Breaking News

औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 12-09-2019 | 08:23:19 pm
  • 5 comments

औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या

पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई, दि. 11 : औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरुन 1 हजार 680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली आहे. या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे 16 लाख लोकसंख्येला लाभ मिळणार आहे.

मराठवाड्याची जीवनरेखा असणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्यातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते. वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहराची लोकसंख्यादेखील वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढत आहे. यासाठी जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी औरंगाबादला उपलब्ध करुन देण्याच्या पाणीपुरवठा योजनेस मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Best Reader's Review