Breaking News

गडचिरोली -चिमूर मतदारसंघातील ४ मतदानकेंद्रात सोमवारी मतदान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 05:22:56 pm
  • 5 comments

गडचिरोली -चिमूर मतदारसंघातील

४ मतदानकेंद्रात सोमवारी मतदान 

गडचिरोली, दि. 13 : गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 110वाटेली, 112गारडेवाडा, 113गारडेवाडा (पुस्कोटी), 114 गारडेवाडा (वांगेतुरी) या चार मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या कारणास्तव 11 एप्रिल रोजी मतदान झाले नव्हते. आता याठिकाणी दि. 15 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7.00 ते 3.00 या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
 
वाटेली, रूम नं 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, गारडेवाडा, रूम नं 2जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, गारडेवाडा (पुस्कोटी) रूम नं 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गट्टा, गारडेवाडा(वांगेतुरी) रूम नं 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गट्टा याप्रमाणे चार मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

Best Reader's Review