Breaking News

दाभोळकरांचा मारेकरी औरंगाबादचा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 19-08-2018 | 10:13:16 am
  • 5 comments

दाभोळकरांचा मारेकरी औरंगाबादचा

 

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद येथून सचिन अंधुरे नामक व्यक्तीला अटक केली आहे.

 

सचिनला एटीएसने आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले.

औरंगाबाद शहरात खळबळ  

image.png

 

 

औरंगाबाद: एटीएसने आणि सीबीआयने औरंगाबाद येथून सचिन अंदूरे यास डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे . 

सीबीआयने एटीएसच्या मदतीने 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतलेला  सचिन 

अंदूरे हा कुवारफल्ली -धावणी मोहल्ला भागातील वेणू निवास या इमारतीमध्ये भाड्याने राहतो. दहा महिन्या पूर्वीच तो इथे राहायला आला होता . पत्नी आणि मुलीसोबत तो राहतो. त्याला आई - वडील नाहीत .  

निराला बाजार भागात स्माईल हॉटेल शेजारी असलेल्या एका कापड दुकानात तो काउंटर सांभाळत होता. १४ऑगस्ट रोजी एटीएसच्या पथकाने आधी दुपारी साडेबाराच्या सुमारास सचिन ऐवजी काउंटरवर असलेल्या दुसऱ्याला उचलुन क्रांतीचौक पोलीस स्टेशनला नेले  होते. 

चौकशी आणि कागदोपत्री अटक केलेला सचिन नसून दुसराच कुणी असल्याचे पथकाच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्याला सोडण्या आधी सचीन कुठे आहे याची विचारपूस पथकाने त्या तरुणांकडे केली तेव्हा सचिन जेवायला गेल्याचे सांगण्यात आले. 

 पथकाने पुन्हा निराला बाजारात जाऊन दुकानावर लक्ष ठेवले. जसा सचिन काउंटरवर आला त्याच क्षणी त्याला अटक करण्यात आली, असे काहींचे म्हणणे आहे तर जबाबदार सूत्रांच्या मते त्याला कुवारफल्ली -धावनी मोहल्ल्यात त्याचा घरातून ताब्यात घेण्यात आले . दरम्यान सचिन राहत असलेल्या धावणी मोहल्ला येथील शेजारी या संदर्भात काहीच बोलायला तयार नाहीत. सचिन फारसा कुणाशी बोलत नव्हता. 

तो राधाकिसन शिंदे यांच्या घरात अकरा महिन्यांच्या भाडे कराराने राहत होता . राधाकिसन शिंदे यांनी एका दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीशी बोलताना असे सांगितले की , " सचिन हा शांत आणि चांगल्या स्वभावाचा होता . तो आणि त्याची पत्नी असे दोघेही एकत्र रहायचे . त्याला तीन महिन्यापूर्वीच मुलगी झाली आहे . पती पत्नी दोघेही नोकरी  करायचे . तो कधीही कट्टर आणि आक्रमक भाषा बोलायचा नाही . त्याला साध्या वेशातील पोलिसांनी घरातून पकडून नेले . त्याला नेण्यापूर्वी त्याच्या घरात पोलीस त्याच्याशी तास दीड तास बोलत होते . "

Best Reader's Review