Breaking News

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-01-2020 | 01:47:31 pm
  • 5 comments

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीला

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान

औरंगाबाद-

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.  प्रकरणात न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने प्राथमिक सुनावणीअंती राज्य शासन, जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, मीना रामराव शेळके यांना नोटीस बजावली.जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सदर याचिकेच्या निकालाअधीन राहिल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या निकालाची माहिती सर्व सदस्यांना देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिले.माजी जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत सदर याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष पदाच्या शर्यतीत देवयानी डोणगावकर, मिना शेळके आणि अनुराधा चव्हाण यांची नावे होती. चव्हाण यांनी डोणगावकर यांना पाठिंबा दिला. डोणगावकर यांना २९ मते मिळाल्याचा तर शेळके यांना २८ मते मिळाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मोनाली राठोड यांच्या मताविषयी वाद झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. डोणगावकर यांना सर्वाधिक मते असतानाही निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याने त्यांनी याचिका दाखल केली आहे. निवडणूक निर्णय प्रक्रियेला स्थगिती देता येत नसल्याचे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले आहे. २१ जानेवारी २०२० रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल. 

Best Reader's Review