Breaking News

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची सोमवारी  भेट

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 17-11-2019 | 11:20:48 pm
  • 5 comments

 शरद पवार आणि सोनिया गांधी यांची सोमवारी  भेट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. या दोन नेत्यांमध्ये माहाशिवआघाडीबाबत चर्चा होणार असून  मंगळवारी महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा मार्ग निघणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेबरोबर जाण्याबाबत प्रत्येक नेत्याला काय वाटतं याबाबत शरद पवार यांनी कोअर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये बहुतांश नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत आग्रही भूमिका मांडल्याचे चर्चा आहे. महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत आता वेगाने हालचाली होत असून उद्याच्या बैठकीनंतर निर्णय येणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Best Reader's Review