Breaking News

यापुढे जे होईल त्याला सरकारच जबाबदार : मराठा क्रांती मोर्चा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:41:22 am
  • 5 comments

यापुढे जे होईल त्याला सरकारच

जबाबदार : मराठा क्रांती मोर्चा

 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज आता अधिकच आक्रमक बनला असून येत्या ९ तारखेला राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. तसेच यापुढे सरकारने अथवा सरकारमधील कोणत्याही व्यक्तीने कसल्याही प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केल्यास जे होईल त्याला सरकारच जबाबदार असेल असा थेट इशारा देखील सकल मराठा समाजाने आज दिला आहे.
 
परभणी येथे एका २३ वर्षीय मराठा तरुणाने केलेल्या आत्मदहनानंतर मराठा आंदोलन आता आणखी चिघळू लागले आहे. सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला लावण्यासाठी म्हणून येत्या ८ तारखेपर्यंत सर्व मराठा समाजाने सरकारबरोबर असहकार आंदोलन करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने  केले आहे. तसेच राज्यांमधील सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर देखील ठिय्या आंदोलन करण्यात करावे, यानंतर ९ तारखेपासून राज्यातील सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन सर्व दुकाने, शाळा-महाविद्यालये शांतते बंद ठेवावीत, असे देखील मराठा समाजाने म्हटले आहे. दरम्यान यामध्ये जर सरकारने कसल्याही प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केल्यास त्यानंतर जो काही उद्रेक होईल, त्याला पूर्णपणे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा देखील मराठा समाजाने दिला आहे.

Best Reader's Review