शहीद जवान मुस्तापुरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 05-04-2018 | 12:46:02 am
  • 5 comments
शहीद जवान मुस्तापुरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

परभणी :  पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी येथील शुभम मुस्तापुरे (20 वर्ष) यांचे पार्थिव बुधवारी रात्री औरंगाबादच्या विमानतळावर आणण्यात आले आहे. तेथून मध्यरात्री ते परभणी जिल्ह्यात पोहोचणार असून त्यानंतर उद्या, गुरूवारी (5 एप्रिल) सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

      भारताच्या पाकिस्तान सीमा रेषेवर काही महिन्यांपुर्वीच रुजू झालेले जवान शुभम मुस्तापुरे हे मंगळवारी (3 एप्रिल) पाकिस्ताननी केलेल्या गोळीबारात शहीद झाले होते. त्यांच्यासह चार अधिकारी देखील जखमी झाले होते. शहीद झालेले मुस्तापुरे यांचे पार्थिव सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून दिल्ली विमानतळावरून बुधवारी रात्री औरंगाबादच्या विमानतळावर आणण्यात आले आहे. तेथे त्यांना सैन्य दलातर्फे मानवंदना देण्यात आली. तेथून मोटारीने त्यांचे पार्थिव रात्री उशीरा परभणीकडे येणार असून ते पहाटे पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी प्रशासन आणि सैन्य दलातर्फे मानवंदना देऊन त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

पाकिस्तानने कृष्णा घाटी येथे मंगळवारी (3 एप्रिल) सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकच्या गोळीबारात सैन्यातील जवान शुभम सुर्यकांत मुस्तापुरे (वय 21) शहीद झाले. ते 2 वर्षपूर्वी देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती झाले होते. कोटा येथील ट्रेंनिग पूर्ण करुन अवघे तीन महिने झाले होते. त्यानंतर प्रत्यक्ष जम्मृ काश्मीर येथे सीमारेषेवर रुजू झाले होते. शुभम मुस्तापुरे अविवाहीत असून सुटी घेऊन गांवाकडे मुलगी पाहण्यासाठी येणार होते. त्यांचे वडील कोनेरवाडी येथे टेलरिंग तर आई शेतीत काम करते. त्यांना शिवम, हरीओम हे दोघे भाऊ असुन एक आठवीत तर दुसरा अकरावीत शिक्षण घेत आहे. तर शुभम यांनी प्राथमिक शिक्षण चाटोरी येथे 7 वी ते 10 वी पर्यंत व पुढील शिक्षण यशवंत कॉलेज अहमदपुर येथे घेतले होते. त्याच्या पश्यात आजी, आजोबा, आई सुनीता, वडील सूर्यकांत व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभम मुस्तापुरे हे सैन्यातील धाडशी जवान होते.  या घटनेची माहीती मिळताच पालम तहसीलदार तेजस्वीनी जाधव याांनी त्यांच्या कुंटुबाची भेट घेवून सांत्वन केले.

Best Reader's Review