Breaking News

रिक्‍त जागाच नसल्याने, आरक्षण म्हणजे नोकरीची हमी नाही!

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:09:00 am
  • 5 comments

रिक्‍त जागाच नसल्याने, आरक्षण म्हणजे

नोकरीची हमी नाही! -नितीन गडकरी

मुंबई : “नोकर्या अतिशय कमी आहेत, त्यामुळे आरक्षण दिले तरी नोकरी मिळेलच, याची हमी देता येणे शक्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशद केली.

प्रत्येक समाजातील गरिबातल्या गरिबाचा विचार केला जावा, ही शालेयदशेपासूनच शिकवली जाणारी विचारधारा आहे आणि याच विचारधारेतून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे,” असे गडकरी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने पत्रकारांनी गडकरी यांना प्रश् विचारला होता. आपण आता असे गृहीत धरू या की, सरकारने या सर्वच समाजांना आरक्षण दिले, पण त्याचा फायदा काय? नोकर्या आहेत कुठे? सरकारी कार्यालयांमध्येही भरती थांबविण्यात आली आहे. मग आरक्षण मिळाल्यानंतरही नोकरी मिळेलच, याची हमी आहे का? असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केला.

आरक्षणाची खरी समस्या अशी आहे की, मागासवर्गीय समाज हा राजकीय फायद्याचे माध्यम ठरत आहे. ’मी मागासवर्गीय आहे,‘ असे प्रत्येकजणच सांगत आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशसारख्या राज्यांमध्ये ब्राह्मणसमाज मजबूत आहे. त्यांचे राजकारणात प्राबल्य आहे आणि इतर लोक म्हणतात की, आम्ही मागासलेले असल्याने आम्हाला आरक्षण द्या, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. एक शालेय विचार असा आहे की, गरीब हा गरीबच असतो. त्याला कोणतीही जात, धर्म किंवा भाषा नसते. मुस्लीम असो, हिंदू असो किंवा मराठा असो, या सर्वच समुदायांमध्ये एक घटक असा आहे की, ज्यांना घालायला कपडे नसतात आणि खायला अन्नही नसते. आणखी एक शालेय विचार असाही आहे की, आपण प्रत्येक समुदायातील गरिबातल्या गरीब व्यक्तीचाच विचार करायला हवा. हीच सामाजिक-आर्थिक विचारधारा आहे आणि या विचारधारेचे राजकारण व्हायला नको, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

Best Reader's Review