Breaking News

आणखी एक भीष्म पितामह गमवला : उध्दव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 01:07:22 am
  • 5 comments

आणखी एक भीष्म पितामह गमवला : उध्दव ठाकरे

 

मुंबई – भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आज एम्स रूग्णलयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तीनी, राजकीय नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले, ‘अटल बिहारी वाजपेयींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे एनडीए मजबूत राहिली. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आणखी एक भीष्म पितामह गमवला आहे. पण ते सदैव आमच्या ह्रदयात राहतील’.

 

Best Reader's Review