Breaking News

विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 01-12-2019 | 11:47:40 pm
  • 5 comments

विधानमंडळाचे विशेष अधिवेशन संस्थगित;

हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये

मुंबई, दि. 1 : मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2019 पासून नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.विधानपरिषद व विधानसभेचे आजचे कामकाज राष्ट्रगीताने संपले आणि सभागृह संस्थगित करण्यात आले.
विधानसभेचे माजी सदस्य यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडून आदरांजली अर्पण केली.
माजी विधानसभा सदस्य सर्वश्री भिकाजी जिजाबा खताळ, गोविंदराव शिवराम चौधरी, प्रभाकर सुंदरराव मोरे, केशवराव नारायणराव उर्फ बाबासाहेब पाटील-धाबेकर, डॉ.शंकरराव रघुनाथ राख व माजी मंत्री तुकाराम सखाराम दिघोळे, मारुती देवराम तथा दादासाहेब शेळके, नवनीतराय भोगीलाल शहा, विठ्ठलराव बापुराव खादीवाले, सूर्यभान सुकदेव गडाख, जयंत ईश्वर सोहनी, प्रभाकर बाबुराव मामुलकर, हरिष उकंडराव मोरे, जगन्नाथ अच्छन्ना शेट्टी, रामदास गंगारामजी सोनोने, शिवशंकरप्पा विश्वनाथ उटगे, सखाराम विठोबा अहेर, शमीम अहमद शेख, पुरुषोत्तम गुलाबराव मानकर, श्रीमती वहारीबाई दिंगबरराव पाडवी, श्रीमती सुमनबाई शिवाजीराव पाटील, लिलाबाई रतिलाल मर्चंट यांच्या दुख:द निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला होता.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त करुन आदरांजली अपर्ण केली.
विधानपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत या नवनिर्वाचित मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.मंत्री सुभाष देसाई यांनी नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांचा परिचय सभागृहाला करुन दिला.
वंदे मातरमने सुरुवात
मुंबई, दि.1 : विधानपरिषदेच्या कामकाजास आज दुपारी वंदे मातरमने सुरुवात करण्यात आली. यावेळी सभागृहात विविध विभागांचे अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
सदस्य सर्वश्री विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्य चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेले असल्याचे नमूद केले. तसेच चंद्रकांत रघुवंशी, अमरिशभाई पटेल, राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहास अवगत केले.

Best Reader's Review