बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीचा पहिला बळी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 31-07-2018 | 04:05:37 pm
  • 5 comments

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण

मागणीचा पहिला बळी

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीची धग दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी आरक्षणाबाबत एकाने फेसबूक पोस्ट करून आत्महत्या केल्यानंतर १२ तासाच्या आता दुसरी घटना जिल्ह्यातील विडा येथे घडली आहे. अभिजीत बालाबसाहेब देशमुख (३५) असे तरुणाचे नाव असून त्याने सोमवारी मध्यरात्री प्लॅस्टिक पाईपने स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटूंबियावर बॅकेचे कर्ज, पदव्युत्तर शिक्षण होऊनही नोकरी मिळत नसल्याने तसेच आरक्षण नसल्याने निर्माण होणारे अडथळे या सर्व समस्यांना त्रासून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.

राज्यात आरक्षणावरून आत्महत्या होत असताना मी देखील यामधीलच एक असून बलिदान देणार असल्याचे त्यांनी मित्रांजवळ बोलून दाखविले होते. आणि सोमवारी मध्यरात्री करूनही दाखविले. अभिजित देशमुख याच्या घरची परिस्थिती नाजूक आहे . तो एमएस्सी शिकलेला असून ही आरक्षण न मिळाल्याने त्याला नौकरी लागली नाही .त्यामुळे त्याच्या कुटुंबातील एक सदस्यास नौकरीचे  ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय त्याचे प्रेत घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती . पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा केला आहे.

गावात कडकडीत बंद
अभिजीत देशमुख या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आज विडा गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. गावासह परिसरात शोककळा पसरली असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एकच गर्दी झाली आहे.

Best Reader's Review