Breaking News

मराठवाड्यात पावसाची ओढ…

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:18:33 am
  • 5 comments

मराठवाड्यात पावसाची ओढ…

जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
मुंबई – कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची तुफान बॅटींग सुरु असतानाच मराठवाड्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे. साधारणत: 20 तालुक्‍यांत 15 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडला असून औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

20 तालुक्‍यांत 15 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडला आहे. ज्या भागात पावसाचा खंड पडलेला आहे तेथे संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. धरणातून आवर्तन सोडल्यानंतर त्याभागातील शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती मिळेल अशी व्यवस्था करावी. पाणी सोडल्यानंतर अखंड वीजपुरवठा देण्यात यावा अशा सूचनाही जिल्हा यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

राज्यात 15 जूनपूर्वी पेरणी झालेल्या आणि सध्या फूलबहर असलेल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादूर्भाव जाणवू लागला आहे. अशा वेळेस त्यावर तातडीने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदशन करावे. त्यासाठी क्रॉपसॅप योजनेंतर्गत 50 टक्के अनुदान देण्याची योजना देखील राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्‍यक ती काळजी घेण्याच्या सूचना करतानाच फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Best Reader's Review