भाजपाचे धस विजयी ,पंकजा मुंडे यांनी मारली बाजी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 12-06-2018 | 10:50:50 am
  • 5 comments

भाजपाचे धस विजयी ,पंकजा

मुंडे यांनी मारली बाजी

धनंजय मुंडे यांना झटका

उस्मानाबाद :बीड--लातूर-उस्मानाबाद  स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस यांचा  विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर मुंडे भगिनींनीच वर्चस्व गाजवल्याची चर्चा सुरू झाली आहे.विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जोरदार झटका बसला आहे . 

राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांनी खरं तर कडवी झुंज दिली. मात्र हक्काच्या मतांमध्ये फाटाफूट झाल्याने जगदाळे यांना पराभवाचा धक्का बसला. सुरेश धस यांचा विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. कारण या विजयानं त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे .

या निवडणुकीत सुरेश धस यांना ५२६ मतं पडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मात्र या मतमोजणीवर आक्षेप घेत राष्ट्रवादीकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.एकूण २५ मते बाद झाल्याचे कळते. 

Best Reader's Review