शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे विनोद – देवेंद्र फडणवीस

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 05:48:40 pm
  • 5 comments

शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे विनोद – देवेंद्र फडणवीस

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाला घेरण्यासाठी, माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राफेल करार मान्य नसल्यानेच संरक्षण मंत्री पद सोडून ते गोव्यात आले होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज शरद पवारांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य एक विनोद असून यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील असाच आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत, जर ते हयात असते तर त्यांनी यावर नक्कीच उत्तर दिले असते, असे फडणवीस म्हणाले.

 

Best Reader's Review