रमेश करडांची निवडणुकीतून माघार ! भाजपचे धक्कातंत्र यशस्वी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 08-05-2018 | 12:59:56 am
  • 5 comments

रमेश करडांची माघार!भाजपचे धक्कातंत्र यशस्वी

बीड: लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. कारण भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली आहे.

गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचे तिकीटही दिले होते.

मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. या मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. धस यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे.

---------------------------------------

भाजपचे धक्कातंत्र यशस्वी

लातूर-बीड-उस्मानाबाद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटल्याची चर्चा सुरु आहे.
 
 
उमेदवार अर्जाची तारीख उलटून गेल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवार देता येणार नाही. भाजपचे सुरेश धस यांचे पारडे यामुळे जड झाल्याचे मानले जात आहे. रमेश कराड हे भाजपचे नेते होते. विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. एक कट्टर भाजप नेता तसेच गोपीनाथ मुंडे समर्थक भाजपमधून बाहेर पडल्यामुळे हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात होता.
 

मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पंचाईत झाल्यामुळे भाजपचे धक्कातंत्र यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुरेश धस यांचे पारडे जड झाले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याला काही अपरिहार्य कारण असल्याचे स्पष्ट केले. मात्र यात भाजपचे धक्कातंत्र यशस्वी झाल्याचे चर्चेत आहे.
------------------------------

Best Reader's Review