Breaking News

फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 12:46:21 am
  • 5 comments

फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

मुंबई :महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आपल्या किमान समान कार्यक्रमात मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.  

भाजपने फडणवीस यांचीच विरोधीपक्ष नेते म्हणून निवड केलीय. त्यामुळे या पुढची लढाई कशी राहिल याचे संकेत मिळाले आहे. नव्या सरकारचा जो किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यात घोषणांचा पाऊस आहे मात्र राज्याच्या मागासलेल्या भागासाठी काहीही नाही अशी टीका फडणवीसांनी केलीय. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.  या भागांकडे नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली. 

Best Reader's Review