Breaking News

लोह्याच्या विकासात माणिकराव पाटील यांचे मोठे योगदान – जयंतीनिमित्त कार्याचा गौरव

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 13-01-2018 | 03:57:58 pm
  • 5 comments

लोह्याच्या विकासात माणिकराव पाटील यांचे मोठे योगदान – जयंतीनिमित्त कार्याचा गौरव
लोहा - लोहा शहर व तालुक्याच्या विकासात पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांचे मोठे योगदान असून सामाजिक समता शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करत त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले चारशे कुटूंबीयांचा पोशिंदा आणि शहराच्या वैभवाचा पाया घालणाऱ्या माणिकराव पाटलांच्या विचारांचे आत्मसात नव्या पिढीने केले पाहीजे असा भावना  मान्यवरांनी भाषणातून व्यक्त  केल्या. लोह्यातील शिवछत्रपती विद्यालययात लोह्याचे पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंती निमित शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेचे सचिव ऑड के. एम. पवार, कृउबा संचालक केशवराव मुकदम, उपजिल्हाप्रमुख शरद पवार, डॉ.धनंजय पवार, नामदेव पाटील, श्रीकांत पवार, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माऊली पावर, अप्पाराव पवार, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. ई. वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनमंत पवार, भास्कर पाटील पवार, मु.अ. संतोष भालेराव, मिलिंद पवार, कामेश पाटील, पांडुरंग पवार, दशरथ पवार, प्रभारी मुख्याध्यापक हरिभाऊ चव्हाण, दिनेश तेलंग श्रीकांत सूर्यवंशी, माधव पवार, रामपाटील यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ.डी.एम.पवार यांनी वडीलांच्या आठवणी व शिकवण सांगतांना अभ्यास दूरदृष्ठी कशी होती याचा स्वानुभव सांगितला हरिभाऊ चव्हाण यांनी पुरोगामी विचार कसे होते याला उजाळा दिला. भास्कर पाटील यांनी आज त्यांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले तर हरिहर धुतमल यांनी दोन गावचा वाद व हॉटेल सर्वासाठी खुले केले त्याच्या विचारांची आठवण विशद केली. पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांचा नातू सुधाकर पाटील यांच्या पुढाकाराने गरीब होतकरू मुलांना शालेय दप्तर तर विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.अतिशय समर्पक निवेदन बी.एन.गवाले, आर.आर. पिठ्ठलवाड यांनी केले.
          दहावीतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व जिज्ञासा साठी वृतपत्र वर्षभर देण्याची घोषणा प्रा.डॉ.डी.एम.पवार यांनी केली.शळेच्यावतीने संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पवार, व नामदेव पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी शिक्षकवृंद व जून्या शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Best Reader's Review