मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू; उद्धव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 07-09-2019 | 11:38:52 pm
  • 5 comments

मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं

अभिनंदन करू; उद्धव ठाकरे

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नव्या तीन मेट्रो मार्गांचे भूमी पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी बोलताना उद्धव  यांनी मोदींच भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच “मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू” अशी केली.

ते पुढे म्हणाले की, कलम 370 रद्द झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. मोदी यांच्या रूपाने देशाला दिशा देणारं नेतृत्त्व मिळालं आहे. मुंबईला सुविधा देत आहात याचा आनंद आहे. राज्यात युतीचे सरकार येणार याची खात्री आहे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाही. तर राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवीय,’ असं  उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटल आहे.

 

Best Reader's Review