आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना आरोग्य सेवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 19-04-2018 | 11:23:22 pm
  • 5 comments

आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी

भारतीयांना आरोग्य सेवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी, दि. 19 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत हा उपक्रम सुरु करुन या उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना 5 लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, जहाजबांधणी व जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परभणीचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगकेर, खासदार रावसाहेब दानवे, डॉ प्रफुल्ल पाटील, डॉ. सौ. विद्या प्रफुल्ल पाटील, डॉ. जान्हवी पाटील, अभय चाटे, आनंद भरोसे, प्रशांत सांगळे आदींची उपस्थिती होती.
 
 
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, परभणी वासियांसाठी सर्व सोयीयुक्त व अद्ययावत अशा हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ.पाटील यांचे अभिनंदन करत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात अशा प्रकारच्या मल्टी स्पेशालिटी आवश्यकता आहे. राज्य शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातुनही राज्यातील लाखो जनतेला उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह डॉक्टर्स व वैद्यकीय प्रशिक्षणार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Best Reader's Review