Breaking News

CM उद्धव ठाकरे यांनी दिले फडणवीसांना प्रतिउत्तर!

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 12:52:31 am
  • 5 comments

CM उद्धव ठाकरे यांनी  दिले फडणवीसांना प्रतिउत्तर!

मुंबई, 28 नोव्हेंबर: शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांसह पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकर परिषदेत कॅबिनेटमधील निर्णयांची महिती दिली. तसेच आगामी काळात राज्य सरकार कसे काम करेल याची माहिती दिली.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, अशी टीका नव्या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मंत्रिमंडळ कोणाचे असते याचा त्यांनी अभ्यास करून यावा असे उत्तर दिले.

Best Reader's Review