मराठा क्रांती ठोक मोर्चाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 24-07-2018 | 01:53:18 am
  • 5 comments

मराठा क्रांती ठोक मोर्चाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात काकासाहेब शिंदे या तरूणाने उडी घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विरोधा मराठा क्रांती मोर्चाने  मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

रात्री आठ वाजता क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. याआधी 9 ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आज (ता.23) दुपारी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात कानडगांवच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेत जलसमाधी घेतली. मंगळवारी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद अत्यंत शांततेत पाळण्यात येईल. सार्वजनिक परिवहन सेवा, रुग्णवाहिका तसेच अन्य अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात येतील, असे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर राज्यभर उद्रेक होईल. त्या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी घेतली. त्यात त्याचा मृ्त्यू झाल्याने या घटनेचा निषेध करत समन्वय समितीने बंदची हाक देत बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरीत उडी घेतल्यामुळे मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत, कुंटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 

 

Best Reader's Review