Breaking News

मराठा आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 01:03:19 am
  • 5 comments

मराठा आरक्षणासाठी  दोघांची आत्महत्या

औरंगाबाद :मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. रविवारी  परभणीतील सेलू तालुक्यातील दिग्रसवाडी येथे एकाने पेटून घेतले.तर रविवारी नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केली.

मराठा आरक्षणासाठी सेलूच्या तरुणाने पेटवून घेतले
image.png
परभणी : मराठा आरक्षणाला विलंब होत असल्याने सेलू तालुक्यातील डिग्रस वाडी येथे उच्चशिक्षित तरुणाने पेटवुन घेवुन आपली जीवन यात्रा संपविली आहे. रविवारी (५ जुलै) सकाळी 10 वाजेच्या सुमारास डिग्रसवाडी येथील तरुण अनंत सुंदरराव लेवडे (वय 24) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना फेसबुक खात्यावरुन पोस्ट करुन गावाजवळील उजव्या कालव्याच्या बाजुच्या शेतात अंगावर राँकेल ओतुन पेटवुन घेतले. यात लेवडे जागीच मरण पावले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यांनी लेखी अश्वासन देवुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मयताच्या कुटुंबास 10 लाख मदत जाहीर केली आहे. तर खासदार संजय जाधव यांच्याकडुन 5 लाख व आमदार विजय भांबळे याच्याकडुन 2 लाख अशी एकूण १७ लाख रुपयांची अर्थिक मदत मिळणार आहे. तसेच  कुटुंबातील व्यक्तीस शैक्षणिक गुणवत्तेनुसार शासकिय सेवेत सामावुन घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठाण्यात चार तास ठेवलेला मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
 
    मयत अनंत लेवडे यांनी इंजिनिअरींग मध्ये पदविका घेतली होती. त्यांनी बजाज कंपनीमध्ये नोकरी केली होती.परंतु चार वर्ष कंपनीत काम केल्याच्या नंतरही कायम करण्यात आले नाही व कामावरुन कमी करण्यात आले. त्यानंतर मयत आनंत लेवडे याने दिल्ली येथे जावुन जाँब केला मात्र हाती काहीच लागत नव्हते त्यातच घरची परिस्थिति नाजुक घरात जमिनही नाही.मराठा समाजाची परिस्थिति जेमतेम असुन आरक्षण नसल्या कारणाने नोकरी लागत नाही यांची खंत मनात सलत होती. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या अंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत मयत अनंत लेवडे याने मुख्यमंत्री यांना फेसबुक खात्यावर मराठा समाजास आरक्षण मिळावे याची टिप्पणी केली आहे. देशासाठी काही करता आले नाही परंतु जातीसाठी बलिदान देत असल्याची टिप्पणी टाकुन आपली जिवनयात्रा संपविली.पोलिस प्रशासन व तहसिलदार यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. मयत अनंत लेवडे यांच्या पाश्चात आई, वडिल व दोन भाऊ असा परिवार आहे. 
    हा तरुण घराचा कर्ता होता, यामुळे कुंटुंब उघड्यावर आले आहे. शासनाकडुन मराठा आरक्षणासाठी विलंब करण्यात येत आहे. पंचनामा केल्यानंतर मयत अनंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांना नातेवाईकांनी मृतदेह रुग्णालयात न नेता पोलिस ठाण्यात नेवुन मुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलस ठाणे येथे ठिय्या करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ वातावरण ताणावपुर्व झाले होते.तब्बल चार तासानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यांनी लेखी अश्वासन देवुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मयताच्या कुटुंबास 10 लाख, खासदार यांच्याकडुन 5 लाख व आमदार याच्याकडुन 2 लाख रुपयाचे अर्थिक मदत जाहिर तसेच कुटुंबातील व्यक्तीस शैक्षणिक गुणवत्तेनुसार शासकिय सेवेत सामावुन घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
शांततेच्या मार्गाने न्याय मिळावा 
मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी समाज बांधव अश्या पद्धतीने आपले जीवन संपवीणे योग्य नाही आपण न्यायीक व शांततेच्या मार्गाने संयम बाळगुण अंदोलन करावे जिवनयात्रा संपवु नये मी एक मुलगा गमावला आहे मात्र समाजातील युवक माझेच मुले आहेत अजुन मि इतर मुले गमावु शकत नाही अशी भावनिक शाद यावेळी मयताचे वडिल सुंदरराव लेवडे यांनी समाज बांधवांना घातली.

घरावरून उडी मारून आत्महत्या

नांदेड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम असून आज अर्धापूर तालुक्यातल्या एका 38 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली. आज ंपहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावकर्‍यांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.
नांदेड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अर्धापूर, मुदखेड व नायगाव तालुक्यात आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. अर्धापूर तालुक्यात यापूर्वी दोघांनी याचं मागणीसाठी मृत्यूला कवटाळले होते. शनिवारी रात्री अर्धापूर तालुक्यातल्या सावरगाव येथील गणपत आबादार या 38 वर्षे इसमाने मध्यरात्री स्वतःच्या राहत्या घरून उडी मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाच वाजता हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकर्‍यांनी आंदोलन सुरू केले.मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आबादार यंानी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अरविंद नरसीकर हे पोलीस फौजफाट्यासह सावरगावात दाखल झाले. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार्‍या आंदोलकांची समजूत काढून त्यांना बाजूला घेण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सायंंकाळी मयत  गणपत आबादार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. नांदेड जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत  तिघांनी मृत्यूला कवटाळले.
दरम्यान याच मागणीसाठी आज माहूर तालुक्यात आंदोलकांनी पैनगंगा नदीच्या पात्रात जलसमाधी घेऊन आंदोलन केले. धनोडा- माहूर दरम्यान असलेल्या पैंनगंगा नदीच्या पात्रात 21 आंदोलकांनी अर्धनग्नावस्थेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिस प्रशासनातील अधिकार्‍यांनी त्यांना अटकाव केला. किनवटचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम. माहूरचे तहसीलदार विक्रम सिंह राजपूत हे आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुखेड तसेच देगलूर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज शांततेने रस्ता रोको आंदोलन झाले.

Best Reader's Review