पोलीस दलाने आयएसओ मानांकन मिळवणे ही अभिमानाची गोष्ट - पोलीस महानिरीक्षक भारंबे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 02-03-2018 | 11:20:13 pm
  • 5 comments

पोलीस दलाने आयएसओ मानांकन मिळवणे ही अभिमानाची गोष्ट - पोलीस महानिरीक्षक भारंबे

उस्मानाबाद :- पोलीस दलाचे काम हे खूप ताण-तणावाचे काम आहे, कामाचा भार सांभाळून आयएसओ मानांकन मिळवणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले. येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयएसओ प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. उस्मानाबादमध्ये ही गोष्ट घडणे ही खूप मोठी बाब आहे, दैनंदिन ताणतणाव असताना संघटितपणे काम करणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. एका ध्येयासाठी सर्वांना प्रेरित करून ध्येय साध्य केले, त्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे त्यांनी अभिनंदन केले.

जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी आपण काही मापदंड आखले पाहिजेत, त्यानुसार प्रयत्न करून यश मिळवावे. या प्रयत्नांना आयएसओ मानांकन मिळणे हे उत्साहवर्धक आहे. सकारात्मक सेवाभाव मनावर बिंबवून ते आचरणात आणावे असे ते म्हणाले.

या वेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उस्मानाबाद पोलीस दलासाठी हा सुवर्णक्षण असून या आनंदाबरोबरच आपली जबाबदारी देखील वाढली आहे असे सांगून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, मोतीचंद राठोड (उस्मानाबाद), सुनिल नेवसे ( उस्मानाबाद शहर), संभाजी बापूराव पवार (उस्मानाबाद ग्रामीण), श्री .गाते (आनंद नगर), उत्तम जाधव (बेंबळी), राजेंद्र बोकडे (तुळजापूर), मिरकल (तामलवाडी), पी.सी सूर्यवंशी (नळदुर्ग), माधव गुंडले (उमरगा), एम.आय शेख (मुरूम), एस ए भंडारे (लोहारा), सूर्यवंशी (भूम), डंबाळे (वाशी), मोताळे (परंडा), साबळे (अंभी), डी.एस बोरीगड्डे (कळंब), के एस महानभाव (ढोकी), संजीवन मिरकले (शिरढोण), राजेंद्र बनसोडे (येरमाळा) व त्या त्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक अनिल सूर्यवंशी यांनी केले.

Best Reader's Review