 
 
33.                   
श्री. आदित्य उद्धव ठाकरे
पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
 
 
 
 
राज्यमंत्री
 
 
1.   
श्री. अब्दुल नबी सत्तार
महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
 
2.  
श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
 
3.  
श्री. शंभुराज शिवाजीराव  देसाई
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
 
4.                        
श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
 
5.                         
श्री. दत्तात्रय विठोबा भरणे
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
 
6.  
डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा
 
7.                        
श्री. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
 
8. 
श्री. संजय बाबुराव बनसोडे
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
 
9.  
श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
 
10.                    
श्रीमती आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
         

 

Best Reader's Review