Breaking News

पंतप्रधानांनी स्वतः उत्तर द्यावे – संजय राउत

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 07:34:10 pm
  • 5 comments

पंतप्रधानांनी स्वतः उत्तर द्यावे – संजय राउत

मुंबई – राफेल विमान खरेदी प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला अडचणीत आणले असतानाच मित्रपक्ष शिवसेनेनेही भाजपाची कोंडी केली आहे. राफेल प्रकरणी आता इतर कोणत्याही मंत्र्याने नको, तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या गळाभेटीचे अनेक फोटोही आम्ही पाहिले आहेत. आता ओलांद यांनीच राफेल प्रकरणी वक्‍तव्य केले आहे. यामुळे त्यांच्या दाव्याला उत्तर देण्याची संपूर्ण जबाबदारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच आहे. याला संरक्षणमंत्री निर्मला सितारामन, अर्थमंत्री अरूण जेटली किंवा भाजपाच्या इतर कोणत्या प्रवक्‍त्याने उत्तर देउ नये. स्वतः नरेंद्र मोदींनीच यावर उत्तर द्यावे, असे राऊत म्हणाले.

Best Reader's Review