Breaking News

अब्दुल सत्तारांनी सोडलं मौन, म्हणाले 'मी शिवसैनिक,समाधानी आहे, राजीनामा दिलेला नाही

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-01-2020 | 03:41:21 pm
  • 5 comments

अब्दुल सत्तारांनी सोडलं मौन, म्हणाले 'मी

शिवसैनिक,समाधानी आहे, राजीनामा दिलेला नाही

मुंबई: कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. राजीनामा नाट्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले. ते म्हणाले, 'मी नाराज नाही. मला दिलेल्या खात्यांवर मी समाधानी आहे. मी राजीनामा दिला नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. माझं साहेबांशी बोलणं झालं आहे. मी उद्या (सोमवार) सायंकाळी पाच वाजता पुन्हा मातोश्रीवर येणार असून त्यानंतर सविस्तर बोलेल असे सत्तार यांनी पत्रकारांना सांगितले.

आपल्या राजीनाम्याची अफवा कोणी पसरवली याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्षपदी महाविकासआघाडीचा पराभव का झाला याबाबत ची माहिती ही मुख्यंत्र्यांना दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे कुणीही फुठलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची माणसं फुटली, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. काही बाबी या पक्षाअंतर्गत असतात. त्यावर मुख्यमंत्री बोलतील. इतर नेत्यांशीही मुख्यमंत्री चर्चा करतील, असेही राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. शिवसेनेची बदनामी व्हावी, यासाठी माझ्या राजीनाम्याची पुडी सोडल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याची पुडी कोणी सोडली, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आता याची शहानिशा मुख्यमंत्री करतील, असे सत्तार यांनी यावेळी सांगितले.

मग, सगळं काही अलबेल असताना अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, राज्यातील सरकार स्थिर असून अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही. विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत गुंतागुंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये असलेले सत्तार हे भाजपच्या जवळ आले होते. पण भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत आल्यानंतर अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले आहेत. त्यांना राज्यमंत्रीपद ही मिळालं त्यामुळे काही स्थानिक नेते नाराज आहेत. असं देखील बोललं जात आहे.

Best Reader's Review