Breaking News

हेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 26-07-2017 | 09:32:24 pm
  • 5 comments

हेलिकॉप्टर भाड्याने घेणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई - लातूर येथील दौऱ्यादरम्यान शासनाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याने दुसरे हेलिकॉप्टर विकत घेईपर्यंत दीर्घकालीन भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर वापरण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. निलंगा (जि. लातूर) येथे झालेली दुर्घटना दुर्दैवी व गंभीर होती. निलंगा अपघाताची डीजीसीएने गंभीर दखल घेतली असून एएआयबी (Aircraft Accident Investigation Board) मार्फत याची चौकशी समिती नेमून स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अशा घटना घडणार नाही यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी परवानगी देताना तसेच हेलिपॅडसाठीचे स्थळ निवडताना कोणती काळजी घ्यावी याबाबतची निश्चित नियमावली तयार करण्यात येत आहे. यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी घ्यावी लागणारी दक्षता यासंदर्भात मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येतील. राज्य शासनाकडे उत्कृष्ट दर्जाचे हेलिकॉप्टर होते. त्याचा विमाही काढण्यात आलेला होता. ते दुर्घटनाग्रस्त झाल्याने नवीन हेलिकॉप्टर विकत घेईपर्यंत डीजीसीएने मान्य केलेल्या ऑपरेटरकडून सर्व नियम पाळून हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. तरी रायगड जिल्ह्यात हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना अचानक हेलिकॉप्टर सुरु झाले होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. तरीही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा संबंधात हयगय झाली असल्याने या घटनेची चौकशी उच्च अधिकार समितीमार्फत करण्यात येत आहे.

Best Reader's Review