Breaking News

उद्धव ठाकरेंची शनिवारी 'अग्निपरीक्षा'

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 30-11-2019 | 12:19:43 am
  • 5 comments
उद्धव ठाकरेंची शनिवारी 'अग्निपरीक्षा'
मुंबई 29 नोव्हेंबर : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांची शनिवारी ( 20 नोव्हेंबर) पहिली अग्निपरीक्षा आहे. 
महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढील आठवड्यात होईल, असे बोलले जात होते. परंतु, ही चाचणी आता शनिवारी घेण्याचे ठरले आहे. यासाठी शनिवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विधानसभेत बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीने १६२ च्या पुढे आपल्या आमदारांची संख्या असून हा आकडा १७० पर्यंत जाईल असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी ही बहुमत चाचणी सहज संमत होऊ शकते.
सरकारची सर्व तयारी असली तरी शिवसेना कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे शिवसेनेचे सगळे शिलेदार कामाला लागले असून विजयात कुठलीही कसूर राहू नये यासाठी शिवसेनेने 'मास्टर प्लान'ही तयार केलाय. महिनाभराच्या अनुभवावरून सगळ्याच पक्षांना अनेक धडे मिळाले आहेत त्यामुळे कुठेही दगा फटका होणार नाही यासाठी सगळेच कामाला लागले असून अग्निपरीक्षेची पहिला टप्पा हा विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीचा असून त्यातूनच सरकारच्या बहुमताचा निर्णय होणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असला तरी खबरदारी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले सगळे आमदार अजुनही हॉटेलमध्येच सुरक्षीत ठेवले आहेत. त्या सगळ्यांना उद्या अधिवेशन सुरू झाल्यावर थेट विधानभवनात आणलं जाणार आहे. तिकडे सिल्व्हर ओकवरही बैठकींचा सिलसीला सुरू असून मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. 
 
विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी
शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन
 
विधानमंडळ सचिवालयाची माहिती
 
मुंबई, दि.29 : नवीन मंत्री महोदयांचा परिचय आणि मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक शनिवारदिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 02.00 वाजता विधानभवनमुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
विधानसभेच्या सर्व सदस्यांनी विधानभवनमुंबई येथे विधानसभेच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारदिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विधानसभा सभागृहात घेण्यात येणार आहे.
 
या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र शनिवारदिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत कक्ष क्र.021, तळ मजलाविधानभवनमुंबई येथे सचिव (कार्यभार)महाराष्ट्र विधानसभाविधान भवनमुंबई यांच्याकडे पोहोचतील, अशा बेताने पाठविण्यात यावेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी त्याचदिवशी दुपारी 12.00 वाजता करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत रविवारदिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्र आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाच्या प्रती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या 'कक्षअकरावा मजलाविधानभवनमुंबई येथे उपलब्ध असून या निवडणुकीचा कार्यक्रमनोटीसनामनिर्देशनपत्रउमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाचा नमूना इत्यादी सर्व कागदपत्रे विधानसभा सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रती महाराष्ट्र विधीमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे श्री.भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे-पाटील

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Best Reader's Review