Breaking News

आयपीएस अडकला लाचेच्या जाळ्यात

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 31-01-2018 | 01:00:17 am
  • 5 comments

आयपीएस अडकला लाचेच्या जाळ्यात

नांदेड – घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. यासाठी तु 2 लाख रुपये दे अशी मागणी तत्कालीन प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकृष्णन यादव यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी दि.30 रोज मंगळवारी अमरावती लाचलुचपत विभागाने नांदेड येथे त्यांच्या खाजगी सहकाऱ्याला 1 लाख रुपयाची लाच देतांना रंगेहात पकडले.

भारताच्या सर्वसामान्य माणसाचे भले करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेच्या माध्यमातून आयपीएस झालेल्या एका उदंड युवकाने आज एका खाजगी माणसामार्फत लाचेची जूनी वसुली बाबत स्विकारलेल्या 1 लाख प्र्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या लाचलुचपत विभागाने नांदेडमध्ये कार्यवाही करून त्या खाजगी इसमाला जेरबंद केले आहे. आयपीएस मात्र सध्या हैद्राबादमध्ये प्रशिक्षण घेत आहे. जी.विजयकृष्णन यादव हे मुळ राहणारे तेलंगणा राज्यातील आहेत.

सन 2015 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आयपीएस ग्रेड मिळविणाऱ्या आणि सध्या नांदेडच्या इतवारा उपविभागात कार्यरत असणाऱ्या  जी.विजयकृष्णन यादव यांची प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक पदावर अमरावती ग्रामीण जिल्ह्यात नियुक्ती होती. त्यावेळीच त्यांनी तिवसा पोलीस ठाण्याचा कारभार तीन महिने चालविला होता. या भागात रेती माफिया भरपूर जोरदारपणे कार्यरत आहेत. अशाच एका रेती माफियाच्या रेती भरलेल्या ट्रकवर कार्यवाही करण्यात आली. तेंव्हा त्याला अटक न करणे, त्याची ट्रक सोडणे आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करणे यासाठी जी. विजयकृष्ण यादव यांनी 2 लाख रुपये  लाच त्यावेळी घेतली होती. आणि 1 लाख रुपये देणे उधारी राहिली होती.

सध्या  जी.विजयकृष्णन यादव हे आयपीएस लोकांना प्रशिक्षण देणाऱ्या हैद्राबाद येथील संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार त्यांनी आपली 1 लाख रुपयांची उधारी लाच नांदेडचा खाजगी इसम सन्नीसिंघ इंदरसिंघ बुंगई (वय 34) रा.दिपनगर नांदेड याच्याकडे देण्यास सांगितली आणि आज 30 जानेवारी 2018 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अमरावती येथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस पथकाने सन्नीसिंघला जेरबंद केले आहे. सन्नीसिंघ हा नांदेडमधील एका राजकीय व्यक्तीचा जावई असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जी. विजयकृष्णन यादव सध्या प्रशिक्षणासाठी गेलेले असल्यामुळे त्यांना पकडता आलेले नाही. माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हैद्राबाद येथील पोलीसांना त्याला पकडण्याची सुचना केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. हा गुन्हा नांदेडमध्ये दाखल होईल की, अमरावतीमध्ये याबद्दल माहिती प्राप्त होवू शकली नाही. पोलीसांनी जारी केलेल्या माहितीत आयपीएस अधिकारी जी.विजयकृष्णन यादव हे आरोपी क्रमांक 1 आहेत.

Best Reader's Review