Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्पात अजंठा – वेरुळसाठी ३०० कोटींची तरतूद

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 05-07-2019 | 11:44:10 pm
  • 5 comments

केंद्रीय अर्थसंकल्पात अजंठा –

वेरुळसाठी ३०० कोटींची तरतूद

अजंठा – वेरुळसह राज्यातील पर्यटनाला मिळेल मोठ्या प्रमाणात चालना*

*मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रीया*

मुंबई, दि. ५ : केंद्रीय अर्थसंकल्पात अजंठा – वेरुळ लेण्यांच्या विकासासाठी करण्यात आलेली ३०० कोटी रुपयांची तरतूद तसेच या पर्यटनस्थळाला ‘वर्ल्ड क्लास डेस्टीनेशन’ बनविण्याचा करण्यात आलेला निर्धार यामुळे या पर्यटनस्थळासह राज्यातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

केंद्र शासनाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध निर्णय जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या अजंठा वेरुळ लेण्यांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय या स्थळाला ‘वर्ल्ड क्लास डेस्टीनेशन’ बनविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे या स्थळाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होतील आणि जागतिक स्तरावर या स्थळाचे एक वेगळे स्थान निर्माण होऊ शकेल, असा विश्वास मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील या गौरवशाली वारशाच्या विकासाला चालना देणारा निर्णय घेतल्याबद्दल मंत्री श्री. रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

संसदेत आज सादर झालेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळवून देणारा आहे. महिला, युवा, शेतकरी, मध्यमवर्गीय, वंचित घटक यांच्यासह गोरगरीब जनता अशा सर्व घटकांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असून याचे मी स्वागत करतो, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

Best Reader's Review