Breaking News

कर्तृत्ववान महिलांचा 8 रोजी विशेष सन्मान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 04-03-2018 | 12:06:28 am
  • 5 comments

कर्तृत्ववान महिलांचा 8 रोजी विशेष सन्मान

नांदेड-जागतीक महिला दिनी आपल्या कार्य कौशल्याने इतरांना प्रोत्साहित करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा दि.8 मार्च 2018 रोजी सायंकाळी 6 वा. कुसूम सभागृह, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, ह्युमन राईट्स फाऊंडेशनच्यावतीने  जागतीक महिला दिनी दरवर्षी आपल्या कार्य कुशलतेने नावलौकीक करून इतरांसाठी मार्गदर्शक व प्रोत्साहित ठरणार्‍या नामांकीत कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येतो. यावर्षी मातोश्री इंजनिअरिंग कॉलेजच्या डीन साधना चिद्रावार, विविध प्रश्नावर आंदोलन करणार्‍या सुरेखा रावणगांवकर, सुधा देवशेटवार, शैक्षणीक क्षेत्रातील प्रा.डॉ.संगीता घुगे, हदगाव येथे रूग्णांची सेवा करणार्‍या डॉ.जयश्री पवार, शिक्षणातून प्रबोधन करणार्‍या प्रा.जानका पाटील पांडूर्णे, अनेक पुरस्कार प्राप्त सविता दादज्वार, कोचिंग क्लासच्या माध्यमातून सेवा देणार्‍या वंदना पाटील, गरीब व गरजू व्यक्तीच्या उत्थानासाठी बचतगटाच्या माध्यमातून अग्रेसर राहणार्‍या भुसावळच्या छायाताई बहिरूणे, समाजसेवेचे वृत्त जोपासणार्‍या कांचन चौहान, कराटेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदके मिळवणार्‍या पुणे येथील दिप्ती कळसे, औरंगाबाद येथे शिक्षण क्षेत्रात जम बसवणार्‍या रिंकू बॅनर्जी, सतत समाजसेवेत झोकून देत गरीबांसाठी लढणार्‍या जळगावच्या निलांबरी जमदाडे, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सतत परिश्रम घेणार्‍या लहानच्या निर्मलाताई खिल्लारे, गरीब परिस्थितीवर मात करून मुलीला डॉक्टर बनवून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करणार्‍या वसमतच्या छाया पुरी, समाजसेवेतून महिलांमध्ये जनजागृती करणार्‍या नायगावच्या महानंदा गायकवाड व बालमनावर सुसंस्कार टाकून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी मेहनत घेणार्‍या सिमा वझरकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, दिलीप माहोरे, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव पाटील, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, संगीताताई बारडकर, उषा हडोळतीकर, जयलक्ष्मी गादेवार, हेमा बारडकर, सुचीता मुत्तेपवार, शरयु बारडकर, शिवहरी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

Best Reader's Review