Breaking News

राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या माध्यमातून आष्टीसह 16 गावांचा विकास - पालकमंत्री

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 09:09:17 pm
  • 5 comments

राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या माध्यमातून

आष्टीसह 16 गावांचा विकास - पालकमंत्री

आष्टी येथे 18 कोटी 2 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा

जालना :
राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या माध्यमातून परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांचा 185 कोटी रुपयांच्या माध्यमातून सर्वांगिण विकास करण्यात येणार असून कृषी माल उद्योग प्रक्रिया समूह वसाहत आष्टीत उभारण्यात येणार आहे. तसेच शेगाव-पंढरपूर पालखी महामार्गावर 9 कोटी 53 लक्ष रुपये किंमत असलेल्या नवीन विद्युत पोल उभारणीच्या कामाचा येत्या दोन दिवसात शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

परतुर तालुक्यातील आष्टी येथे राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जवळपास 18 कोटी 2 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा आदींची उपस्थिती होती.

श्री. लोणीकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय रुरबन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून देशात या माध्यमातून १०० तर राज्यात 7 क्लस्टर करण्यात येत असून यामध्ये परतूर तालुक्यातील आष्टीसह १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या विकासासाठी राष्ट्रीय रुरबन योजनेतून १८५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून या माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यात येत आहे.

शेतीपिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटेछोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन या पिकांचे या भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या पिकापासून तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असून गावातील शेतकऱ्यांचे बचतगट तसेच महिलांच्या बचतगटांना एकत्रित करुन परतूर तालुक्यात 100 प्रकल्प उभारण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या शेतातातील मालावर शेतकरीच प्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतमालाला भाव व बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

आष्टी येथून जवळच असलेल्या पांडेपोखरी रस्त्यावर शासकीय जमिनीवर मिनी एमआयडीसी स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये सामुहिक कृषी प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग समूह स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातुन कौशल्य विकास प्रशिक्षण, टोमॅटो प्रक्रिया, सोयाबिन प्रक्रिया, धान्य स्वच्छता, कापूस वेचणी, मक्यावरील प्रक्रिया, गव्हाच्या पिठापासून मैदा तयार करणे, मिरची पावडर मसाले तयार करण्याचा प्रकल्प, पापड, बेसन, चिप्स बनविण्याचा प्रकल्प, गांडूळ खत तयार करणे, अद्रक पावडर तयार करणे अशा प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेच्या माध्यमातुन गावातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा व स्वच्छता, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, गाव अंतर्गत रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एल पी जी गॅस कनेक्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम व्यवस्था, शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.


राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत या कामाचा समावेश आहे

• प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती व सुशोभीकरण
• अंगणवाडी बांधकाम करणे व शाळा खोली बांधकाम
• खंडेश्वर मंदिर ते गणपती मंदिर रस्ता
• गणपती मंदिर ते चर्मकारगल्ली रस्ता
• बागवान गल्ली ते धनगरगल्ली रस्ता
• जुना ठाणा ते शनिमंदिर रस्ता
• हनुमान मंदिर ते खंडेश्वर मंदिर रस्ता
• महाराष्ट्र बँक-महावीर चौक-बालाजी चौक-बागवान गल्ली सिमेंट रस्ता
• जैनमंदिर परिसर सिमेंट रस्ता
• खंडेश्वर मंदिर परिसर सिमेंट रस्ता
• आष्टी बसस्थानक बांधकाम
• आष्टी येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
• विद्युत पोल, पथदिवे व हायमास्ट टॉवर उभारणी

Best Reader's Review