पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे विसर्जन हौदात ,सरस्वती भुवनचा उपक्रम

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 09:55:03 pm
  • 5 comments

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे विसर्जन

हौदात ,सरस्वती भुवनचा उपक्रम

 औरंगाबाद :श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय व श्री सरस्वती भुवन  महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृह औरंगाबाद,यांच्यातर्फे यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.सर्वत्र पीओपीच्या गणेश मूर्ती वापरण्यात येतात याचा पर्यावरणावर परिणाम होतो म्हणून गणेश विसर्जन सरस्वती भुवन मुलांच्या वसतिगृहात हौदात करण्यात आले यासाठी हौदामध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकण्यात आले त्यामुळे विसर्जन केलेली केलेली  मूर्ती 48 तासात पाण्यात विरघळते  हौदाच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेट चा थर जमा होईल  हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवले म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट चा थर पाण्यापासून वेगळा होईल मूर्ती विरघळून पाण्यात तयार झालेले पाणी म्हणजेच अमोनियम सल्फेट या द्रावणात पाच पट पाणी मिसळल्यास ते झाडांना आणि कुंड्यांना खत म्हणून घालता येईल व जी पावडर तयार होईल त्यापासून खडू तयार होतील  हा प्रकल्प  राबविण्यासाठी विज्ञान महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी  प्रयत्न केले सरस्वती भुवन विद्यार्थी वसतिगृहच्या विद्यार्थ्यांनी सर्वांना मदत केली यावेळी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे. प्राचार्य प्रदीप जब्दॆ, उपप्राचार्य अलका दोडके सुपेकर, श्री श्यामराज सुपेकर व वसतिगृह प्रमुख अरुण सुरडकर विद्यार्थी शुभम पवार,गोकुळ शेळके, भगवान सरकटे, सौरभ जावळे व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र चौधरी, राधेश्याम जयस्वाल,स्वप्निल काळे व शिक्षकेतर कर्मचारी अमोल गंगावणे,जोंधळे, तेजराव काटकर, किरण लोंढे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे तरच पर्यावरणाचे रक्षण होईल पर्यावरण टिकून राहील  असे डॉ. श्रीरंग देशपांडे  यांनी सांगितले

Best Reader's Review