अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - पालकमंत्री अर्जुन खोतकर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 18-04-2018 | 01:07:57 am
  • 5 comments

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे

त्वरीत करा - पालकमंत्री अर्जुन खोतकर

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर व जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज सकाळी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण जिल्ह्यात वादळ, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबतची माहिती घेतली.


जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत व आवश्यक ती मदत करण्याबाबत पालकमंत्री श्री.खोतकर यांनी जिल्हाधिकारी श्री.गमे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुख्यतः तुळजापुर क्षेत्रातील झालेल्या नुकसानीची शासनाकडून नोंद घेऊन मदत करण्याबाबत सूचना श्री.खोतकर यांनी केल्या आहेत.
नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असेही श्री.खोतकर यांनी सांगितले.

Best Reader's Review