Breaking News

आमदार गोरंट्याल राजीनामा देणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-01-2020 | 03:02:16 pm
  • 5 comments

आमदार गोरंट्याल यांचे बैठकीत

ठरलं, समर्थकांसह राजीनामा देणार

जालना : जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल हे नाराज झाले आहेत. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आज गोरंटयाल यांनी आपल्या समर्थकांची जालन्यात बैठक घेतली. या बैठकीत समर्थकांसह काँग्रेस सदस्य आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आमदार कैलास गोरंटयाल हे आता राजीनामा देणार आहेत.

तीस वर्षे झाली कोणत्याही गाॅडफाॅदर शिवाय एकनिष्ठेने मोदींच्या लाटेत  काॅग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन मोठमोठी प्रलोभने झुगारली त्याचे फळ म्हणजे जेष्ठता डावलून मंत्री मंडळातला आपला पत्ता कापला गेला आहे असे म्हणाले जालन्याचे काॅग्रेसचे आ.कैलास गोरंट्याल शनिवारी जिल्हा काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकार्‍यांनी व लोकप्रतिनिधींनी काॅग्रेसचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवले आहेत. 

शरद पवार, छगन भुजबळांनी काॅग्रेस सोडून राष्ट्रवादीत आपल्याला आमदारकी आणि मंत्रीपद देऊ केले होते अशीच ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अनेकदा दिली मात्र कधीच काॅग्रेस सोडण्याचा विचार केला नाही. पाच वेळा विधानसभा लढवली तिन वेळा जिकंलोय एकदा अडीचशे मतांनी पराभव झाला मोदी लाटेत जालना ,परतूर व भोकरदन नगर परिषद,जालना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले तरी काॅग्रेस पक्ष आपल्याला स्टेफनी सारखी वागणूक देत असल्याचे गोरंट्याल म्हणाले. 

मराठवाड्यात काॅग्रेसचे आठ आमदार निवडून आले तर केवळ दोन मंत्री आणि मुंबईत चार निवडून आले त्यांना तिथे मुंबई महानगरपालिकेत एकही नगरसेवक निवडून आणता येत नाही असे  असताना  दोघांना मंत्री कोणत्या निकषावर केले असा प्रश्न गोरंट्याल यांनी उपस्थित केला.  विदर्भ,पच्छिम महाराष्ट्रातील काॅग्रेसचे नेते शिवसेना व भाजपमध्ये आमदारकी मिळेल म्हणून गेले तिकडे तिकीट मिळाले नाही म्हणून पुन्हा काॅग्रेसमध्ये आले त्यांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत विभागिय समतोल आणि पक्षनिष्ठा,गुणवत्ता धाब्यावर बसवून काॅग्रेसचा कारभार चाललाय असे गोरंट्याल यांनी सांगितले. 

   आपल्या पेक्षा कनिष्ठ असलेल्यांना मंत्री करण्यात आले आहे जालन्यात काॅग्रेसला स्पीडलाॅक लावण्यात आलाय आमदारीच्या पुढे कोणी जाऊच नये मराठवाड्याच्या मागासपणाचा शिक्का कोणालाही पुसायचा नाही काॅग्रेस राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या सत्तेच्या काळात जालन्यात महामंडळ नाही सन 2009 ते 2014 या काळात एक कॅबीनेट व दोन राज्यमंत्रीपदे रिकामी ठेवली पण आपल्याला संधी दिली नाही जालन्यात भाजपने प्रदेशाध्यक्षपद, केन्द्रीय राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री राष्ट्रवादीचे सलग पंधरा वर्षे कॅबीनेट मंत्रीपद शिवसेनेचे राज्यमंत्री असे असताना आपण या सगळ्या  सोबत एकटा राजकीय संघर्ष करतोय काॅग्रेस पक्ष वाढवतोय मात्र याची कोणीही साधी दखल घेत नाही त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आता बरखास्त करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले जालना जिल्ह्य़ातील काॅग्रेसला संपवण्याचा हा डाव आहे, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे यांनी आता कोणताच समझोता करण्याची गरज नसल्याचे सांगितले सेवादलाचे प्रमुख ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी घराणेशाहीचा गोरंट्याल हे बळी ठरल्याचे म्हटले जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार यांनी जिल्हयाला डावलण्यात आल्याचा निषेध केला प्रदेश चिटणीस रामराव खडके म्हणाले ज्यांची पोट तुडूंब भरलेली आहेत त्यांच्या तोंडात कोंबण्याचे उद्योग सुरू आहेत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहणे हा गुन्हा आहे काय असे वाटत आहे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या मते जिल्ह्यात काॅग्रेसच्या नेत्यांची एकजूट अशीच राहीली पाहीजे माजी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कुलवंत म्हणाले आम्ही खूप भोगले आहे आता असले प्रकार सहन होत नाहीत. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी मराठवाड्याच्या वाट्याला नेहमीच अशी सापत्न वागणूक दिली जाते असे सांगितले. मेळाव्याचे सुञसंचालन शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले.

 

Best Reader's Review