भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची बरखास्ती

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 05-07-2018 | 11:19:36 pm
  • 5 comments

भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव धारण

करणा-या सर्व संस्थांची बरखास्ती

उस्मानाबाद : भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची बरखास्ती करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन हे राज्य सरकारचे कामच असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केलं.

‘भ्रष्टाचार निर्मूलन’ असे नाव कोणतीही संस्था धारण करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलेले असल्यामुळे ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हे नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. जर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्देश मान्य नाही केले, तर संस्था बरखास्त करणार असल्याचंही धर्मादाय आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

मानवाधिकार हे नाव धारण करणाऱ्या संस्थाही बरखास्त होणार आहेत.  राज्यभरामध्ये या दोनही नावाने रजिस्टर झालेल्या शेकडो संस्था बंद होतील. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन या नोंदणीकृत संस्थेचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Best Reader's Review