राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-04-2019 | 05:00:15 pm
  • 5 comments

राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही

कोल्हापूर : "मोदी-शहा हे देशासाठी घातक आहेत, हे सर्वांना सांगायचा एककलमी कार्यक्रम राज ठाकरे यांचा आहे. जे चुकीचे चालले आहे,ते प्रभावीपणे मांडतात. आपल्या भाषणांमध्ये उदाहरणांसह जे मुद्दे राज ठाकरे दाखवत आहेत, ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या या मांडणीचा नक्कीच फायदा होणार आहे. मात्र, राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही." असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे यांची मोदींविरुद्ध भाषणे हे शरद पवारांनी दिलेल्या स्क्रिप्ट असतात अशा अनेक टीका त्यांच्यावर झाल्या. राज ठाकरे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत माघार हीदेखील पवारांनी सांगितलेली खेळी होती असेही बोलले गेले. परंतु, आता शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक चर्चा होणार यात काही शंका नाही.

Best Reader's Review