Breaking News

देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य नियोजित वेळेआधी पूर्ण - पंतप्रधान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 01:01:04 am
  • 5 comments

देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन

देण्याचे लक्ष्य नियोजित वेळेआधी पूर्ण - पंतप्रधान

औरंगाबाद, 7 सप्टेंबर 2019

ग्रामीण भागाच्या गतिमान प्रगतीसाठी महिलांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेद्वारा धूरमुक्त आरोग्यदायी जगण्यासाठी शासन गॅस कनेक्शन देत आहे. या योजनेतील उद्दिष्टाची पूर्तता सात महिने आधी आपण करत आहोत आणि 8 करोड गॅस कनेक्शन आज इथे औरंगाबादमध्ये महिला मेळाव्यात होत आहे. ही आनंदाची बाब आहे. 8 करोड उज्ज्वला गॅस कनेक्शपैकी महाराष्ट्रात 34 लाख कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र शासनाने सत्तेत आल्यावर 100 दिवसाच्या आत 5 करोड गॅस कनेक्शन पूर्ण केले आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नवीन 10 हजार एलपीजी गॅस वितरक नेमण्यात आले असून ग्रामीण भागात त्यामुळे घरोघरी सहजतेने गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे पाईप लाइनद्वारे गॅस नेटवर्कचा विस्तार करण्याचेही काम सुरू आहे. देशात एकही कुटुंब एलपीजी गॅस सिलेंडर पासून वंचित राहू नये यासाठी 5 किलोचा छोट्या सिलेंडरला प्रोत्साहन दिले जात आहे, असे प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले.

महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजने अंतर्गत 8 कोटी’व्या लाभार्थीला एलपीजी कनेक्शन पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आले. 8 कोटी मोफत गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट वेळे आधीच पूर्ण झाले. या 8 कोटीं पैकी 44 लाख कनेक्शन महाराष्ट्रात देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. देशात एलपीजी कनेक्शनविना एकही कुटुंब राहता कामा नये, यासाठी सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

महिला आर्थिक सशक्तीकरणाबरोबरीने सामाजिक परिवर्तनाचाही महत्वाचा भाग आहेत, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले

 

Best Reader's Review