Breaking News

जो बूंद से गयी, वो हौदसे नहीं आती – जयंत पाटील

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 07:53:27 pm
  • 5 comments

जो बूंद से गयी, वो हौदसे नहीं आती – जयंत पाटील

मुंबई – फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या वक्‍तव्यामुळे राफेल खरेदीत घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कितीही खुलासे केले तरी “जो बुंद से गयी, वो हौदसे नही आती’, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मोदी सरकारने गेले काही महिने राफेल कराराची माहिती दडवून ठेवली. या करारात एचएएलला जे हजारो कोटी रूपयांचे कंत्राट मिळणार होते ते अचानक एका नव्याने स्थापन झालेल्या खासगी कंपनीला देण्यात आले. याबाबत जनतेने अनेक प्रश्न उपस्थित केले. या खासगी कंपनीने नंतर राफेलचा एक खिळा देखील आम्ही बनविणार नव्हतो, असे स्पष्ट केले.

यावर मोदी सरकार काहीही बोलायला तयार नव्हते. मात्र आता ओलांद यांच्या खुलाशाने “दूध का दूध’ व “पानी का पानी’ झाल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Best Reader's Review