Breaking News

औरंगाबाद जि.प. निवडणुकीत पुन्हा तेच, महाविकास आघाडीचा अध्यक्ष

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-01-2020 | 03:19:25 pm
  • 5 comments

औरंगाबाद जि.प. निवडणुकीत पुन्हा

तेच, महाविकास आघाडीचा अध्यक्ष

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला. त्यामुळे आज पुन्हा निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कालचीच स्थिती पाहायला मिळाली. कालही समसमान मते पडली होती. आजही तसेच नाट्य घडून आले. त्यामुळे अध्यक्ष निवडीसाठी चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत आज देखील रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके आणि शिवसेना बंडखोर देवयानी डोनगावकर यांना समसमान ३०-३० मते मिळालीत. त्यामुळे चिट्ठी काढून अध्यक्ष निवडण्यात आला. यात महाविकास आघाडीच्या मीना शेळके विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदी भाजपचे एल. जी. गायकवाड हे निवडून आले. दरम्यान आपण ग्रामीण भागातील विकासासाठी काम करू, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्षा मीना शेळके यांनी दिली आहे.
 
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही निवडणूक आज, शनिवारी घेण्यात आली. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६२ आहे. प्रा. रमेश बोरनारे विधानसभेवर निवडून गेल्याने एक जागा रिक्त आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी आज सकाळी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचे पडसाद या निवडणुकीतही उमटले. जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तार यांच्या एका गटाने महाविकास आघाडीला मतदान केले नाही. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने ३२ सदस्यांनी मतदान केले. तर, महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराला २८ जणांनी मतदान केले. तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार मीना शेळके व शिवसेना बंडखोर देवयानी डोणगावकर यांना ३०-३० अशी समसमान मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून अध्यक्षपदाची निवड केली. यावेळी कौल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, भाजप या पक्षांचे सदस्य फुटले. क्षणाक्षणाला सभागृहाबाहेरून येणाऱ्या सूचनांमुळे राजकीय वातावरण ढवळून गेले होते. त्यात मतदान बदलावरून संघर्ष झाला आणि सभा तहकूब झाली. शनिवारी नव्याने मतदान प्रक्रिया राबविली गेली.

Best Reader's Review