Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 10:47:09 pm
  • 5 comments

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयातील

महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन

मुंबई, दि.29 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नव्या मंत्रिमंडळातील मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदींसह खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, माजी मंत्री दिवाकर रावते, डॉ.दीपक सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आदित्य ठाकरे व त्यांचे मावस बंधू वरूण सरदेसाई, आमदार अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, शशिकांत खेडेकर, संजय राठोड, विजय शिवतारे, माजी आमदार सर्वश्री जयप्रकाश मुंदडा, सुभाष साबणे, प्रकाश शेंडगे, सरदार तारासिंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Best Reader's Review